सत्यनारायण पुजा / सत्यनारायण पुजा मांडणी / घरच्या घरी सत्यनारायण पुजा / satyanarayan pooja mandani >> सध्या श्रावण महिना चालु आहे. हा महिना धार्मिक कार्य सुरू करण्यासाठीचा महत्वाचा महिना समजला जातो. या महिण्या पासून बहुतांश सर्वच धार्मिक लोक भगवान श्री सत्यनारायण देवतेची पुजा, म्हणजेच घरी सत्यनारायण करतात. त्यासाठी बहुतेक सर्वच ब्राम्हणच्या मागे भक्तांची वर्दळ लागलेली असते. अशा वेळी कोणत्याही ब्रम्हणा शिवाय आपणास घरच्या घरीच सत्यनारायण पुजा करता यावी , यासाठी आम्ही आज येत आहोत एका अतिशय महत्वाच्या लेखा सोबत , घरच्या घरी सत्यनारायण पुजा कशी करावी या माहिती सोबत .
सण असेल तरच नव्हे ; तर जे लोक धार्मिक आहेत , ते महिन्याच्या प्रत्येक पोर्णिमेला घरात सत्यनारण पुजा करतात . किंवा काही शुभकार्य असेल तेव्हाही आपल्या घरात सत्यनारायणाची पुजा केली जाते. सत्यनारायण पुजे मुळे घरात प्रसन्नता नांदते आणि घरातील वातावरण प्रफुल्ल राहते . सत्यनारायणाची पुजा इच्छापुर्ती साठी घातली जाते. तर सहसा लोक ही पुजा घरात शांती, सुख, धन प्राप्तीसाठी देखील करत असतात. घरात सत्यनारायन पुजा केल्याने नवग्रह तृप्त होतात आणि घरातील सदस्यांना समाधान लाभते .
ईच्छापूर्ती साठी आणि ईच्छा पूर्ती नंतर सत्यनारायन पुजा करण्याचा प्रघात आहे . त्या साठीच आजच्या या घरच्या घरी सत्यनारायन पुजा काशी करावी , या लेखाचा आपणास नक्कीच फायदा होईल आणि पूजन विधी विषयी असलेल्या आपल्या शंकांचे निरसन देखील होईल . चला तर मग सुरू करूया,घरच्या घरी सत्यनारण पुजा कशी करावी या विषयी अधिक माहिती .
Table of Contents
त्यनारायण पुजा / सत्यनारायण पुजा मांडणी / घरच्या घरी सत्यनारायण पुजा / satyanarayan pooja mandani ani sarv mahiti
सुरवातीला आपण सत्यनारायण पूजेसाठी लागणारे साहित्य बघूयात आणि त्यानंतर सत्यनारायण पुजा व सत्यनारायण पुजा मांडणी (satyanarayan pooja mandani) कशी करायची ते बघूयात.
सत्यनारायण पूजेसाठी लागणारे साहित्य / satyanarayan pooja sahitya
ही पुजा काही लोक ब्राम्हण बोलवुन करतात तर काही लोक घरच्या घरी करतात. या पुजे साठी पाण्याचा तांब्याचा कलश, चौरंग, केळीच्या झाडाचे पाच खांब. भगवान श्री सत्यनारायन देवतेचा फोटो अथवा श्रीकृष्णाची मुर्ती लागते. शालीग्राम जर तुमच्या रोजच्या पुजेत असेल तर तोसुध्दा या पुजे मध्ये ठेवावा लागतो. गहु, तांदुळ देखील लागतात. नवग्रहांच्या 9 सुपार्या लागतात. प्रसादासाठी रवा, साजुक तुप, साखर हया साहित्या पासुन बनवलेला शिरा आणि त्या शिर्यावर केळी चे बारीक काप टाकावे .
हया पुजेमध्ये अटी शर्ती तशा काही नाहीत फक्त ही पुजा मनोभावे करावी लागते. वर्षभरातुन एकदा तरी ही पुजा घालावी. याने निश्चित फळ प्राप्त होवुन घरात सुख-समृध्दी नांदते . सत्यनारायणाची पुजा घरात घातल्याने सौभाग्य नांदते धनलाभ होतो. सत्यनारायण म्हणजे भगवान विष्णु यांची पुजा या व्रतामध्ये केली जाते. या व्रताने घरातील आप आपसातील वाद देखील मिटतात आणि घरात सुख खेळते राहते .संपूर्ण पुजा मांडून झाल्या वर सत्यनारायणा ची कथा देखील वाचली जाते. आता ही सत्यनारायण पुजा काशी मांडवी ? हे आपण पाहूया.
सत्यनारायण पुजा मांडणी / घरच्या घरी सत्यनारायण पुजा (satyanarayan pooja mandani) कशी करावी
ही पुजा करायची असल्यास खालील साहित्य घेऊन व्यवस्थित योग्य प्रकारे पूजेची मांडणी करावी.
1. वर नमुद केल्या प्रमाणे सर्व साहित्य सत्यनारायणा च्या पुजेच्या एक दिवस आधीच घरात आणुन ठेवावे.
2. चौंरग, फुले, सुगंधित अगरबत्त्या, रांगोळी, केळीचे पाच खांब, 9 सुपारी, प्रसाद चे सामान इत्यादी आणुन ठेवावे.
3. घरातील जे यजमान पुजा करणार आहेत , त्यांनी सोवळे नेसुन अंगावर उपरणे ओढावे , स्वच्छ हात पाय धुवून हे वस्त्र परिधान करावे.
4. पश्चिम किंवा पुर्व दिशे कडे चौरंग मांडावा , त्याला मागे 3 आणि समोर 2 असे केळीचे खांब बांधावे ,उत्तर – दक्षिण दिशेकडे चौंरगाचे तोंड नसावे. आणि पुजेला बसणा-या यजमानाचे तोंड दक्षिण दिशेला नसावे. पुर्व-पश्चिम अशाप्रकारे चौंरग मांडावा.
5. चौंरगा वर एक वस्त्र अंथरावे ,घरातील कोरे ब्लाउज पीस असेल तरी चालेल आणि दोरीच्या किंवा सुतकीच्या साहाय्याने केळीचे खांब चौंरगाच्या चारही बाजुला बांधून घ्यावे.
6. त्यानंतर चौंरगावर अंथरलेल्या ब्लाउज पीस वर किंवा वस्त्रा वर श्रीविष्णुंचा फोटो ठेवावा. फोटोला वस्त्रमाळ घालावी, अष्टगंध लावावा आणि झेंडूच्या फुलांचा किंवा इतर कोणत्याही फुलांचा हार श्रीविष्णुंच्या म्हणजे सत्यनारायण देवतेच्या फोटोला घालावा .
7. त्यांनतर चौरंगाच्या भोवताल घरातील गृहीणीला स्वच्छ आणि सुरेख अशी रंगाने भरलेली रांगोळी काढण्यास सांगावी. रांगोळीने श्री सत्यनारायण नाव चौरंगाच्या पुढयात काढावे .
8. त्यांनतर मग यजमानांनी एक आसन घेउन चौंरगा समोर बसावे. सर्व प्रथम तांब्याचा कलश घ्यावा त्याला कुंकू लावावे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यावे.
9. मग त्या पाण्या मध्ये हळद कुंकू टाकावे आणि एक लक्ष्मीचे चित्र असलेला चांदीचा शिक्का त्या पाण्या मध्ये टाकावा आणि कलशाला पांढ-या दो-यांनी पाच वेढे बांधावेत आणि कलशात 5 नागिलेचे पाने अर्धवट घालावी .
10. आणि मग श्रीविष्णुच्या फोटोसमोर थोडेसं तांदुळ टाकावे आणि त्या तांदळामध्ये कलश रोवुन ठेवावा. आणि त्या पाण्याच्या कलशावर नारळ ठेवावा. त्यालाच फुलांचा छोटा हार करून घालावा. अशा प्रकारे कलश पुजा करावी .
11. त्यानंतर कलशाच्या बाजुला केळी तसेच पाच कोणतेही फळ ठेवावे. केळी, चिकु, डाळिंब असे फळ कलशाच्या एका बाजुला ठेवावेत आणि त्या फळांवर फुल ठेवावे.
12. कलशाच्या समोर थोडे थोडे तांदुळ टाकुन त्यावर नऊ सुपा-या ठेवाव्यात. त्या सुपा-यांवर हळद कुंकू वहावे , फुल वहावे यालाच नवग्रहाची पुजा म्हणतात.
13. त्यांनतर समोर एक ताम्हण घ्यावे त्या ताम्हणात एक सुपारी घ्यावी. त्या सुपारीवर आधी पाणी टाकावे. त्यांनतर दुध टाकावे आणि त्यांनतर परत पाणी टाकावे. आणि ती सुपारी वस्त्राने स्वच्छ पुसून घ्यावी आणि सर्वात समोर ठेवुन त्यावर हळद कुंकू , दूर्वा ,अक्षदा वाहाव्यात. ही सुपारी म्हणजेच गणपतीचे प्रतीक म्हणून कोणतीही पुजा करायच्या आधी पूजली जाते .अशी सुपारीची पुजा करून घ्यावी म्हणजे गणपतीची पुजा झाल्यासारखे होते.
14. त्यांनतर मग त्याच ताम्हणा मध्ये श्रीकृष्णाची [बाळकृष्ण] मुर्ती घ्यावी. श्रीकृष्णाची मुर्तीची पुजा देखील गणपतीची पुजा केल्या प्रमाणे करावी आणि त्यांनतर श्रीकृष्णाची मुर्ती कलशाच्या समोर ठेवुन गंधफुल वाहावे.
15. त्यांनतर त्यांना वस्त्रमाळ वाहाव्यात आणि मग समोर मोठी समई ठेवुन त्यामध्ये तेल टाकुन दिवा लावुन ठेवावा. तसेच दुसर्या दिव्यात अजून दोन वाटी घालून तुपाचा दिवा लावावा .
16. कृष्णाच्या मूर्तीला तुलसीच्या मंजुळा वाहाव्या.
17. हे सर्व झाल्यावर सत्यनारायणाची पोथी घेउन यातली सत्यनारायणाची कथा पुर्ण वाचुन घ्यावी. आणि कथा वाचल्यानंतर निरंजन लावुन सर्वप्रथम गणपतीची आरती म्हणावी. आणि मग श्री सत्यनारायन ची आरती म्हणावी. या दोन आरत्या करून बाकीच्या तीन कोणत्याही आरत्या कराव्यात.
18. त्यांनतर कापुर टाकुन कापुर आरती म्हणून पुजा संपन्न करावी.
19.कथा वाचण्याच्या आधी नैवेद्य दाखवावा शिर्याचा आणि पेढयाचा आणि मगच कथा आणि आरती करावी आणि त्यानंतर सर्व झाल्या नंतर घरातील मोठया माणसांचे आर्शिवाद घ्यावेत आणि मग प्रसाद सर्वांना वाटावा.
सत्य नारायण पुजा केल्याने घरात शांति, समाधान आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, त्यामुळे कमीत कमी वर्षातून एक वेळेस तरी सत्यनारायण पुजा करावीच. आणि ती कशी करावी याची माहिती या लेखात सांगितली आहे.
वरील लेखावरून घरच्या घरी सत्यनारायण पुजा कशी करावी या विषयी ची संपूर्ण माहिती आपल्या लक्षात आलीच असेल , आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. आणि आपल्या घरात समृद्धि आरोग्य वैभव आणि लक्ष्मीचा वास राहील . सत्यनारायण च्या पूजेसाठी अतिशय शास्त्रोक्त आणि उपयुक्त माहीती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल .
सारांश –सत्यनारायण पुजा / सत्यनारायण पुजा मांडणी / घरच्या घरी सत्यनारायण पूजा
तुम्हाला जर घरच्या घरी सत्यनारायन कसा करावा असा प्रश्न पडला असेल तर, तुम्ही या लेखात सांगितलेल साहित्य आणि पुजा मांडणी आपण करू शकता. सत्यनारायण पुजा ही घरात वर्षातून एक वेळेस तर झालीच पाहिजे त्यामुळे, तुम्ही या लेखातील माहिती वापरुन आपण ही पुजा करावी. या पूजेने आपल्या घराची भरभराट होईल.
आपल्याला वरील लेखामध्ये, सांगितलेली ” सत्यनारायण पुजा /सत्यनारायण पुजा मांडणी /घरच्याघरी सत्यनारायण पुजा/satyanarayan pooja mandani “ही घरगुती माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना किंवा प्रश्न असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो .
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)