टाच दुखीवर उपाय | टाच दुखी वर घरगुती उपाय | टाच दुखी ची कारणे | टाच दुखीवर आयुर्वेदिक औषध / tach dukhane upay marathi / Remedies For Heel Pain | Causes Of Heel Pain | Products to Reduce Heel Pain >> हल्ली माणसाच्या या धावपळीच्या युगात अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत असते. जसे की पोट दुखी, कंबर दुखी, पाठ दुखी, पाय दुखणे आणि त्याच बरोबर पायांच्या टाचा दुखणे. या अशा अनपेक्षित सुरू होणार्या टाच दुखी ची कारणे कोणती आहेत, तसेच टाच दुखीवर उपाय / घरगुती उपाय कोणते करता येऊ शकतात आणि यांखेरीस टाच दुखी वर आयुर्वेदिक औषध कोणते घेतले पाहिजे तसेच टाच दुखी कमी करण्यासाठी वापरायची उत्पादने या बाबतची सविस्तर माहिती या लेखा मध्ये आपण बघणार आहोत.
Table of Contents
टाच दुखीवर उपाय | टाच दुखी ची कारणे | टाच दुखीवर आयुर्वेदिक औषध ( Remedies For Heel Pain | Causes Of Heel Pain | Products to Reduce Heel Pain)- माहिती
सुरवातीला आपण टाच दुखीवर घरगुती उपाय कोणते आहेत ते बघूया त्यानंतर टाच दुखी ची कारणे, आणि या लेखाच्या शेवटी टाच दुखीवर औषध कोणते वापरले जाऊ शकते ते पाहुयात. चला तर मग जाणून घेऊयात टाच दुखीवर उपाय, त्याची कारणे आणि त्यावर औषध.
टाच दुखीवर घरगुती उपाय (Remedies For Heel Pain)
१. आराम देणारी स्लीपर वापरा
टाचा दुखणे हा एक वाताचा प्रकार आहे.त्यामुळे खुप वेळेस थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजे हिवाळा किंवा पावसाळा हया ऋतुमध्ये टाचदुखण्याचा त्रास होतो. किंवा घरात असणार्या थंड फरश्यां किंवा टाईल्सच्या अति संपर्कात पाय आल्यामुळे देखील टाचा दुखतात. त्यामुळे घरात नेहमी एक मऊ आणि पायाला आराम देणारी स्लीपर वापरावी याने टाचा दुखणार नाहीत.
२. मीठ आणि कोमट पाण्याने पाय शेका – टाच दुखीवर उत्तम उपाय
मीठ आणि कोमट पाणी हे टाच दुखी थांबवण्यास बर्याच प्रमाणात मदत करते कारण गरम पाण्याने अतिशय आराम मिळतो त्यामुळे जर टाच दुखत असेल तर टाच दुखीवर उपाय म्हणून बादली किंवा टप मध्ये कोमट पाणी घ्यावे, त्यामध्ये खडे मीठ टाकावे आणि पंधरा ते तीस मिनिटे या पाण्यात पाय टाकुन बसावे. या पाण्यामुळे पायांना शेक मिळतो असे केल्याने टाचदुखीपासुन निश्चित आराम मिळेल.
३. गोडेतेल आणि मीठ
गोडतेल आणि मिठ घ्यावे हे देखील नसा मोकळ्या करण्यास मदत करते, हे दोन्ही चांगले मिसळून घ्या आणि याचा लेप तयार करावा. आणि नंतर हे मिश्रण टाचेला लावा. हे मिश्रण व्यवस्थित टाचेला लावल्यानंतर मग टाच सुती कपडयाने बांधुन ठेवावी, म्हणजे पायाला थंड हवा लागू नाही द्यावे, त्यामुळे गरम वाफ निर्माण होऊन याने टाच दुखण्याच्या त्रासापासुन आराम मिळेल.
४. गरम विटेने टाच शेका
विटेचा थोडासा तुकडा गरम करून घ्यावा, त्यानंतर त्या विटेवर रूईचे पाण बांधावे आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागावर दयावा. हे करत असताना पायाला पोळणार नाही याची काळजी घ्यावी.टाच दुखीवर उपाय म्हणून हा प्रयोग तुम्ही सलग ५ ते ७ दिवस केल्यास तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. विट गरम केल्यानंतर त्याचा एकदम छान शेक बसतो आणि आराम मिळतो.
५. टाचांना बर्फाचा शेक देणे – टाच दुखी वर घरगुती उपाय
टाचांना गरम विटेचा शेक देणे जर तुम्हाला शक्य नसेल तर टाचांना बर्फाचा शेक दयावा. बर्फाच्या गारपणामुळे पेशीत निर्माण झालेला ताण कमी होतो. आणि मग दुखत असलेल्या टाचांपासुन आराम मिळण्यास मदत मिळते. तसेच हा उपाय दिवसातुन एकदा करावा. साधारणपणे पंधरा मिनिटे बर्फाने दुखत असलेल्या टाचेला शेकावे, टाच दुखी पासून तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
६. हळद
आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे मानवी शरीरासाठी हळद ही खुप गुणकारी अशी औषधी आहे. हळदीमध्ये असलेले कम्र्युमिन तत्त्वामुळे दुखत असलेल्या टाचा, किंवा टाचांना सुज आली असेल तर हळदीमुळे आराम मिळु शकतो. यासाठी साधारण एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद घालुन, दहा मिनिटे मंद आचेवर गरम करून घ्यावे. नंतर या हळदीच्या दुधामध्ये एक चमचा मध घालुन हे दुध पिऊन घ्यावे. यामुळे टाचांचेच दुखणे नाही तर इतर ही शरीराचे दुखण्यापासुन आराम मिळण्यास मदत होते.
७. बॉलचा व्यायाम
हात दुखणे, शौल्डर दुखणे, किंवा इतर कोणत्याही मस्कूलर दुखण्यासाठी बॉल चा व्यायाम करणे अतिशय लाभदायक ठरतो बसुन छोटा बॉल टांचाखाली ठेवावा. आणि तो बॉल टाचांच्या मदतीनेच मागे पुढे करावे. असा व्यायाम रोज सकाळी व संध्याकाळी किमान पाच मिनिटे तरी हा व्यायाम केल्याने टांचाचे दुखणे हे नक्कीच महिन्याभरात कमी होते.
८. निरगुडी ची पाने
निरगुडीचे पाने ही देखील पायच्या, गुडघ्याच्या किंवा टाचाच्या दुखण्यावर रामबाण उपाय आहे त्यासाठी निरगुंडी ची पाने घ्या आणि हे पाने गरम पाण्यामध्ये बुडवून घ्यावेत आणि या पानांनी पायांच्या टाचांना शेक दया याने टांचाचा दुखण्याचा त्रास कमी होईल.तसेच रक्तप्रवाह देखील सुरळीत चालतो.
९. मोहरीचे तेल
टाचा नेहमीच जर दुखत असतील तर सरसोच्या म्हणजेच मोहरीच्या तेलाने किंवा खोबर्याच्या तेलाने पायांच्या टाचांची मसाज करावी. याने मसाज केल्याने नसा मोकळया होण्यास मदत होते आणि पायाचा आणि टाचेचा रक्तप्रवाह हा सुरळीत चालण्यास मदत होते आणि मग टाचांचे दुखणे कमी होते. त्यामुळे या त्रासावर मोहरीचे तेल हा उत्तम पर्याय आहे.
१०. बोटांवर चालायचा व्यायाम
काही असे व्यायाम असतात ज्याने टाचदुखीचे दुखणे कमी होऊ शकते. भिंतीला हात टेकवुन पायांच्या बोटांवर उभे रहावे आणि पायांच्या टाचा वर उचलाव्यात आणि अशा स्थितीत मग जागच्या जागी पायांच्या नुसत्या बोटांवरच चालावे जॉगिंग करावी याने टाचांना बराच आराम मिळु शकतो. टाच दुखीवर उपाय म्हणून तुम्ही हा व्यायाम घरच्या गहरी करू शकता.
तसेच अजुन एक व्यायाम म्हणजे पायांच्या बोटानेच कापड अथवा टॉवेल जवळ आणण्याचा प्रयत्न करणे. या व्यायाम प्रकारा मध्ये जमिनीवर टॉवेल पसरावा आणि त्यावर पाय ठेवुन पायांच्या बोंटाच्या मदतीने टॉवेल चे एक टोक आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करावा याने टाचांना ताण पडतो आणि मग टाचांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
११. तिळाचे तेल
झोपण्याआधी टाचांची तिळाच्या तेलाने मालीश करावी आणि ही मालीश झाल्यानंतर थोड्यावेळाने पाय गरम पाण्याने धुवून टाकावेत आणि टाचांना गरम कपडयाने बांधुन ठेवावे किंवा मग गरम सॉक्स घालावेत. याने नक्कीच टाचांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.टाच दुखीवर उपाय म्हणून तुम्ही तिळाच्या तेलाचा अशा प्रकारे उपयोग करू शकता.
१२. कोरफड
कोरफड ही वनस्पती मानवी शरीरासाठी अत्यंत गुणकारी असून, टाच दुखीवर उपाय म्हणून देखील कोरफड वापरली जाते. रिकाम्यापोटी सकाळी सकाळी कोरफडीचा गर काढुन तसाच खाऊन घ्यावा किंवा कोरफडीचा रस पिवुन टाका याने टाचदुखीच्या समस्यांपासुन आराम मिळु शकतो. कोरफड ही अतिशय मऊ आणि स्निग्धात असणारी असल्याने, याच्या साहाय्याने मालीश अगदी उत्तम होते.
१३. मेथीचे दाणे व हळद
मेथीचे जे दाणे असतात त्यांची पावडर तयार करून घ्यावी आणि ती हळदीच्या पावडर मध्ये मिक्स करावी. ही मिक्स केलेली पावडर गरम पाण्यात टाकुन प्यावी. याने टाचदुखीचा त्रास काही दिवसातच कमी होईल. मेथी ही शरीरासाठी आणि शरीरावरील त्वचेसाठी देखील उपयोगी ठरणारी अशी आहे.
१४. धने,जिरे आणि लिंबू
साबुत धने आणि जिरे एक ग्लास पाण्यात टाका आणि ते पाणी अर्धा ग्लास पाणी होई पर्यंत उकळुन घ्या नंतर त्यामध्ये खडीसाखर किंवा लिंबू टाकुन पाणी पिऊन घ्यावे. हा उपाय रोज सकाळी चहाच्या ऐवजी करावा. हा उपाय फक्त पंधरा दिवस केल्याने टाचांचे दुखणे कमी होण्यास मदत होईल आणि टाच दुखीवर नक्कीच आराम मिळेल.
हे होते टाच दुखीवर उपाय आता आपण नेमके ही टाच दुखी होतेच कशामुळे ते जाणून घेऊयात, चला तर मग जाणून घेऊयात टाच दुखी ची कारणे कोणती कोणती आहेत.
टाच दुखी ची कारणे / टाच दुखणे कारण (Causes Of Heel Pain)
१) ज्या लोकांना सतत उभा राहण्याचे काम असते. त्याचबरोबर ज्यांचे वजन जास्त असते, अशा व्यक्तींना टाचदुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच पायांमध्ये आरामदायक चप्पल किंवा बुट नसेल किंवा जास्त प्रमाणात उंच टाचाच्या चपला किंवा सॅंडल घालण्यात येत असतील तरी देखील टाच दुखी चालु होते.
२) अपघातामध्ये जर टाचांच्या हाडांना इजा झालेली असेल, जसे की फ्रॅक्चर, किंवा टाचेच्या हाडांची अवास्तव वाढ हयामुळे टाचांमध्ये मोठया प्रमाणात वेदना होतात. जर काही वेळेस टाचेला काही कारणाने सुज आली तरी देखील टाचा दुखतात.
३) अनेकदा संधिवातामुळे किंवा टाचांच्या स्नायुंना जर दुखापत झाली, तरीदेखील टाचांना त्रास सुरू होतो.
४) ज्या लोकांचे पायांचे तळवे (तळपाय) सपाट असतात आणि तळव्यांची कमान म्हणजे मधला भाग कमी असतो अशा लोकांना टाच दुखीचा त्रास जास्त प्रमाणात उद्भवतो.
५) गर्भधारणेच्या काळामध्ये स्त्रियांचे वजन अचानक वाढते, मग पुर्ण शरीराचा भार पायांवर येवुन पडतो आणि मग टाचा दुखायला सुरवात होते. सतत पळणे, ट्रेकींग करणे यामुळे सुध्दा टाचा दुखतात. तसेच एथलेटिक्स लोकांना सुध्दा टाच दुखीचा त्रास होतो. कारण पळतांना त्यांच्या तळव्यांवर ताण येतो आणि मग टाचा सुध्दा दुखतात.
६) प्लांटर फॅसिटायटिस हा एक टाचदुखीचा आजार आहे, या आजारामध्ये टाचे मध्ये अतिशय तीव्र वेदना होतात. कोणत्याही प्रकारची हालचाल न करता आपण जेव्हा चालायला उठतो तेव्हा हा टाच दुखीचा त्रास जाणवतो.
टाच दुखीवर आयुर्वेदिक उपाय / औषध व टाच दुखी पासून आराम मिळण्यासाठी काही उत्पादने (Products to Reduce Heel Pain)
१) Heel Pain Relief Silicone Gel Heel Socks
२) Silicone Gel Heel Pad Socks
३) Heel cups Silicon Heel Pad for Heel Ankle Pain
४) Dr. Ortho Pain Relief Oil, 60ml
सारांश – टाच दुखणे उपाय | कारणे | आयुर्वेदिक औषध / उत्पादने
आपल्याला जर टाच दुखीचा त्रास होत असेन तर वरील लेखामध्ये दिलेले टाच दुखीवर उपाय तुम्ही करू शकता,तसेच बाजारात काही उत्पादने मिळतात त्यांचा वापर करून देखील तुम्हाला टाच दुखीच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. आणि जर त्रास हा खूपच जास्त असेल तर अस्थिरोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वरील उपाय केल्याने तुमचा टाच दुखीचा त्रास निश्चितच कमी होईल व आपले शरीर सदृढ, निरोगी आणि स्वस्थ राहील.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले टाच दुखीवर घरगुती उपाय कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)