उंदीर मारण्याचे घरगुती उपाय /उंदीर मारण्याचे औषध /उंदीर मारण्यासाठी औषध / undir marnyache gharguti upay >> घरात उंदीर होणे ही काही वेळेस अतिशय गंभीर स्वरूपाची समस्या बनू शकते, कारण एकदा जर का उंदराने घरात थैमान घातले तर मात्र त्यांना नियंत्रणात आणणे हे अतिशय कठीण जाते. अनेकदा आपण पाहतो की, बरेचजण उंदरांना घराबाहेर कसे घालवायचे किंवा उंदीर कमी कसे करायचे या चिंतेत असतात. उंदीर आपल्या महत्वाच्या सामानाची म्हणजेच धान्य, कपडे, कागदपत्रे अशा सामानांची नासधूस करतात, तसेच त्यांच्या पासून होणार्या घाणीचा अतिशय दुर्गंध येऊन आपल्या घरात आजारचे प्रमाण वाढू शकते. या साठीच या उंदिरांचा आपल्या घरात अतिरेक होणे आणि थैमान होणे याला आपण वेळीच आळा घातला पाहिजे त्यामुळे आपल्या बर्याचश्या समस्या सुटू शकतात. आपले घर आणि घरचा परिसर निरोगी राहू शकतो.
आपल्याला माहीतच आहे की, उंदीर हा सर्वात चपळ प्राणी आहे, उंदरांना पकडणे ही तर अशक्य प्राय गोष्ट आहे, परंतु आपण काही उपाय योजून या उंदारांना त्यांच्या जागेवरून आणि आपल्या घरातून नक्कीच बाहेर काढू शकतो. आपण पाहतो की, या उंदिरांच्या त्रासातुन मुक्त होण्यासाठी अनेकजन उंदीर मारण्याच्या औषधांचा वापर करतात पण त्यामुळे होते काय की उंदीर घरातच अडगळीच्या जागी मरुन पडतात आणि त्याचा अतिशय घाण वास सपूर्ण घरात पसरतो त्यामुळेच उंदिरांना घरातच मारण्यापेक्षा घराबाहेर पळवण्याचे उपाय करावे.
शिवाय मुक्या प्राण्याचा जीव न घेता या उंदरांना आपण काही घरगुती उपाय करून देखील घराबाहेर काढू शकतो. तर ते उपाय कोणते हे आपल्या पर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही आजचा लेख घेऊन येत आहोत. चला तर मग, उंदीर मारण्यासाठी कोणते घरगुती उपाय आपल्याला करता येतात ते आपण “उंदीर मारण्याचे घरगुती उपाय” या लेखात पाहुयात …..
Table of Contents
उंदीर मारण्याचे घरगुती उपाय/उंदीर मारण्याचे औषध/उंदीर मारण्यासाठी औषध(undir marnyasathi upay) :
उंदीर हे घरात झाल्यानंतर त्यांची देखील पैदास ही झुरळाप्रमाणेच जोमाने होते त्यामुळेच हे उंदीर आपल्या घरात झाले हे दिसताच आपण काही घरगुती उपाय करून त्यांचे प्रमाण वाढण्यापासून रोखू शकतो आणि उंदरांना आपल्या घराबाहेर, घरात न मारता पळवून लावू शकतो. मग चला तर पाहूया उंदीर मारण्याचे घरगुती उपाय कोणते आहेत ते –
पुदिना – undir marnyache gharguti upay
उंदरांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी पुदिना हा एक अत्यंत चांगला उपाय आहे. पुदिन्याचा वास उंदरांना बिल्कुल आवडत नाही आणि हा उग्र वास उंदराना सहन देखील होत नाही . कापसाचे तुकडे घेऊन ते पुदिन्याच्या तेलात बुडवा. आता हे तुकडे उंदीर जेथे जास्त दिसतात किंवा जेथे येण्याची शक्यता असते तेथे ठेवावे. तसेच उंदीर ज्या जागी येतात त्या जागेवर हे तेल शिंपडले तरी ही चालेल. पुदिन्याची पाणे उंदीर जेथे येण्याची शक्यता असते तिथे टाकावीत .पुदिन्याच्या वासामुळे उंदरांना भरपुर त्रास होतो, तसेच उंदराचा श्वास कोंडला जातो. त्यामुळे ते घराबाहेर जातात किंवा श्वास गुदमरून-गुदमरून ते ती जागा सोडतात आणि घराबाहेर जाऊन त्यांचा मृत्यू होतो .
बटाट्याची पावडर / बटाट्याची साल :
बटाट्याच्या पावडरीचा उपयोग करून देखील उंदरांचा त्रास कमी करता येतो. उंदीर ज्या जागी लपुन बसण्याची शक्यता असते त्या जागी बटाट्याची पावडर टाकावी. बटाट्याची पावडर खाल्ल्याने उंदरांच्या आतड्याला सुज येते आणि त्यांचा जागेवरच मृत्यु होतो. जर आपल्याकडे बटाट्याच्या सालची पावडर नसेल तर आपण बटाट्याची साल काढून टाकावी, त्यामुळे देखील उंदीर त्या जागी येणार नाहीत, आणि आपल्या घरातून पसार होतील.
कांदा : उंदीर घराबाहेर पळवते
जसा कांद्याचा वास माणसाला सहन होत नाही अगदी त्याच प्रमाणेच तो उंदरांना ही सहन होत नाही. उंदरांना ही कांद्याच्या वासाचा त्रास होतो. त्यातल्या त्यात जर खराब झालेला कांदा जर असेल तर त्याचा फायदा जास्त होतो. म्हणुन जर उंदरांचा अतिरेक कमी करण्यासाठी खराब कांदा कापुन तो उंदीर ज्या जागी असण्याची शक्यता असते त्या जागी ठेवावेत, त्यामुळे उंदरांच्या जीवाला त्रास होतो, आणि ते ती अडगळीची जागा सोडतात आणि त्यांचा मृत्यु होतो.
लाल मिरची पावडर : उंदीर मारण्याचे घरगुती उपाय
ज्या मार्गातुन उंदीर घरात येजा करतात त्या जागी थोडी लाल मिरची पावडर टाकावी .लाल मिरची पावडर मुळे आपल्याला जसा त्रास होतो तसाच उंदराला देखील त्रास होतो आणि त्यांना तिथे राहणे अशक्यप्राय होते. मिरची पावडर टाकलेल्या जागी उंदीर पुन्हा येताना दिसत नाहीत. अशाप्रकारे लाल मिरची पावडर वापरुन आपण उंदरांपासून मुक्ति मिळवू शकतो, ते देखील त्यांना घरात न मारता. उंदीर मारण्याचे घरगुती उपाय यात हा उपाय सर्वात उत्तम आणि सोपा आहे.
कोको पावडर :उंदीर मारण्याचे औषध
कोको पावडरचा उपयोग करून उंदरांचा नायनाट करता येतो. सुकलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये कोको पावडर मिसळून एकत्र करावे. उंदीर येण्याच्या जागेवर हे कोको पावडरचे मिश्रण टाकावे. हे मिश्रण खाल्ल्याने उंदीर काही सेकंदातचं मरण पावतात. तसेच कोको पावडरच्या वासाने उंदीर त्या जागी येत नाही. अशा प्रकारे आपण कोको पावडर चा उंदीर मारण्याचे औषध म्हणून वापर करू शकतो.
लसुण : उंदीर मारण्यासाठी औषध
लसणाच्या पाकळ्या पाण्यामध्ये एकत्र करून त्याची पेस्ट बनवुन घ्यावी आणि उंदीर ज्या ठिकाणी फिरतात त्या ठिकाणी ही पेस्ट टाकावी. लसणामुळे त्याच्या उग्र वासामुळे उंदीर आपोआपच आपल्या घरा बाहेर पळतात.
लसूण च्या पेस्टच्या जागी लसणाच्या पाकळ्या जरी ठेचुन टाकल्या तरी देखील त्याचा फयदा उंदीर पळूण जाण्यास मदत होते . अशाप्रकारे लसूण वापरुन आपण उंदरांचा आपल्या घरातील शिरकाव रोखू शकतो .
केस : उंदीर मारण्याचे घरगुती उपाय
माणसाच्या केसांचा गुत्ता किंवा केस उंदीर मारण्यासाठी आणि घराबाहेर पळवण्यासाठी उपाय म्हणून उपयोगी ठरतात. ज्या प्रमाणे आपण केस पोटात गेलेलं पचवू शकत नाही तसेच उंदीर देखील केस पचवू शकत नाही. त्यामुळे जर केस किंवा गुंता असेन त्या ठिकाणी उंदीर थांबत नाहीत, कारण जर चुकून काही कुरतडण्यात केस खाल्ला गेला तर उंदराचा मृत्यू होऊ शकतो. उंदीर येण्याच्या किंवा असण्याच्या जागी केसांचा गुंता टाकणे हा एक अत्यंत सोपा उपाय आहे उंदरांचा नायनाट करण्याचा. माणसाचे केस खावुन उंदराचा मृत्यु होतो. म्हणुन केसाचा गुत्ता उंदरांच्या बिळाबाहेर टाकावेत. त्यामुळे उंदीर घरात थैमान घालू शकणार नाहीत .
लवंग : undir marnyasathi gharguti upay
लवंगाच्या वासाचा उंदरांना त्रास होतो. एखाद्या कापडात लवंग गुंडाळून उंदरांच्या बिळाबाहेर ते कापड ठेवावे. त्याच्या वासाने उंदीर बिळाबाहेर पडत नाहीत आणि ती जागा सोडून पळून जातात. उंदीर हे लवंगचा वास सहन करू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या घराच्या अडगळीच्या जागी लवंग टाकाव्या त्याचा फायदा असा की , लसूण , पुदिना पाने, बटाटा साल , कांदा यांच्या सारखी लवंग खराब होत नाही आणि जास्त दिवस झाल्यानंतर खराब वास देखील सोडत नाही त्यामुळे या उपायचा आपल्याला देखील त्रास होत नाही.
शेण : उंदीर मारण्यासाठी औषध
शेणाचा वापर हा देखील उंदीर मारण्यासाठी एक चांगला उपाय म्हणुन केला जातो कारण शेण उंदीर पचवू शकत नाहीत म्हणुन उंदरांचा नायनाट करण्यासाठी उंदरांच्या बिळाबाहेर शेण ठेवावे. शेण खाल्ल्यामुळे उंदरांचा मृत्यु होतो आणि आपण उंदरांपासून मुक्तता मिळू शकतो . शेण हे शेतात किंवा दूध व्यवसाय करणार्या व्यक्तींकडे मिळू शकते.
तमालपत्री : उंदीर मारण्यासाठी उपाय
तमालपत्री ज्याला आपण तेजपत्ता असे ही म्हणतो त्याचा उपयोग ही उंदरांना मारण्यासाठी केला जातो. तमालपत्रीच्या गोड वासामुळे उंदीर त्याच्याकडे खेचले जातात आणि ते खातात आणि तमालपत्ती असणार्या गरम गुणधर्म असल्याने आणि तेजपणा मुळे ते मरण पावतात. तमालपत्ती देखील लवंग प्रमाणेच उंदीर पळविण्यासाठी अतिशय सोपी , योग्य आणि उपयोगी होणारी अशी आहे .
काळी मिरी
काळी मिरीचा वापर करून देखील उंदीर मारता येऊ शकते. काळी मिरी पावडर पाण्यात मिसळून ते पाणी उंदीर ज्या ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी शिंपडावे . कालिमिरी च्या उग्र वासाने देखील उंदीर त्या जागी राहत नाहीत आणि घराबाहेर पळून जातात, म्हणून याचा वापर करणे फायदेशीर ठरते.
सारांश -उंदीर मारण्याचे घरगुती उपाय/उंदीर मारण्यासाठी औषध/ उंदीर मारण्याचे औषध (undir marnyache gharguti upay/)
अशाप्रकारे वरील लेख “उंदीर मारण्याचे घरगुती उपाय ” यातील माहिती वापरुन आपण आपल्या घरातून उंदरांचा प्रादुर्भाव पुर्णपणे कमी करू शकतो, आणि हे उपाय उंदरांना मारण्यासाठी देखील उपयोगी येतील तसेच तुम्ही हे उपाय करून उंदरांना घरा बाहेर पळवून देखील लाऊ शकतो. वरील माहिती “उंदीर मारण्याचे घरगुती उपाय ” आपल्याला नक्कीच उपयोगी येईल.
आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, उंदीर मारण्याचे घरगुती उपाय /उंदीर मारण्याचे औषध/ उंदीर मारण्यासाठी औषध (undir marnyache gharguti upay) कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)