तांदळाची खीर कशी बनवायची – Best Recipe Of Tandalachi Kheer

तांदळाची खीर कशी बनवायची / तांदळाची खीर / खीर रेसिपी / tandalachi kheer recipe >>>> आपल्या कडे खीर ही सर्वांना अगदी प्रिय असते आणि मनातून आवडते. सन असो किंवा पाहुणे आलेले असो तंडाळची खीर गोड – धोड म्हणून हमखास बनवली जाते देवीच्या नैवैदयाला तर ही तांदळाची खीर म्हणजे पंचामृतच समजले जाते. आपण आजारी व्यक्तिला देखील ही तांदळाची खीर देत असतो कारण ही तांदळाची खीर पचायला देखील हलकी असते आणि चवीला देखील छान लागते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याने भूक देखील भागते.

आपण पाहतो की, आपल्या घरात जवळपास लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही तांदळाची खीर अगदी मनातून आवडते. सर्वांच्या घरी अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या खीर या बनवल्या जातात. केवळ दुधाची खीर म्हणजे बासुंदी , रव्याची खीर, गव्हाची खीर, शेवयाची खीर सुकामेवा वापरुन बनवलेली खीर, तांदळाची खीर. या सर्वात बनवण्यास सर्वात सोपी आणि चविष्ट तसेच आपली पूर्णपणे भूक भागवणारी खीर म्हणजे ‘ तांदळाची खीर’.

तांदळाची खीर कशी बनवायची / तांदळाची खीर / खीर रेसिपी / tandalachi kheer recipe
तांदळाची खीर कशी बनवायची

ही तांदळाची खीर घराघरात बनवली जाते परंतु तरी देखील अजूनही काही महिलांना अतिशय उत्तम अशा प्रकारची सुगरण सारखी खीर ही बनवता येत नाही. काही वेळेस ही तांदळाची खीर बनवत असताना त्याच्या गाठी तरी बनतात किंवा खीर अगदी गच्च आणि घट्ट बनते त्यामुळेच तुमची ही समस्या दूर करण्यासाठीच आम्ही हा लेख घेऊन येत आहोत

तांदळाची खीर कशी बनवायची

आपण पाहतो की , कुठलीही रेसिपी बनवायची रेसिपी ही प्रत्येक व्यक्ति अगदी वेगवेगळ्या वापरत असतो, आणि

तांदळाची ही खीर बनवण्यासाठी ची उत्तम रेसिपी आम्ही तुमच्या साठी घेऊन येत आहोत आणि त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे आहे –

तांदळाची खिर बनवण्यासाठी लागणारे साहित्य

उत्कृष्ठ अशी तांदळाची खीर बनवण्यासाठी खालील साहित्य वापरावे.

तांदळाची खीर / खीर रेसिपी / tandalachi kheer recipe
साहित्य

१) सुवासिक तांदूळ – साधारण 10 चमचे घ्यावे.

२) एक लिटर दुध – पाणी न टाकलेले घ्यावे.

३) साधारण अर्धी वाटी साखर – आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त देखील घेऊ शकता. जर आपल्याला शुगर फ्री बनवायची असेल तर साखर न टाकता शुगर फ्री टॅब्लेट देखील आपण त्यात टाकू शकता.

४) एक चमचा जायफळ पावडर – आपल्याला आवडत नसेल तर आपण कमी टाकावी.

५ विलायची ची पूड – साधारणपणे एक चमचा घ्यावी.

६) काजू,बदाम,मनुके आणि चारोळी थोड्या प्रमाणात अंदाजे घ्या – सजावटी साठी वापरावी.

वरील आम्ही सांगितलेले सर्व साहित्य हे योग्य प्रमाणात वापरुन आपण उत्कृष्ठ अशा प्रकारची तांदळाची खीर आपण घरच्या घरी बनवू शकता.

तांदळाची खीर / खीर रेसिपी / tandalachi kheer recipe

वरील सर्व साहित्य वापरुन तांदूळ पासून खीर बनवण्यासाठी आपण खाली आम्ही सांगितलेली कृती करावी आणि सर्वांच्या आवडीची अशी खीर बनवावी. चला तर मग बघूया हे सर्व साहित्य वापरुन तांदळाची खीर काशी बनवायची त्याची कृती / मराठी रेसिपी काय आहे ते.

खीर रेसिपी / tandalachi kheer recipe
तांदळाची खीर

१) सर्वप्रथम आपण जास्त क्रीम असलेले दूध घ्यावे, आणि ते एक स्वच्छ पातेल्यामध्ये काढून मंद गॅस वर गरम करायला ठेवावे. दूध तापत असताना त्यामध्ये पाणी टाकू नये कारण खीर साठी घट्ट दूध हवे.

२) आता तुम्ही साधारणपणे छोटे १० चमचे तांदूळ घ्यावे आणि ते स्वच्छ धुवून ठेवावे.

३) आता ते तांदूळ एका भांड्यामध्ये साधारण पंचवीस ते तीस मिनिटे भिजत ठेवावे. भिजवल्या मुळे आपल्याला नंतर जास्त शिजू देण्याची गरज नाही पडणार.

४) त्यानंतर भिजलेले तांदूळ मिक्सर मध्ये टाकून हलकेसे बारीक करून घ्यावेत, जरा हाताला चरबट लागतील इतक्या प्रमाणात बारीक करावेत. जास्त बारीक करू नये , नाहीतर खीर छान मोकळी होत नाही.

५) हे सर्व करत असताना गॅस वर गरम करायला ठेवलेले दूध ढवळत राहावे अन्यथा दूध उतू जाऊ शकते किंवा आटून भांड्याच्या बुडाला  लागू शकते. त्यामुळे करपट वास देखील खीर लागू शकतो.

६) दूध बुडाला लागू नये म्हणून दुधाच्या पातेल्यात एक लहान चमचा टाकून ठेवा,असे केल्याने दूध आटत असताना बुडाला लागत नाही.

७) त्यानंतर दुधाच्या अंदाजे ४ ते ५ उकळ्या येऊन द्याव्या. जेवढे दूध होते त्याच्या अंदाजे अर्धे दूध होऊ द्यावे.

८) आता त्या उकळलेल्या दुधा मध्ये आपण मिक्सर वर बारीक करून घेतलेले तांदूळ हळू हळू सोडावेत. त्यावेळी गॅस हा मध्यम आचेवर असावा.

९) हे बारीक केलेले तांदूळ दुधात सोडताना एका पळीने दूध सतत ढवळत राहावे. जेणे करून तांदळाचा एकाच ठिकाणी गट्टा होणार नाही. पूर्ण खीर एकसारखी बनेल.

१०) दूध आणि तांदूळ साधारण पणे तीस ते पस्तीस मिनिटे मंद गॅस वर ठेवावे म्हणजे त्यातले आपण बारीक केलेले तांदूळ हे पुर्णपणे शिजतील.

१२) या तीस पस्तीस मिनिटात दूध सतत ढवळत राहावे कारण असे नाही केल्यास तांदूळ त्या पातेल्यात खालीच राहतील आणि दूध वरती.

१३) हे तीस मिनिटे झाल्यावर दुधातील तांदूळ पळीने वर काढून बघा मऊ झाले आहेत का नाही म्हणजे शिजले की नाही. नसतील झाले तर ते मऊ होई पर्यंत मंद गॅस वर ठेवावे.

१४) दुधातील तांदूळ मऊ झाल्यावर म्हणजे पुर्णपणे शिजल्यावर त्यामध्ये चवी नुसार आणि आपल्या आवडी नुसार कमी जास्त प्रमाणात साखर घालावी.

१५) खिरीमध्ये साखर घातल्यानंतर दूध,तांदूळ आणि खिरीचे हे मिश्रण अजून साधारण ५ मिनिटे मंद गॅस वर उकळू द्यावे.

१६) खिरीला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा.

१७) आता काजू,बदाम,मनुके(किसमिस) आणि चारोळी घ्यावेत.

१८) यातील काजू आणि बदाम यांचे बारीक काप करून घ्यावेत.

१९)  एक छोटी कढई घ्या त्यामध्ये साजूक तूप टाकून ते थोडे गरम करून घ्या,गरम झाल्यानंतर त्या मध्ये पहिल्यांदा बदाम टाकून तळून घ्यावेत आणि नंतर काजू टाळावेत.

२०) यानंतर मनुके देखील चांगले लालसर रंग येई पर्यंत तुपात तळून घ्यावेत.

२१) आता हे चांगले तळून घेतलेले काजु,बदाम आणि मनुके खिरी मध्ये टाकावेत आणि नंतर खिरीच्या वरून थोडे चारोळी देखील टाकावेत.

२२) खिरीच्या उत्तम रंग आणायचा असेल तर त्या मध्ये थोडेसे केसर देखील टाकावे.आधी केसर थोड्या दुधामध्ये टाकून साधारण ५ मिनिटे ठेवावे,आणि मग ते दूध खिरी मध्ये टाकावे.खिरीला छान असा नारंगी रंग येईल.

२३) हे सर्व खिरी मध्ये टाकल्या नंतर खिरीला अजून एक ते दोन उकळी येई पर्यंत गॅस वर ठेवावे.

२४) आता गरम करायला ठेवलेल्या खिरी मध्ये जायफळ आणि विलायची पूड टाकावी,जायफळ आणि विलायची पूड टाकल्याने खिरीचा स्वाद आणखीन चांगला होतो. जायफळ आणि विलायची टाकल्यावर खीर वर झाकून ठेवावे त्यामुळे खीर चा स्मेल बाहेर जाणार नाही.

२५) विलायची तुम्ही हलकीशी तव्यावर गरम करून घेऊ शकता असे केल्याने खीर अजून स्वादिष्ट होते.

अशा प्रकारे वरील कृती वापरुन आपण खीर बनवावी

खीर बनवताना काही महत्वाच्या टिप्स

उत्कृष्ठ अशा प्रकारची तांदळाची खीर बनवण्यासाठी आपण काही टिप्स वापराव्या त्या खालील टिप्स आहेत –

 १) जायफळ चा मुळात गुणधर्म असतो की डोके शांत व्हावे आणि झोप लागावी त्यामुळे खीर मध्ये जायफळ टाकताना ते थोडेच टाकावे कारण जायफळ टाकल्या मुळे झोप येते.

२) शक्यतो ही तांदळाची खीर करताना साध्या तांदूळ एवजी सुगंधित चेंनुर हा तांदुळ आपण वापरावा,हा तांदूळ वापरल्याने, आपल्या तांदळाच्या खिरीची चव ही खूप अप्रतिम होते.हा तांदूळ जर उपलब्ध नसेल होत तर बासमती तांदूळ देखील वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडी नुसार कोणताही तांदूळ वापरू शकता.

३) आपली छान अशी तांदळाची खीर ही तयार झाल्यानंतर आपल्याला खीर सजावट करायची असेल तर वरून पुन्हा थोडे काजू आणि बदामाचे काप खीर वर घालावेत. वाटल्यास आपण छान केशर देखील टाकू शकता. त्यामुळे खीरीची चव आणि आकर्षकता देखील वाढेल.

अशा प्रकारे आपण आमचा आजचा हा लेख वाचून, आम्ही सांगितलेले तांदळाच्या खीर चे साहित्य आणि खीर बनवायची रेसिपी वापरुन तांदळाची खीर बनवावी. आपली खीर नक्कीच अगदी उत्तम बनेल यात काही शंकाच नाही.

सारांश – तांदळाची खीर कशी बनवायची

आपल्याला जर तांदळाची उत्तम अशी खीर बनवायची असेल तर आपण आमच्या या खीर कशी बनवायची या लेखातील रेसीपी वाचून बनवू शकता. आपल्याला आमच्या या लेखातील माहितीचा नक्कीच फायदा होईल.

आपल्याला  “तांदळाची खीर कशी बनवायची / खीर रेसिपी या विषयी ची माहिती कशी वाटली, आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top