झोप येण्यासाठी उपाय/ झोप न लागणे उपाय/ झोप येण्यासाठी आयुर्वेदिक औषध/ झोप न येण्याची कारणे / zop yenyasathi upay in marathi >>> आपल्या उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी सर्वात महत्वाची असते तर ती म्हणजे झोप. दररोज नियमित पुरेशी झोप ही सर्वात महत्वाची असते, आणि जर आपली पुरेशी झोप होत नसेल तर आपण अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला योग्य प्रमाणात आणि पुरेशी झोप मिळेल याची काळजी घ्यावी. योग्य प्रमाणात झोप ही अमृता समान काम करते.
रात्री शांत झोप न लागणे ही अनेकांची समस्या असते. बर्याच जणांना अशा देखील समस्या असतात की, रात्री झोपेत जीव घाबरणे किंवा झोपेमध्ये वारंवार जाग येणे त्याच बरोबर झोप अजिबात न लागणे ह्यासारख्या समस्या असतात, आणि मध्येच जाग आली तर बराच वेळ झोप न लागणे यामुळे देखील बरेच लोक परेशान असतात. अशा समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही आजचा हा लेख घेऊन येत आहोत, यात आपण जाणून घेणार आहोत की, झोप येण्यासाठी उपाय/ झोप न लागणे उपाय /झोप न येण्याची कारणे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
झोप व्यवस्थित आणि रात्री लवकर लागण्यासाठी आपण आमच्या आजच्या या लेखात सांगितलेले उपाय करावेत आणि ज्या कारणामुळे झोप लागत नाही त्या कारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.या समस्येच्या निरकरणासाठी काय करायला पाहिजे हेआपण जाणून घेणार आहोत. अनेकजण असे दिसतात की, झोप झाल्यावर पण थकल्यासारखे दिसतात कारण झोपे मध्ये उठून बसणे, थोड्या थोड्या वेळेला जाग येणे इत्यादी समस्ये पासून ते ग्रस्त असतात.
अशा ह्या विविध प्रकारच्या समस्या आणि त्यावरील उपाय काय आहेत ते आपण पाहणार आहोत. हे उपाय करून झोप न येण्याच्या समस्ये पासून तुमची सुटका होऊन त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Table of Contents
झोप येण्यासाठी उपाय / झोप न लागणे उपाय
झोप न लागणे ही समस्या बर्याच जणांची असते त्यापैकीच तुम्ही एक असाल तर तुमच्या साठी हा लेख आणि यातील माहिती अतिशय उपयुक्त ठरणारी अशी आहे. तर अशा या झोपेच्या समस्येवर कोणते उपाय आहेत आणि आयुर्वेदिक औषध आहेत ते आपण पाहणार आहोत.
तिखट पदार्थ खाणे टाळणे
झोप लागण्यासाठी आणि मन शांत राहण्यासाठी रात्रीच्या जेवणामध्ये अति तेलगट किंवा अति मिरचीचे तिखट पदार्थ खाल्यामुळे या पदार्थाने देखील झोप उडते. त्यामुळे पालेभाज्या, डाळी यासारखे पौष्टिक पदार्थ जास्त प्रमाणात खावे. तिखट पदार्थ हे कधीही शरीरसाठी आणि आरोग्य साठी घातक च आहेत त्यामुळे आपल्या आहाराचा देखील आपल्या झोपेवर परिणाम होतो.
सात्विक आहार हा योग्य झोपेसाठी महत्वाचा असतो, त्यामुळे किमान रात्रीच्या जेवणामध्ये तरी तिखट, गरम आणि मसाले दार आहारचा समावेश असू नये. जेणे करून तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल आणि आरोग्य देखील छान राहील.
दूध आणि मध– झोप येण्यासाठी आयुर्वेदिक औषध
दूध हे पूर्णान्न समजले जाते तसेच दुध शांत शांत झोप लागण्यासाठी एक ग्लास दुधामध्ये अर्धा ते एक चमचा मध टाकून पिल्यास शांत आणि पूर्ण झोप येते. पोटात दाह होत असेल तर ते देखील दुधाने शांत होतो तसेच मध देखील अनेक आयुर्वेदिक औषधी गुणांनी युक्त असतो, त्यामुळे रात्री झोपताना एक कप कोमट दूध मध्ये एक ते दोन चमचे मध टाकून ते दूध प्यावे त्याने मन आणि डोके शांत होऊन लवकर शांत झोप लागते आणि मध्ये-मध्ये जाग देखील येत नाही.
मालिश करणे
आपल्या शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत चालण्यासाठी मसाज म्हणजेच मालिश खूप प्रभावीपणे काम करते. झोप पूर्ण आणि शांत लागण्यासाठी डोक्याची तेलणे मालिश करावी. त्यामुळे डोक्याला आणि डोळ्याला आराम मिळतो आणि शांत झोप येते. डोक्याची रात्री झोपण्याआधी तेलणी मालिश अवश्य करावी. जर तुम्हाला तेलाणे मालिश आवडत नसेल तर तुम्ही पाण्याने देखील मालिश करू शकता याने देखील शांत झोप लागते. मालिश केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होऊन मसाज झाली की तुम्हाला आपोआप झोप येईल.
सकाळी लवकर उठणे
सकाळी लवकर उठून फिरायला जाणे आणि व्यायाम करणे, हे निरोगी जीवनाचे सूत्र आहे. योगा केल्यामुळे शरीर निरोगी राहते आणि शांत झोप देखील लागते. रोज 20 ते 30 मिनिटे व्यायाम अवश्य करावा त्यामुळे झोपच्याच नाही तर सर्वच समस्यांचे निराकरण होते. आपल्या मानवी शरीराला सात ते आठ तासांची झोप लागते जर त्या पेक्षा जास्त तास झोपल्यास तुम्हाला रात्री झोप न लागण्याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे सकाळी लवकर उठावे जेणे करून रात्री लवकर झोप येईल.
विचार न करणे
बरेच लोक दिवसभरातील सर्व घटना प्रसंग, चांगल्या वाईट गोष्टी या घटनांचा विचार रात्रभर करतात, त्यामुळे या कारणाने त्यांना गाढ आणि पूर्ण झोप लागत नाही. त्यामुळे अशा चांगल्या वाईट कोणत्याही घटनेचा विचार न करता त्या वहीमध्ये लिहाव्या याने मन हलके होते आणि झोप देखील शांत आणि चांगली लागते.
पोषक वातावरण– झोप येण्यासाठी उपाय
वातावरणाचाही प्रभाव आपल्या झोपेवर होतो जर थंड वातावरण असेल तर छान झोप येते आणि हर दमट वातावरण असेल तर झोप लागत नाही आणि मन अस्वस्थ राहते. वातावरणाचा आपल्यावर असा प्रभाव पडत असल्याने रात्री झोपण्याआधी जेवणानंतर बाहेर मोकळ्या हवेत फिरल्याने मन आणि डोक तसेच शरीर स्वस्थ राहुन छान आणि गाढ झोप लागते.
सकस आणि संतुलित आहार- झोप न लागणे उपाय
संतुलित आहार घेतल्याने झोप छान येते व निरोगी जीवन जगण्यास पूर्ण झोप अत्यावश्यक असते. आपल्या रोजच्या आहार मादक पदार्थ असू नये. तसेच मद्यपान करणार्या व्यक्तीला गाढ झोप येत नाही आणि रात्रभर अस्वस्थ वाटते. आहार मार्गदर्शकाच्या मते मद्यपानामुळे आपल्याला झोप लागत नाही त्यामुळे हे करणे बंद करावे कारण मद्यपाना मुळे शरीराला इतरही मोठ मोठे दुष्परिणाम भोगावे लागतात.
मन शांत करणे– झोप न लागणे उपाय
अगदी लहान मुलापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनाच कशा न कशाचे टेंशन ,तान हा असतो, त्या कारणाने सुदधा गाढ झोप येत नाही आणि हे मन शांत करण्याचा सर्वात मस्त आणि रामबाण उपाय म्हणजे ध्यान आणि मेडीटेशन करणे. जर ध्यान झोपण्याआधी 10 ते 5 मिनिटे केल्यास मन शांत होते परंतु त्यासाठी मनात कोणत्याही प्रकारचे विचार न करता जे ध्यान केले जाते त्याचाच फायदा होतो आणि त्यालाच मनःपूर्वक ध्यान करणे असे म्हणतात.
जायफळ चे दूध घेणे- झोप येण्यासाठी आयुर्वेदिक औषध
जायफळ हे एका औषधीय गुणधर्माने परीपूर्ण समजले जाते, त्यामुळे लहान मूल देखील सतत रडत असेल आणि चिडचिड करत असेल तर त्याला जायफल उगाळून दिले जाते. अशाच प्रकारे आपण देखील रात्री लवकर झोप लागत नसेल तर कोमट दुधात जायफळ खिसून टाकावे आणि ते दूध प्यावे, त्याने आपल्याला थोडी गुंगी आल्यासारखी वाटेल आणि नक्कीच लवकर झोप देखील लागेल.
झोप न येण्याची कारणे
आपण सतत काही वेळेस अशी तक्रार करत असतो की, मला झोप येत नाहीये परंतु; एखादे वेळेस असे होऊ शकते की आपल्याला झोप नाही लागत, पण जर तुम्हाला सारखा हा झोप न लागण्याचा त्रास असेल तर मात्र त्याची काही विशिष्ट कारणे असू शकतात, त्या पैकी काही सामान्य कारणे आहेत. तुम्ही अंतर्मुख होऊन त्याचा विचार करावा आणि जर हे कारण असेल तर त्याची सवय बदलावी. असे केल्यास तुम्हाला नक्कीच झोप लागेल.
झोपेचे नियोजन चुकणे– झोप न येण्याची कारणे
शांत झोप लागण्यासाठी झोपेच्या वेळेचे नियोजन देखील महत्वाचे असते. आपल्याला साधारणपणे किती वाजता जूप येते हे ठरवणे आणि किती वाजता झोप पूर्ण होते हे ठरवणे महत्वाचे असते. ज्या वेळेस झोपायचे असते त्याच्या अर्धा तास आधी मोबाईल किंवा इतर कोणतीही वस्तु की, ज्यामुळे आपल्या झोपेला व्यत्यय येऊ शकतो त्या गोष्टी आपल्या नजरेपासून लांब ठेवल्या पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला ज्या वेळेला झोप येते त्याच वेळेला चटकन झोपायला गेले पाहिजे त्याने झोप लवकर आणि शांत लागते.
दुपारी जास्त झोप घेणे
आपल्याला रात्री लवकर झोप न लागण्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे दुपारी जास्त झोप घेणे हे आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार मानवी शरीराला संपूर्ण दिवसभरात जास्तीत जास्त आठ ते नऊ तास झोप घेणे गरजेचे आहे. परंतु काही लोक दुपारी तीन ते चार तास झोपतात आणि मग त्या कारणाने त्यांना रात्री लवकर झोप लागत नाही. त्यामुळे दुपारी जास्त झोप घेणे हे रात्री झोप न लागण्याचे कारण असल्याने दुपारी कमी वेळ झोपावे अन्यथा झोपू नये.
मानसिक दडपण असणे – झोप न येण्याचे कारण
रात्री पडले की झोप न लागण्याचे आणखी एक महत्वाचे आणि गंभीर कारण म्हणजे, आपण कुठल्या तरी मानसिक दडपणाखाली असणे हे आहे. जर आपले मन प्रसन्न आणि विचार स्थिर असतील तर आपल्याला नक्कीच रात्री लवकर झोप लागते. परंतु मन हे कुठल्या तरी दडपणाखाली आणि चिंतेत असेल व विचार हे भरकटत असतील तर निश्चितच तुम्हाला झोप लागणारच नाही. त्यामुळे मानसिक दडपण असणे हे झोप न येण्याचे महत्वाचे कारण आहे.
अशाप्रकारे वरील सर्व उपाय 100 % करून झोप न लागण्याच्या समस्येवर कायमची सुटका करू शकता. निरोगी जीवनासाठी शरीराला आणि बुद्धीला आवश्यक अशी शांत झोप द्यावीच कारण ती निरोगी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे.
सारांश – झोप येण्यासाठी उपाय / झोप न लागणे उपाय/ झोप न येण्याची कारणे/ झोप येण्यासाठी आयुर्वेदिक औषध
बर्याच लोकांना झोप न येण्याची समस्या असते यावर काही वैद्यकीय सल्ल्याने बाजारात औषधी देखील मिळतात परंतु त्याचे नंतर अनेक दुष्परिणाम होतात. सतत किंवा कधी कधी अशी झोपेची औषधी घेण्याची सवय असल्यास त्याचे नंतर व्यसन देखील लागू शकते, त्यामुळे आम्ही सांगितलेली वरील झोप येण्यासाठी आयुर्वेदिक औषधी आणि झोप येण्यासाठी उपाय, जे सांगितले आहेत ते करा, याने तुमची समस्या नक्की दूर होईल.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , “झोप येण्यासाठी उपाय/ झोप न लागणे उपाय/ झोप येण्यासाठी आयुर्वेदिक औषध/ झोप न येण्याची कारणे” हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .
Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात