व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय/ व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय /व्हेरिकोज व्हेन्स आयुर्वेदिक उपचार/varicose veins in marathi >>>> व्हेरिकोज व्हेन्स हा एक रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार आहे, आपल्या शरीरात सतत रक्तप्रवाह चालू असतो आणि तो धमण्या म्हणजेच शरीरातील शिरांमधून चालतो. जसे आपल्या शरीरातील बाकी अवयव बिघडू शकतात किंवा त्यांच्या कार्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात त्याच प्रमाणे शरीरातील नसांमध्ये देखील बिघाड होऊ शकतो किंवा या नसा आणि शिरा देखील खराब होऊ शकतात.
या नसा खराब झाल्यास, जो आजार होतो तोच व्हेरिकोज व्हेन्स चा आजार होय, असे आपण सामान्य भाषेत या आजाराविषयी सांगू शकतो; परंतु संपूर्ण वैज्ञानिक आणि वैद्यकीय ज्ञानाच्या प्रमाणे याची माहिती आपल्याला असावी या करिता आजचा हा लेख “व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय” आम्ही सादर करीत आहोत. या लेखातील माहिती तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय, त्याचे लक्षण आणि कारण काय, तसेच यावर घरगुती कोणता उपाय आपण करू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती या लेखात मिळेल.
या सदरात तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स याविषयीसंपूर्ण माहिती मिळू शकते. आपल्या आजूबाजूला शेजार्यांना, नातेवाईकांना किंवा आपल्या परिवारातील एखाद्या सदस्याला ह्या आजारचा त्रास असेल तर तुम्ही हे उपाय उपचार करू शकता. या लक्षणा सारखे जाणवल्यास व्हेरिकोज व्हेन्स आहे की नाही, याची पडताळणी देखील अवश्य करून बघावी त्यासाठी यातील लक्षणे तुम्हाला मदत करतील, तसेच जी कारणे आहेत हा आजार होण्याची ती तुम्हाला माहिती झाल्याने तुम्ही ह्या कारणांना स्वतः पासून नक्कीच दूर ठेवाल. आता आपण व्हेरिकोज व्हेन्स विषयी विस्तृत माहिती जाणून घेऊया.
व्हेरिकोज व्हेन्स
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे, ज्याला आपण मराठी मध्ये ‘अपस्फीत नीला ‘असे देखील म्हणू शकतो. हा आजार अत्यंत गुंतागुंतीचा आणि गंभीर रूप धारण करणारा आजार आहे त्यामुळे याविषयी पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. तर सुरूवातीला जाणून घेऊया, व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय?
Table of Contents
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे, आपल्या शरीरातील रक्तप्रवाह करणार्या ज्या शिरा म्हणजेच व्हेंस किंवा नसा असतात, त्या शिरांमधील व्हौलव्ह काम करणे बंद करून अशुद्ध रक्त साठा करतो आणि कालांतराने ह्या शिरा वेड्यावकड्या दिसू लागतात तसेच ह्या नसांचा आकार आधीपेक्षा वाढतो, या नसांचा रंग निळा होतो आणि इतर नसांपेक्षा या जास्त फुगलेल्या दिसतात. या शिरा अशुद्ध रक्ताचा साठा करतात आणि मग तिथे रक्ताची गुठळी तयार होते, या आजाराला व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात.
हा आजार जास्त करून पायाला होत असतो. याचे एक कारण म्हणजे पायावर शरीराचा भार पडत असतो आणि त्यामुळे दबाव वाढतो आणि नसा फुगू शकतात किंवा रक्त गोठू शकते आणि दुसरे कारण म्हणजे आपल्या पायातील रक्तवाहिन्या ह्या थेट फुफ्फुस आणि र्हुदयाला रक्त पुरवठा करत असतात म्हणजे पायापासून वर रक्त वाहवत असतात, म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अगदी विरूध काम करत असतात, आणि हे काम करण्यासाठी या पायाच्या शिरांना विशिष्ट प्रकारचे पडदे असतात जे एकाच दिशेने रक्त प्रवाह करण्यास मदत करतात;
परंतु जास्त वेळ उभे राहिल्याने किंवा बसल्याने या शिराच्या पडद्यांना तान पडतो आणि हे पडदे निकामी होतात. पडदे निकामी झाल्याने रक्त वर हृदयाकडे जाण्याएवजी त्याच शिरांमध्ये जमा होते आणि शिरा फुगतात. काही काळानंतर हे रक्त अशुद्ध होते आणि निळा रंगाचे होते, यालाच व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात आणि याच कारणाने हा आजार जास्त करून पायाला होतो. आता आपण पाहूया की, हा आजार झाल्याची कोणती विशिष्ट लक्षणे आहेत, जेणे करून तुम्ही त्यावर लवकर उपचार करू शकतात.
व्हेरिकोज व्हेन्स ची लक्षणे
- पायाला प्रचंड वेदना होणे.
- पायाला गोळे येणे.
- पायाला सूज येणे.
- खूप बसून राहिले अथवा उभे राहिले तर पाय दुखणे.
- पायाचा पंजा काळवंडलेला दिसणे.
- पायाच्या नसा निळ्या, हिरव्या अथवा जांभळ्या रंगाच्या, फुगलेल्या आणि वेड्यावकड्या दिसणे.
- या फुगलेल्या नसांच्या बाजुच्या भागाला खाज येणे.
- त्वचेवर अल्सर सारखे चट्टे किंवा जखम होणे.
- नसांमध्ये गाठ असल्यासारखी वाटणे.
साधारणपणे वरील लक्षणे ही व्हेरिकोज व्हेन्स आजार झाल्याची आहेत, तरी देखील याच्या निदानासाठी, आणि हा आजार आहे की नाही हे 100% समजण्यासाठी एक चाचणी केली जाते ती म्हणजे, “डॉप्लर स्कॅन” ही सोनोग्राफी सारखी चाचणी केली जाते. याद्वारे रक्तपुरवठा सुरळीत चालू आहे की नाही हे तपासले जाते. आता पुढच्या टप्प्यात पाहूया की, व्हेरिकोज व्हेन्स होण्याची कारणे काय आहेत?
व्हेरिकोज व्हेन्स होण्याची कारणे
- हा आजार अनुवंशिकता असेल तरी देखील होऊ शकतो.
- अतिरिक्त असलेल्या वजनामुळे, लट्ठपणामुळे पायाच्या नसाना तान पडून होऊ शकतो.
- जास्त वेळ उभे राहिल्याने किंवा बसून राहिल्याने होऊ शकतो.
- धूम्रपाण किंवा मद्यपान यासारखे व्यसन असल्यास.
- वय जास्त असल्यास उतारवयात 50 शी नंतर होऊ शकतो.
- गरोदरपणात स्त्रियांना पोटातील गर्भाचा ताण पायांवर पडल्या कारणाने हा आजार होऊ शकतो.
- शरीरातील अशुद्ध रक्त वाहून नेणार्या शिरा योग्य प्रकारे कार्य न केल्यास हा आजरा होऊ शकतो.
- जळवांचा वापर करणे
जर हा आजार प्राथमिक स्तरावर असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करून हा आजार कमी करू शकता परंतु जर आजार जास्त प्रमाणात वाढला असेल तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. प्राथमिक स्तरावरच्या या आजारासाठी काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे
व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय /व्हेरिकोज व्हेन्स आयुर्वेदिक उपचार/varicose veins in marathi
व्हेरिकोज व्हेन्स वर घरगुती उपचार मध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जीवनशैली मध्ये बदल हे करावे लागतात. हे बदल केल्याने, तुमचा हा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होईल. चला तर पाहूया नेमके काया करावे म्हणजे आपला हा त्रास कमी होण्यास मदत होईल.
जास्त वेळ उभे राहू नये
वर हा आजार होण्याच्या कारणामध्ये आपण पाहिले, हा आजार जास्त करून पायाला होतो कारण पायाच्या नसा गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध रक्त प्रवाह करतात आणि पायापासून वर रक्त वाहवत नेतात, त्यामुळे जास्त वेळ उभे राहिल्याने नसाना तान पडून हा आजार होऊ शकतो त्यामुळे जास्त वेळ उभे न राहणे, हा उपाय या आजारावर प्रभावीपणे काम करू शकतो.
वजन नियंत्रणात ठेवावे/ लठ्पणा कमी करावा-
जास्त वजन असेल तर त्याचा परिणाम म्हणजे आजारांना आमंत्रण देणे होय, वजन जर जास्त असेल तर त्याचा भार पायावर पडतो आणि नसा ब्लॉक होण्याचे चान्ससेस वाढतात आणि गोठलेले रक्त निळे पडून हा आजार होतो त्यामुळे आहार संतुलित ठेवून वजन नियंत्रणात राहील याची काळजी घ्यावी. लट्ठपणा असेल तर तो कमी करावा, ज्यामुळे पायाच्या शिराना तान पडून हा आजार होणार नाही.
व्यायाम करावा
रक्ताभिसरण सुधारण्यासाठी शरीराच्या हालचाली व्हाव्या लागतात आणि उतारवयात जास्त हालचाली करू शकत नसाल तरी व्यायाम करावा. व्यायाम केल्याने शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत राहतो आणि त्यामुळे नसा देखील मोकळ्या राहतात. व्यायाम केल्याने नसावर तान न पडता, त्यांचे कार्य सुरळीत चालते आणि व्हेरिकोज व्हेन्स या आजाराची सुरवात जरी झालेली असली तरी हा आजार कमी होतो.
झोपताना पायाखाली उशी घ्यावी
पायावर दिवसभर उभे राहिल्याने पायाकडून डोक्याकडे रक्तप्रवाह चालू ठेवताना नसांवर तान पडतो, त्यामुळे जर रात्री झोपताना उंचीवर पाय ठेऊन झोपल्याने किंवा उशीवर पाय ठेऊन झोपल्याने नसांवरील तान कमी होतो आणि त्याचे आजार देखील कमी होतात.
मीठ कमी खावे
जास्त प्रमाणात मीठ खाणे हे शरीरासाठी, आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारण जास्त प्रमाणात मीठचे सेवन केले तर रक्तदाब होण्याची शक्यता असते, आणि रक्तदाब किंवा रक्त गोठणे या समस्या व्हेरिकोज व्हेन्स च्या आजाराचे आमंत्रण असते. त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स या आजारा पासून रक्षण करायचे असेल तर मीठ कमी खाणे, हा उत्तम उपाय आहे.
उंच टाचेची चप्पल वापरू नये
उंच टाचेची चप्पल घातल्यास, पायाच्या तळव्याच्या नसांना अतिरिक्त तान पडतो, आणि उंच टाचेच्या चप्पल मुळे रक्त वर पोहचवण्यात नसांवर तान पडतो, त्यामुळे नसावर सूज येऊ शकते, रक्तप्रवाह संथ होऊ शकतो आणि आपला हा आजार वाढण्याची दाट शक्यता ही नाकारता येत नाही त्यामुळे सहसा उंच टाचेची चप्पल घालू नये. हा उपाय ह्या आजाराच्या उपचारात बरीच मदत करू शकतो.
कॉम्प्रेशन सॉक्स वापरणे
कॉम्प्रेशन सॉक्स, या सॉक्सच्या वापराने पायात रक्त जमा होत नाही, तसेच जर व्हेन्स ब्लॉक झाल्याने सूज आली असेल तर सूज देखील कमी होते, तसेच वेदना देखील कमी होतात. हे सॉक्स मेडिकल मध्ये उपलब्ध असतात. जर तुम्हाला हा आजार झाला असेल तर, तुम्ही रोज रात्री झोपताना हा सॉक्स घालावा. हा उपाय रक्तप्रवाह सुरळीत करण्यास आणि नसांवरचा तान कमी करण्यास मदत करेल.
दूध आणि लसूण – व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय
नसांचा कोणताही आजार झाल्यास त्यावर कोमट दूध आणि लसूण हा अत्यंत गुणकारी असतो, कारण लसूण हा शरीरातील रक्त पातळ ठेवण्यास मदत करतो आणि रक्त प्रवाह सुरळीत करतो त्यामुळे तुम्हाला जर व्हेरिकोज व्हेन्स या आजराची लक्षणे दिसू लागल्यास तुम्ही त्याची योग्य ती चाचणी आणि तपासणी करून, जर हा आजार कमी असेल तर हा उपाय चालू करावा, त्याने तुम्हाला त्वरित आराम मिळेन आणि आजार कमी मदत होईल.
डाळिंबाचा रस घ्यावा-व्हेरिकोज व्हेन्स आयुर्वेदिक उपचार
डाळिंबाच्या दाण्यातील रस हा आपल्या आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त व्यवस्थित प्रवाहात राहते त्यामुळे जर या आजाराचा शिरकाव तुमच्या नसात झाला असेल तर, याला रोखण्यासाठी रोज रात्री काळेमीठ टाकून डाळिंबाचा रस प्यावा, याने त्रास कमी होण्यास आणि आजार वाढण्यापासून रोखले जाईल.
ऑलिव्ह ऑइल ने मसाज करावी
ऑलिव्ह ऑइल हे रक्त प्रवाह सुरळीत करण्यास आणि गोठलेले नसामधील रक्त मोकळे करण्यास मदत करते, त्यामुळे तुम्हाला जर व्हेरिकोज व्हेन्स या आजारचा त्रास असेल तर , तुम्ही चार ते पाच चमचे ऑलिव्ह ऑइल कोमट करावे आणि याने पायाला पाच मिनिटे मसाज करावी, याने पायाच्या नसा मोकळ्या होतात आणि रक्ताच्या गाठी झाल्या असतील तर त्या देखील जिरतात.
सारांश – व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय/ व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय /व्हेरिकोज व्हेन्स आयुर्वेदिक उपचार/varicose veins in marathi
व्हेरिकोज व्हेन्स हा आजार तसा प्रत्येकाला होईलच असे नाही; परंतु जास्त करून वयस्कर व्यक्तींना होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुमच्या शरीराची नियमित काळजी घ्यावी आणि व्हेरिकोज व्हेन्स या आजाराची लक्षणे दिसत असतील तर वरील घरगुती उपाय करावेत. परंतु प्रत्येक उपाय प्रत्येक व्यक्तिला उपयोगी येतीलच असे नाही, त्यामुळे वेळ प्रसंगी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, ” व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय / व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय/व्हेरिकोज व्हेन्स आयुर्वेदिक उपचार/varicose veins in marathi ” कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.
Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात