टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे / Takau pasun tikau vastu banvane / टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु / टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवणे >> ही एक हस्तकलेवर आधारीत आणि आपल्या गतिशील विचारांना प्रेरीत करणारी एक प्रेरणा आहे . आपण कधी विचार केला का ,की टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु चा शोध कसा लागला असेल ? अहो उत्तर सोप आहे. ‘‘ वापरा आणि फेका ‘‘ या संकल्पनेला आळा घालण्यासाठी ,या वृत्तीचा नायनाट करण्याचा उद्देश सफल करण्यासाठी आणि हानिकारक वस्तु पासून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी , एक सामाजिक कार्यशाळा हाती घेऊन राबविलेला एक कार्यक्रम , म्हणजे ” टाकाऊ पासून टिकाऊ ” असे म्हणण्यास काही हरकत नाही.
‘ वापरा आणि फेका ‘ यामुळे आपल्या पर्यावरणाची किती प्रमाणात हानी होते याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. त्यामुळे ‘‘टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु‘‘ हा प्रकल्प राबविण्याचा , आणि वस्तु बनविण्याचा प्रघात मोठया प्रमाणात वाढत आहेत , त्यामुळे ब-याच लोकांना रोजगार मिळतो आणि अर्थाजनाचे माध्यम ही बर्याच प्रमाणात उपलब्ध होते तसेच आधीच्या वस्तूंचा पुरेपूर वापर देखील होतो .
शैक्षणिक उपक्रमांत देखील गांधीजीनी 3H = Head, Hand , and Heart वापरले , ते या ठिकाणी अगदी तंतोतंत उपयोगी येते . 3H म्हणजे Head (डोक / बुद्धी ) , Heart ( मन ) आणि Hand ( हात ) अशाप्रकारे आपली बुद्धी ,मन आणि आपल्या हाती असलेले कौशल्य वापरुन तुम्ही वस्तु बनवा . ज्यांनी आपल्या आयुष्यात महात्मा गांधीजीनी सांगीतलेल्या हया 3H चा उपयोग केला आणि हे 3 H आपल्या कलेत आत्मसात केले त्यांनी टाकाऊ वस्तुंपासुन टिकाऊ वस्तु बनविण्यात अग्रेसर राहण्याचे स्थान नक्कीच पटकावले .
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु बनविल्याने कंपोस्ट न होण्यासारखे पदार्थ, वस्तु किंवा साहित्य हे वापरात येईल आणि आपल्या निसर्गाला, निर्सगातील घटकांना व आपल्या पर्यावरणाला हानी देखील पोहचणार नाही . हा ‘ टाकाऊ पासून टिकाऊ ‘ या संकल्पनेचा महत्वाचा फायदा होतो .
अशा अनेक गोष्टी असतात ज्या अगदीच फेकुन देण्यायोग्य , टाकुन देण्यायोग्य असतात : पंरतु आपण आपले डोके हात आणि मन यांचा वापर करून , त्याला अगदी नविन वस्तु म्हणुन नावारूपाला आणु शकतो आणि त्याच्यातून काही तरी नवनिर्मिती करू शकतो .
चला तर मग पाहुया , आपल्या आजच्या या लेखात ‘टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु‘ कशा बनवाव्या ? वापरलेल्या वस्तु चा पुनरुपयोग कसा करावा ? आणि आपली कलाकुसर कशी उपयोगी आणावी ? आजच्या काळात तर असे बरेच क्लासेस आहेत जिथे आपण आपल्या अंगी असलेली कला कशी वापरावी हे शिकवले जाते आणि आपल्या घराला सुशोभित करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तु कशा बनवायचे या बाबत मार्गदर्शन केले जाते . पुढील लेखात जाणून घेऊया , टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु कशा बनवाव्या या विषयीची माहिती ।
Table of Contents
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे / टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु कशा बनवायच्या / Takau pasun tikau wastu banvne :-
दैंनदिन जीवनात आपण पाहतो की , कितीतरी वस्तु अशा असतात ज्या आपण वापरतो आणि नंतर टाकुन देतो. चला तर बघुया , त्या वस्तु वापरल्यानंतरही न टाकता आपण त्याला कसे नवे रूप, आकार देवु शकतो , आणि त्याचा परत वापर करून घेऊ शकतो ह्याच बाबतची अधिक माहिती आपल्या पर्यन्त पोहचविण्या साठीच आम्ही आजचा लेख घेऊन येत आहोत ” टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु बनविणे / टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु कशा बनवायच्या (Takau pasun tikau wastu banvane)” या अतिशय उत्स्फूर्त करण्यार्या आणि उपयोगी येणार्या अशा विषयावर . चला तर मग बघूया , काय म्हणते आजची माहिती , आणि कोणत्या – कोणत्या नावीन्यपूर्ण गोष्टी आपण यातून शिकू शकतो .
1. आईस्क्रीमच्या कांड्यांपासून वस्तु बनविणे :-takau pasun tikau vastu
उन्हाळा आला कि आईस्क्रिम खाण्यापासून आपण स्वतःला आणि लहान मुलांना रोखु शकत नाही . गरमीच्या वातावरणात थंड आईस्क्रिमची रेलचेल सुरू होते आणि आपण आईस्क्रिम खातो व त्याच्या काडया टाकुन देतो ; पण या आईस्क्रिमच्या काडयांपासुन आपण बर्याच शोभेच्या वस्तु घरच्या घरी बनवू शकतो . चला तर बघूया ,की आपण आइसक्रीम च्या काड्यांपासून काय काय बनवु शकतो .
(अ) आईस्क्रिमच्या कांडयाचे शोपिसः-
आईस्क्रिमच्या काडयाचे शोपिस बनविण्यासाठी लागणारे साहीत्य -फेव्हिकॉल, आईस्क्रिमच्या काडया, शो चे मनी, लेस, शो वेगवेगळ्या आकाराचे काच.
कृती – आईस्क्रिमच्या चार काड्या थोड्या अंतरावर आडव्या ठेवाव्या आणि त्यावर तश्याच अंतरावर चार कड्या उभ्या फेव्हीकोल ने चिटकवाव्या .म्हणजे 4 आडव्या आणि 4 उभ्या कड्यांचा बॉक्स बनवावा . असे एकूण 9 बॉक्स बनवावे . आणि एका लेस च्या साह्याने वर 1 बॉक्स चिटकवावा , त्या खाली 2 बॉक्स ,त्याखाली 3 बॉक्स , नंतर परत 2 बॉक्स आणि शेवटी 1 बॉक्स चिटकवावा , असे एकूण 9 बॉक्स चिकटवावे आणि वरील शोच्या साहित्याने त्याला सजवावे. सुंदरअसे वॉलपीस झाले ना तयार !
(ब ) आईस्क्रिम कांडयाचा फलॉवरपॉटः–
आईस्क्रीमच्या काड्यांचा फ्लॉवरपॉट बनविण्यासाठी लागणारे साहित्य – फेव्हिकोल , आईस्क्रिमच्या काडया , हिरवी पाने आणि असतील तर रंग बेरंगी फुले .
कृती – सर्वप्रथम खाली त्रिकोणी आकारात आईस्क्रिमच्या काडया ठेवुन चिकटवाव्या नंतर तसाच त्रिकोणी शेप देत थोडया-थोडया अंतरावर पुढे -पुढे बाकीच्या काडया फेव्हिकॉलनी मांडत जाव्या . असे करत तीन चार वेढे पुर्ण करावे आणि आपला सुंदर असा फलॉवरपॉट तयार ! मग त्यात झाडाची छाटणी केलेले हिरवी पाने व एखादे फुल ठेवावे आणि सुंदर अशा आइसक्रीम फ्लोवरपॉट ने आपल्या घराची शोभा वाढवावी .
अशा प्रकारे आपण टाकाऊ आइसक्रीम काडी पासून टिकाऊ फ्लोवरपॉट आणि शोपीस बनवू शकतो . घराच्या एखाद्या कोपर्यात हा फ्लॉवर पॉट ठेवावा आणि हॉल किंवा बेडरूम मध्ये समोरच्या भिंतीवर शो पीस लावावे त्याने आपल्या घराची शोभा नक्की वाढेन ॰
2. प्लास्टिक बॉटल पासुन फुले बनविणेः–
प्लास्टिक बॉटल आपण वेगवेगळी शीतपेये पिवुन फेकून देतो किंवा प्रवासात पाणी बॉटल घेवुन पाणी पितो आणि फेकून देतो . परंतु त्या टाकाऊ प्लॅस्टिक बाटली पासून आपण , फुलांच्या आकारात बॉटलच्या साईडच्या पाकळया बनवाव्या आणि झाकण असलेल्या बॉटलला गोलाकार फुलाचा आकार देवुन बाकीचे फुले ग्लुगनने चिकटवावे. अशाप्रकारे आपण टाकाऊ प्लॅस्टिक बाटली पासून सुंदर असे फुले बनवू शकतो .
त्याच बरोबर ,जर जुन्या बॉटल्स असतील तर त्याचा उपयोग या बाटल्या मधुन कापुन त्यामध्ये माती भरून सुई दो-याला एकाखाली एक ओवुन माळ बनवावी व रोपे लावावी . आपल्या बाल्कनीत सुंदर असे कुंडे म्हणून आपण याचा वापर करू शकतो आणि छोटी छोटी झाडे यात लाऊ शकतो .
3. काडीपेटीचे शोपिसः- सुंदर अशी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु
आपल्या रोजच्या जीवनात काडीपेटीचा वापर तर होतोच . काडी पूर्ण न जळताच आपण विझवून फेकून देतो , त्या वापरल्या नंतर फेकून न देता , जुन्या एखाद्या पृष्ठाला गोलाकार कट करावे व त्यावरती वापरलेल्या काडीपेटी गोलाकार थोडया अंतरावर चिकटवाव्या आणि नंतर ते गोल एका खाली एक एक सुंदर अशा लेसला चिटकवावे आणि त्याला मणी, मोती काचा, ग्लिटर याने डेकोरेट करावे .आपल्या लिविंग रूम किंवा घरच्या समोरील भिंतीवर ते लावावे.
4. जुन्या मुलांच्या कपडयांपासुन पिशवी बनविणेः-
आपण पाहतो की लहान मुलाचे कपडे लवकर खराब होतात , किंवा मुले मोठी होतात आणि कपडे लहान होतात असे बर्या पैकी लहान मुलांचे ड्रेस, फ्राॅक असतील तर , त्याच्या बाहया काढुन शोल्डरपासुन स्लिव्हलेस भाग आणि त्याखाली 10-12 इंचचा भागा सोडुन तो ड्रेस कट करावा. खाली तळाला लंबगोल कापड लावुन त्याची पिशवी शिवावी व भाजीपाला थोडे छोटे मोठे सामान आणण्यास वापरावी . अशी पिशवी दिसण्यास देखील आकर्षक दिसते . आणि वापरात देखील येते ॰
5. जुन्या बांगडयापासुन शोपिसः-
जुन्या वापरलेल्या बांगडयाना लोकरने पुर्ण झाकावे , त्यावर बांगडयाच्या कडाने लोकर गुडांळावी अशा 10-12 बांगडया बनवाव्या नंतर कडांनी एकमेकांना जोडाव्या व त्याला मध्ये 3 वर 2 आणि त्यावर 1 याप्रकारे जोडावे आणि बांगडीमध्ये प्रत्येकी 3 मोती याप्रमाणे 1 मोठी 2 छोटया अशा बांगड्या जोडाव्या . त्यास सजावटी साठी काही सामान असेन तर तेही लावले .
आहे की नाही गंमत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु बनविण्यात , आणि आपण आपल्या हाताने बनविलेल्या वस्तु पाहण्यात आणि वापरण्यात जी मज्जा असते ती बाजारातून आणलेल्या इतर वस्तू मध्ये देखील वाटत नाही . अशा प्रकारे तुम्ही तुमची कलाकुसर आणि वापरण्या जोगे नसणार्या वस्तूंपासून नवीन टिकाऊ वस्तु बनवू शकता आणि तुमच्या घराला सुशोभित करू शकता.
सारांश – Takau pasun tikau vastu /टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु कशा बनवायच्या / Takau pasun tikau wastu banvane
या आमच्या वरील लेखात सांगितलेली टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु बनविण्याची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेन आणि उपयोगी देखील येईल , यात काही शंका नाही . आम्ही वर सांगितलेल्या वस्तु तुम्ही जरूर घरी बनवून बघा तुम्हाला त्याचा आनंदही होईल आणि फायदा देखील होईल आणि त्याचसोबत तुमच्या घराची शोभा देखील वाढेल .
आपल्याला वरील लेखामध्ये सांगितलेल्या घरगुती टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु /टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु कशा बनवायच्या या विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो .
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)