पावभाजी रेसिपी / पावभाजी कशी बनवायची – Best Pawbhaji Recipe

पावभाजी रेसिपी /पावभाजी कशी बनवायची / पाव भाजी कशी बनवायची / pawbhaji recipe in marathi >>> आजकाल आपण पाहतोय की भाजी पोळी खाण्याचा सर्वांनाच भारी कंटाळा येत आहे. लहान पासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नवनवीन पदार्थ आणि चॅट पदार्थ खाण्यात सर्वात जास्त रस आहे. तसेच आजकाल खवव्येगिरी देखील बर्‍याच प्रमाणात वाढली आहे. सोशियल मिडियाच्या मार्फत बर्‍याच सुगरण महिला नवनवीन पदार्थ बनवणे शिकत आहे आणि त्याप्रमाणे उत्कृष्ठ असे पदार्थ बनवत देखील आहेत. परंतु तरी देखील काही महिलाना किंवा नवीन शिकणार्‍या महिलाना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, काही वेळेस प्रमाण चुकते तर काही वेळेस कृती लक्षात येत नाही , आणि त्याचसाठी योग्य आणि बनवण्यास सोपी अशा कृतीची आवशकता असते आणि त्याच साठी आम्ही हा आजचा उत्कृष्ठ अशा रेसिपी चा लेख घेऊन येत आहोत.

पावभाजी  हा  महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे.  मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरात प्रसिद्ध झालेला हा पदार्थ आता हळूहळू संपूर्ण भारतात प्रसिद्ध आणि खाण्यासाठी लोकप्रिय झाला आहे. पाव भाजी (पावभाजी ) हे नुसतं नाव जरी ऐकल तरी, लगेचच आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. लॉकडाऊनच्या काळात आपल्याला बाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला गाड्यावर मिळणारी  पाव भाजी आपण सगळ्यात जास्त मिस्स झाली .

त्याचसाठी आपल्याला उत्तम आणि अगदी हॉटेल स्टाइल पावभाजी कशी बनवायची याची रेसिपी आपल्याला पर्यंत पोहचवण्यासाठीच आम्ही आजचा हा लेख घेऊन येत आहोत ” पावभाजी रेसिपी ” यातील माहिती साहित्य आणि कृती आपल्याला निश्चितच उत्कृष्ठ अशी पाव भाजी बनवण्यासाठी बरीच उपयोगी येईल. चला तर मग पाहूया माहिती पावभाजी कशी बनवायची या विषयी

पावभाजी रेसिपी / पावभाजी कशी बनवायची / पाव भाजी कशी बनवायची / pawbhaji recipe in marathi

आपल्या जर पावभाजी बनवायची असेल आणि अगदी हॉटेल स्टाइल पावभाजी बनवण्याची रेसिपी आपण पाहत असाल तर आपण आमचा आजचा हा लेख नक्की वाचवा, यात आम्ही जी रेसिपी आणि साहित्य वापरत आहोत ते आपली पावभाजी उत्तम बनवण्यासाठी बरोबर आणि फायदेशीर होईल आणि ही रेसिपी वापरुन नक्कीच आपली पावभाजी उत्तम बनेल.

पावभाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य / पाव भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

पावभाजी रेसिपी /पावभाजी कशी बनवायची / पाव भाजी कशी बनवायची / pawbhaji recipe in marathi - साहित्य
साहित्य

मोठे बटाटे –  5 मध्यम  आकाराचे किंवा 3 मोठे

मोठे कांदे – ५ ते ६  मध्यम आकाराचे  बारीक चिरून वापरावे

टोमॅटो –  ४ मध्यम आकाराचे  बारीक चिरून वापरावे

हिरवे वाटाणे –  साधारण  अर्धी वाटी किंवा आपल्या आवडी प्रमाणे

ढोबळी मिरची –  २ मध्यम आकाराच्या  बारीक चिरून घ्याव्या

गाजर – २ तुकडे करून  बारीक चिरून वापरावे

फ्लॉवर – साधारण १ वाटी 

बीट – ६-७ काप किंवा एक छोटा बीट रूट रंग येण्यासाठी आपल्या आवडीप्रमाणे वापरावा

आलं आणि लसूण पेस्ट – १ मोठा चमचा 

जीरे पावडर – एक छोटा चमचा

तेल – आवश्यकतेनुसार 

मीठ – आपल्या चवीनुसार 

लोणी – २-३ मोठे चमचे (बटर )

पावभाजी बनवण्यासाठी लागणारे सुखे मसाले

स्वादिष्ट अशी पावभाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे खालील प्रमाणे आहे

पावभाजी रेसिपी /पावभाजी कशी बनवायची / पाव भाजी कशी बनवायची / pawbhaji recipe in marathi
सुखे मसाले

लाल तिखट – १. ५ मोठा चमचा 

पाव भाजी मसाला – २ मोठे चमचे 

गरम मसाला /गोड मसाला- १ छोटा चमचा (आपल्या आवडीप्रमाणे ) 

धने पूड -१ छोटा चमचा (आपल्या आवडीप्रमाणे  )  

वरील सर्व साहित्य योग्य त्या प्रमाणात घेऊन आपण पावभाजी करण्याची कृती करण्यास सुरुवात करावी.

पावभाजीच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य

पावभाजी रेसिपी /पावभाजी कशी बनवायची / पाव भाजी कशी बनवायची / pawbhaji recipe in marathi - सजावटी साठी लागणारे साहित्य
सजावटी साठी लागणारे साहित्य

आपली तयार झालेली पावभाजी अजून चांगली आणि टेस्टी दिसण्यासाठी आणि चवीसाठी आपण खालील सजावट चे साहित्य वापरावे. याने आपली पावभाजी सजावट केल्यास ती दिसायला देखील छान दिसेल आणि चवीला देखील छान लागेल.

बारीक चिरलेली कोथिंबीर -आपल्या आवडी प्रमाणे

बारीक चिरलेला कांदा – आपल्या आवडी प्रमाणे

लिंबू च्या फोडी – आपल्या आवडी प्रमाणे

भाजीवर थोडे बटर – आपल्या आवडी नुसार

हे सर्व साहित्य वापरुन अतिशय सुंदर आणि चवदार अशी सजावट करू शकता.

पाव भाजी बनवण्यासाठीची कृती / पावभाजी कशी बनवायची / pawbhaji recipe in marathi :

वरील सर्व साहित्य वापरुन उत्तम अशी पावभाजी रेसिपी / पाव भाजी कशी बनवायची याची कृती ही खालील प्रमाणे आहे –

सर्वप्रथम वरील घेतलेल्या सर्व या भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्या. फुलगोबी मटार चे हिरवे वाटाणे , बारीक चिरलेले गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची म्हणजेच ठोबळी मिरची, बटाटे आणि बीट रूट हे सर्व एका कुकरच्या भांड्यात घेऊन एक शिट्टी घेऊन शिजवून घ्यावे. बोर चे पाणी असेल आणि लवकर काही शिजत नसेल तर मात्र कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्याव्या आणि कुकर थंड होऊ द्यावे.

कुकर थंड होई पर्यंत, आपण घेतलेले कांदे फोडणी साठी बारीक चिरून घ्यावे. लगेचच फोडणी साठी लागणारे टोमॅटो देखील चिरून घ्यावे. आता एका पसरट भांड्यात किंवा पसरट पॅन मध्ये १चमचा तेल घालून ,भांडे मध्यम आचेवर ठेवावे.  तेल थोडे गरम झाले की त्यामध्ये १ छोटा चमचा लोणी म्हणजेच (बटर) घालावे . लोणी विरघळल्यानंतर त्यात ते लोणी चांगले तडतडू द्यावे . यावेळी पॅन वर एक ताट झाकावे. जेणेकरून लोणी चा मस्त वास बाहेर जाणार नाही आणि आपली पाव भाजी स्मूदी होईल आणि बट्टर छान स्मेल देखील त्याला येईल.

आता हे लोणी पूर्ण तेलात विरघळल्यावर त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालावा. हा तेलात टाकलेला कांदा मधे -मधे परतून चांगला लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा. साधारण ५-७ मिनिटे कांदा भाजायला लागतील ,घाई न करता कांदा छान असा लालसर झाला की त्यात आता आपण बारीक चिरलेले टोमॅटो टाकावेआणि त्याला देखील मंद आंचेवर छान मऊ होऊ द्यावे।

कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही तेलात पुर्णपणे एकजीव होऊ द्यावे. गॅस मंद आंचेवर ठेऊन कांदा आणि टोमॅटो छान ब्रावुणी झाल्यावर, कांदा आणि टोमॅटो हे छान पैकी एकजीव  झाले कि मग  त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट घालावी. आता हे मिश्रण चांगले २ मिनिटे परतून घ्यावे आणि सतत हलवत रहावे. लसूण पेस्ट देखील पुर्णपणे एकजीव होऊ द्यावी.

टोमॅटो, कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान मऊ, हे सर्व तेलात छान एकत्र  झाले की मग त्यात आपण बारीक चिरलेली ठोबळी मिरची ही घालावी . आता ही ढोबळी मिरची देखील २ मिनिटे परतून थोडेसे पाणी टाकून, पॅन वरती झाकण ठेऊन मऊ होऊ द्यावी , शिजू द्यावी . 

 कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या रवीने किंव्हा पावभाजी साठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राने एकजीव करून घ्याव्या . आपण यामध्ये बीट घातल्यामुळे पावभाजीला खूप छान लाल रंग येईल. आपल्याला कोणताही जास्तीचा रंग यामध्ये घालावा नाही लागणार. या बीटरूट मुळे अगदी हॉटेल स्टाइल रंग हा आपल्या पावभाजीला येईल.

५ मिनिटांनी झाकण काढून त्यात एकजीव केलेल्या सर्व भाज्या घालाव्यात. आता यामध्ये वरील साहित्यात  दिलेले सर्व सुखे मसाले टाकावे . गरम /गोडा मसाला घातला नाही तरी चालेल.

चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण ढवळून छान एकजीव करावे. थोडेसे पाणी घालून,झाकण ठेवून ५ मिनिटे शिजू द्यावे . चव बघून ,हवे असल्यास मीठ-तिखट घालावे.

तव्यावर थोडेसे लोणी (बटर ) घालून त्यावर कोथिंबीर व  अगदी थोडीशी भाजी घालून पाव मधून कापून त्यावर शेकून घ्यावेत . 

लिंबाची फोड ,कोथिंबीर ,आणि कांदा यासोबत भाजीवर  थोडेसे लोणी (बटर )घालून शेकून घेतलेल्या पाव सोबत गरमा गरम पावभाजी खायला द्यावी .

अशा प्रकारे अगदी उत्तम अशी पाव भाजी आपण आमची आजची रेसिपी आणि साहित्य वापरुन बनवू शकता.

सारांश – पावभाजी रेसिपी / पावभाजी कशी बनवायची / पाव भाजी कशी बनवायची / pawbhaji recipe

आपल्याला जर उत्तम आणि अगदी हॉटेल स्टाइल पावभाजी बनवायची असेन तर आपण आमच्या आजच्या या लेखातील ही ” पावभाजी रेसिपी “यातील माहिती वापरुन ,साहित्य वापरुन आणि कृती वापरुन आपण उत्तम अशी पावभाजी बनवू शकता तेही अगदी घरच्या घरी . तर त्यासाठी आपण हा आजचा लेख वाचवा याचा तुम्हाला नकीच फायदा होईल आणि आपली पावभाजी अगदी उत्तम बनेल.

आपल्याला वरील लेखामध्ये सांगितलेली “पावभाजी रेसिपी / पावभाजी कशी बनवायची / पाव भाजी कशी बनवायची / pawbhaji recipe in marathi” कशी वाटली, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top