पित्तामुळे डोकेदुखी उपाय / पित्त उपचार / पित्त व डोकेदुखी / डोकेदुखी घरगुती उपाय / pitta mule dokedukhi upay >>>> आजकाल आजारांचं प्रमाण हे अतिशय वाढलं आहे पण त्या ही पेक्षा जास्त प्रमाण वाढले आहे तर ते म्हणजे पित्त किंवा अॅसिडिटी होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकदा का आपल्याला पित्त झाले की सुरू होते ती डोकेदुखी , उलट्या आणि मळमळ , पोटात दुखणे यांसारख्या समस्या या निर्माण होतात.
तसं पाहिले तर हे वरील सर्व आजार आपल्यासाठी किरकोळच , परंतु आपण पाहतोय की, सध्याच्या काळात या किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करणं आताच्या परिस्थितीत महागात पडू शकतं म्हणजेच ते वाढल तर आपल्या खिशाला परवडणारे नसते. पित्तामुळे होणारी डोकेदुखी हा तसा सामान्य व अगदी किरकोळ असा समजला जाणारा आजार आहे. आजकाल डोके दुखतं नाही असं म्हणणारी एकही व्यक्ति सापडणार नाही. डोकेदुखी होण्याची तशी बरीच कारणे आहेत.
मानसिक ताण जसं डोकेदुखीचं महत्वाचं कारण आहे त्याप्रमाणेचं अजुन एक महत्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे पित्त. पित्तामुळे देखील आपले डोके दुखू शकते पित्त जर झाले असेल तर त्यासोबत त्याची अनेक लक्षणे दिसायला लागतात आणि ती लक्षणे म्हणजे पोटात दुखणे, पोटात जळजळ होणे, उलट्या होणे. या सगळ्या लक्षणां सोबतच डोके ही दुखायला लागते. खासकरून डोकेदुखी ही स्त्रियांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळते. सतत ची डोकेदुखी , पित्त ,अर्धशिशी/मायग्रेन यासर्व कारणामुळे असह्य होवुन कधी-कधी उलट्या व्हायला देखील सुरवात होऊ शकते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व आपले डोके हे दुखायला लागते.
पित्तामुळे अनेक आजार आणि तक्रारी या निर्माण होऊ शकतात आणि त्यातीलच एक तक्रार म्हणजे पित्तामुळे डोकेदुखी . पित्त हे डोकेदुखी मागचं सर्वात महत्वाचं कारण असू शकतं. आपण हा त्रास काही घरगुती उपाय आणि उपचार करून देखील कमी करू शकतो आणि त्याचसाठी आम्ही घेऊन येत आहोत एक अतिशय महत्वपूर्ण लेख तो म्हणजे, “पित्तामुळे डोकेदुखी उपाय / pitta mule dokedukhi upay ” . या लेखातील काही घरगुती उपचार करून आपण पित्त हे कमी करु शकतो आणि पित्तामुळे आपली होणारी डोकेदुखी देखील कमी होईल. चला तर जाणून घेऊया माहिती , पित्तामुळे डोकेदुखी या विषयी…….
Table of Contents
पित्तामुळे डोकेदुखी उपाय /पित्त उपचार /पित्त व डोकेदुखी / pitta mule dokedukhi upay
आपल्याला जर सतत हे पित्त होत असेल आणि त्यामुळे डोके दुखत असेल तर आपण आमच्याया लेखात सांगितलेले खालील उपाय करावे याने आपल्याला नक्कीच आराम मिळेन आणि आपला त्रास देखील कमी होईल.
आलं आणि आल्याचा( अद्रक) च चहा : पित्त उपचार
भारतीय स्वयंपाकघरात आलं या औषधी मुळाचा प्रामुख्याणे वापर केला जात असतो. पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा उपयोग होतो व त्याच्या सेवनामुळे पचन ही सुधारते. आल्यामधील पाचक रसांमुळे व तिखटपणा यामुळे आम्लपित्त हे कमी होत असते. त्याप्रमाणेच डोकेदुखी आराम मिळवण्यासाठी ही आल्याचा उपयोग होतो. आलं घालुन बनवलेला चहा स्वादाला ही चांगला लागतो आणि डोकेदुखीपासुन आराम ही देतो. आलंयुक्त चहामुळे देखील शरीरातील रक्तवाहिन्यांमधील सुज कमी होण्यास मदत होते व त्यामुळे डोके दुखीची वेदना ही कमी होते.
पाणी भरपूर पिणे : पित्त व डोकेदुखी
पित्तामुळे अनेकांना उलट्या होण्याचा त्रास व्हायल लागतो. उलट्यांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं व डिहायड्रेशनमुळे डोक दुखायला सुरवात होते. त्यामुळे भरपुर पाणी पिणं हा ही डोकेदुखी या समस्येवरचा एक चांगला आणि फायदेशीर असा उपाय आहे. त्यामुळे आपल्याला जर पित्ता मुळे डोके दुखत असेल तर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, याने आपल्याला बरेच फायदे देखील होतील.
लवंग : pitta mule dokedukhi upay
लवंग चवीला तिखट जरी असली तरी देखील ही लवंग आपल्या तोंडातील अतिरिक्त लाळ खेचून घेत असते व आपले पचन सुधारण्यास मदत होते. तसेच पित्ताची लक्षणं असल्यास ते देखील दूर करण्यास लवंग मदत करते. त्याप्रमाणेच डोकेदुखी घालवण्यासाठीसुद्धा लवंग एक उत्तम उपाय आहे. त्यासाठी तव्यावर पाच ते सहा लवंगा शेकून घ्याव्यात. त्यानंतर गरम असतानाचं त्या एका कापडात किंवा रूमालात बांधाव्यात. त्यानंतर कापडातुन/रूमालातून येणारा गरम लवंगाचा वास घेत राहावा. यामुळे डोकेदुखीचा होणारा त्रास नक्की कमी होतो.
लिंबु आणि लिंबू सरबत : पित्त उपचार
शरीरात पित्ताचं प्रमाण हे कमी-अधिक झालं की, लगेचच आपल्याला डोकेदुखीचा त्रास हा जाणवायला सुरवात होते. अशावेळी लिंबु पाणी हा एक अत्यंत सोपा आणि फायदेशीर असा उपाय करून डोकेदुखी पासुन सुटका मिळवता येते. डोक दुखतं असल्यास लिंबु पाण्यामध्ये थोडसं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालुन ते पाणी प्यावे. यामुळे डोकेदुखीपासुन आराम मिळतो, तसेच पित्ताचं प्रमाण ही कमी होत आणि आपल्या शरीराला पाणी देखील मिळते व डीहायड्रेशन चे प्रमाण देखील कमी होते.
थंड दुध पिणे : पित्त उपचार
थंड दुख हे पित्त आणि पित्तामुळे होणारी डोकेदुखी दोन्ही ही शमवण्यास मदत करते. दूध हे पित्तशामक असते. दूध थंड करून त्यात कोणतेही पदार्थ न मिसळता प्यावे. पित्तामुळे डोकेदुखी उपाय म्हणून थंड दूध प्यायल्याने पित्तामुळे पोटात व छातीत होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते व त्यामुळे होणारी डोकेदुखी ही थांबते.
सुंठ चे सेवन करणे : पित्तामुळे डोकेदुखी उपाय
सुंठ म्हणजेचं सुखलेलं आलं. सुंठाची पावडर करून घ्यावी. एक चमचा ती बनवलेली पावडर घेवुन त्यात पाणी टाकुन त्याची पेस्ट बनवुन घ्यावी. ही पेस्ट साधारण गरम करून कपाळावर लावा. थोड्या वेळातचं डोकं दुखायचं कमी होइल. त्याचबरोबर आपण सुंठ साखर मिक्सर मधून बारीक करून देखील खाऊ शकतो किंवा सुंठ घालून चहा देखील करू शकतो. कोणत्याही प्रकारे आपण सुंठ चे सेवन करावे, आपले पित्तामुळे डोकेदुखी नक्कीच थांबते.
दालचिणी
डोकेदुखीचा त्रास जर होत असेल तर दालचिणीची पावडर बनवून घ्यावी आणि त्यामध्ये पाणी टाकुन त्याची पेस्ट तयार करा. कपाळावर ही पेस्ट लावुन घ्या आणि थोड्या वेळानंतर कोमट पाण्याने ही लावलेली पेस्ट धुवून घ्या, दालचीनी पावडर गरम असते आणि डोक्याला लावल्याने ती सुकल्यानंतर त्वचा आकसून थोड्याचं वेळात डोकेदुखीपासुन आराम मिळेल.
अद्रक रस, लिंबू रस, आणि मध
अद्रक , लिंबू आणि मध हे अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. त्यामुळे इतर अनेक आजारांवर घरगुती उपाय म्हणून तर हे उपयोगी आहेच पण त्याच बरोबर पित्तामुळे जर डोके दुखतं असेल तर आल्याचा रस व लिंबाचा रस घ्यावा आणि मधा सोबत हा रस एकत्र करावा व घ्यावा, या उपायाने आपला त्रास नक्कीच कमी होईल आणि आराम मिळेन. मध नसेल तर साखर वापरली तरी चालेल. यामुळे आपल्याला पित्त झाल्याने होणारी डोकेदुखी ही निश्चित थांबते.
नाकात साजूक तूप सोडणे : पित्त डोकेदुखी उपाय
पित्तामुळे डोके दुखतं असेल तर आपण आपल्या किंवा ज्याचे पित्तामुळे डोके दुखत आहे त्याच्या नाकामध्ये साजुक तुपाचे दोन थेंब टाकावेत असे केल्याने देखील त्यामुळेही डोकेदुखी ही नक्की कमी होते आणि त्यासोबत पित्त देखील कमी होते. तूप हा उपाय केल्याने कोणताही अपाय देखील होत नाही. पित्तमुळे डोके दुखत असेल तर त्याचा त्रास असहय वाटत असतो.
संतुलित आहार, आणि दिनचर्या : पित्त उपचार
पित्त होणे आणि पित्तामुळे डोकेदुखी होऊ नये यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे योग्य ,पूर्ण व संतुलित आहार, त्याचबरोबर वेळेवर झोपणे, वेळेवर जेवण करणे . आपला पित्त चा त्रास कमी करण्यासाठी यासारख्या गोष्टी करून तुम्ही तुम्हाला होणारी डोकेदुखी ही नक्कीच कमी करू शकता. संतुलित आहार शरीरातील कमी पडलेल्या घटकांची पूर्तता करण्यास मदत करतो.
तुळशीच्या पाणांचा चहा
तुळस ही विविध आयुर्वेदिक गुणांनी परिपूर्ण आहे.तुळशीच्या पानांचा काढा किंवा तुळशीची पाने टाकून बनवलेला चहा पिल्याने देखील आपली डोके दुखी थांबवण्यास बरीच मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर चहापत्तीचा चहा घेण्या एवजी तुळशीच्या पानाचा चहा घ्यावा याने पित्त झालेले कमी होते तसेच चव देखील छान लागते.
सैंधव मीठ आणि लिंबू रस
आपले जर पित्त झाल्याने पित्तामुळे डोकेदुखी असेल तर उपाय म्हणून आपण सैंधव मीठ आणि लिंबाचा रस गरम पाण्यात ढवळून पिल्याने देखील डोके दुखी पासून अराम मिळतो व आपली डोकेदुखी कमी होते.
ग्रीन टी आणि लिंबू रस
घरात जर ग्रीन टी असेल तर त्याची १ पुडी एक कप गरम पाण्यात टाकावी त्यामध्ये स्वादासाठी लिंबाचा रस व मध टाकावे आणि मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे. हे तयार झालेले मिश्रण दिवसातून साधारण दोन वेळेस घेतल्यास डोके दुखायचे थांबण्यास मदत होते.
मोहरीचे तेलाने मसाज कारणे
आपले सतत डोके दुखत असेल तर राई म्हणजेच सरसो चे तेल घ्यायचे त्याला थोडे मंद आंचेवर गरम करावे आणि कोमट झाल्यावर त्याने दहा ते पंधरा मिनिटे हलक्या हाताने डोक्याची मसाज करावी, याने तुमचे डोके दुखायचे थांबण्यास मदत होईल. मोहरीच्या तेलणे मसाज केल्याने डोक्यातील रक्त वाहिन्याचे रक्ताभिसरण देखील चांगले होते आणि त्रास कमी होतो.
टरबूज आणि टरबूज चा ज्यूस
आपले जर उन्हाळ्याच्या दिवसात उन्हामुळे डोके दुखत असेल तर आपण डोके दुखायचे थांबण्यासाठी टरबूज देखील खाऊ शकता किंवा टरबूज च ज्यूस देखील घ्यावा. टरबूज हे थंड असते तसेच त्यात जास्त प्रमाणात पाणी असते ,त्यामुळे उन्हाळ्यात हा घरगुती उपाय नक्की करून बघावा. कारण सहसा शरीरातील पाणी कमी झाल्याने देखील डोके दुखू शकते.
गरम ओव्याचा शेक
सर्दी खोकला यामुळे जर डोके दुखत असेल तर ,एक चमचा ओवा भाजून घ्या व तो सुती कापडात बांधा आणि जिथे जिथे डोके दुखत आहे त्या ठिकाणी शेका याने देखील डोके दुखी थांबण्यास मदत होते.हा उपाय सहसा लहान मुलांना सर्दी झाल्यावर केला जातो.
तुळशीचे तेल व नारळचे तेलाने मालिश करणे
तुळशीचे तेल व नारळाचे तेल यांचे मिश्रण करून ते कपाळा पासून ते माने पर्यंत लाऊन हलक्या हाताने मालिश केल्यावर देखील तुम्हाला डोके दुखी च्या त्रासापासून आराम मिळून तुमची सुटका होऊ शकते. हे तेल गरम करून थोडे कोमट झाल्यावर त्याने मालीश केल्यास त्याचा आजिन जास्त फायदा होऊ शकतो. कोमट तेलणे लवकरात लवकर आराम मिळेन.
चंदन पावडर ची पेस्ट
ऊन लागल्याने किंवा उन्हाळ्यात उन्हात फिरल्यामुळे किंवा गर्मीमुळे डोके दुखत असेल तर चंदन पावडर ची पेस्ट तयार करून ती कपाळावर लावल्यास डोक्याला थंडावा मिळेल आणि डोकेदुखी पासून आराम मिळेल.
सर्दी मुळे जर तुमचे डोके दुखत असेल तर धनेपूड आणि साखरेचे मिश्रण करून ते खावे. याने देखील डोके दुखी पासून आराम मिळतो.
पुदिण्याचा रस, ऑलिव्ह ऑइलने मसाज करणे
साधारण २ ते ३ थेंब पुदिन्याचा रस व एक चमचा ऑलिव्ह ऑइल ते जर नसेल तर नारळाचे तेल हे दोन्ही चांगले मिक्स करा, आणि हे मिश्रण हलक्या हाताने डोक्याला लावा. डोके दुखी वर हा देखील एक चांगला घरगुती उपाय ठरतो. पुदिनाच्या उग्र आणि औषधीय सुगंधाने देखील बर्याच प्रमाणात डोके दुखी आणि पित्त झाले तर ते कमी होते.
तुळशीची पाणे
तुळशीची पाने व मीठ हे मिसळून साधारण १० ते १५ मिनिटे ठेवावे,आणि नंतर तुळस स्वच्छ धुवावी व हातानेच त्या तुळशीच्या पानांचा रस काढून घ्यावा. हा रस दिवसातून दोन वेळेस पिल्याने देखील डोके दुखी मुळे सततचा होणारा त्रास कमी होईल.
सफरचंद आणि मीठ / काळे मीठ
तुमचे जर नेहमी डोके दुखत असेल तर, सफरचंदवर मीठ टाकून खावे आणि ते खाल्या नंतर त्यावर गरम पाणी किंवा दूध प्यावे. डोके दुखी वरील हा घरगुती उपाय जर तुम्ही नियमित पणे सलग १० ते १२ दिवस केल्यास सततच्या डोके दुखी पासून तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. सफरचंद हे देखील बर्याच आजारास दूर ठेवण्यास मदत करते.
सारांश – पित्तामुळे डोकेदुखी उपाय / पित्त उपचार / पित्त व डोकेदुखी / डोकेदुखी घरगुती उपाय / pitta mule dokedukhi upay
आपल्याला जर सारखे सारखे असे पित्त होत असेल आणि पित्तामुळे डोकेदुखी होत असेल, तर त्यासाठी आपल्याला उपाय पाहिजे असतील तर आपण आमच्या आजच्या या ” पित्तामुळे डोकेदुखी उपाय / पित्त व डोकेदुखी / pitta mule dokedukhi upay ” या लेखातील आम्ही सांगितलेले उपाय करावेत याने आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि आपला त्रास देखील कमी होईल.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले ,पित्तामुळे डोकेदुखी उपाय / घरगुती उपाय/ पित्त व डोकेदुखी /पित्त उपचार /( pitta mule dpkedukhi upay) हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)