नाकातून रक्त येणे घरगुती उपाय / नाकातून रक्त येणे उपाय / नाकातून रक्त येणे कारण / nakatun rakt yene upay >>> नाकातुन रक्त हे अनेक कारणांमुळे येऊ शकते. घोळाना फुटला तर नाकातुन रक्त येते, सर्दी झालेली असताना नाक ओढताना किंवा वारंवार नाक पुसल्यास देखील नाकातुन रक्त येते. नाक हा अवयव नाजुक असतो तर त्यामुळे देखील नाकातील छोटया रक्तवाहीन्या फुटल्यास साधारण रक्त येण्याची भीती असते. कधीकधी नाकाला थेाडा जरी धक्का लागला तरी नाकातुन रक्त वाहते आणि कधी कधी नाकाच्या अगदी आतील भागातील रक्तवाहीनीला थोडी जरी दुखापत झाली तर तिच्यातुन रक्त वाहते. अशावेळेस एखादया तज्ञाकडे जाऊन इलाज करावा.
नाकातून सारखे सारखे रक्त येत असेन तर नाक कान घसा या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांचा सल्ला घ्यावा. आपल्या नाकातून रक्त येत असेल तर जर ते साधारण कारणामुळे येत असल्यास काही घरगुती उपाय करून आपण त्यावर नियंत्रण ठेऊ शकतो. कारण शरीरातून रक्त जाणे हे काही आरोग्याच्या दृष्टीने योग्य देखील नाही त्यामुळे त्यावर आपण लगेचच काही घरगुती उपाय करावेत.
Table of Contents
नाकातून रक्त येणे कारण
वातावरणातील बदल किंवा घरातील अतिशय थंड उपकरणे यामुळे हवा कोरडी होते आणि त्यामुळे नाकातील वाहीन्या या कडक आणि कोरडया होतात आणि या वाहीन्या कडक झाल्यास आपण जेव्हा नाकावाटे श्वासोश्वास घेतो तेव्हा नाकातुन रक्त येते आणि जेव्हा आपल्याला त्रास होतो अशावेळी आपणा एखादे औषध नाकावाटे ओढतो तर तेव्हा नाकाचा आतील भाग कोरडा होऊन देखील नाकातुन रक्त येऊ शकते. नाकातुन रक्त हा एक अनुवांशिक आजार देखील असु शकतो.आपण पाहतो की, नाकातुन रक्त येणे हा विकार लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळुन येतो.
धुम्रपान जे लोक करतात त्यांना देखील नाकातुन रक्त येण्याचा त्रास उदभवतो तसेच काही लोकांना अॅलर्जीमुळे देखील हा त्रास होतो. मदयपानामुळे रक्तवाहिन्यामध्ये जखम निर्माण होते. आणि यामुळे नाकातून रक्त येऊ शकते.अशाप्रकारे एक ना अनेक कारणामुळे कदाचित नाकातून रक्त येऊ शकते. साधारणपणे वरील सर्व नाकातून रक्त येणे कारण ,नाकातून रक्त येण्याची कारण असू शकतात .
परंतु यावर आपण घरगुती उपाय करू शकतो, आणि ते उपाय कोणते हे आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठीच आम्ही आजचा लेख ” नाकातून रक्त येणे घरगुती उपाय/नाकातून रक्त येणे उपाय /nakatun rakt yene upay ” हा घेऊन येत आहोत आणि याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल .
नाकातून रक्त येणे घरगुती उपाय / नाकातून रक्त येणे उपाय / nakatun rakt yene upay
चला तर मग जाणून घेऊयात नाकातून रक्त येणे घरगुती उपाय कोणते कोणते आहेत.
बर्फ लावणे – नाकातून रक्त येणे उपाय
नाकाला थंडगार पाणी किंवा बर्फ लावल्यावर रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे नाकातील वाहणारे रक्त गोठते आणि नाकातील रक्तस्त्राव थांबण्यास मदत होते आणि नाका द्वारे रक्त जाण्याचा त्रास हा कमी होतो.
डोक्यावर पाणी मारणे
घोळाणा जर फुटला असेल तर देखील नाकातून रक्त येते आणि जर असे घोळाणा फुटल्यामुळे नाकातून रक्त येत असेल तर ,डोक्यावर ( टाळूवर ) सपसप थंड पाणी मारावे याने नाकातून जाणारे रक्त थांबण्यास मदत होते. थंड पाणी मारल्याने रक्त प्रवाह थोड्या प्रमाणात गोठण्यासाठी बरीच मदत होते आणि जे रक्त नाकावाटे जात असते, ते जाणे थांबते.
कांद्याचा रस -नाकातून रक्त येणे घरगुती उपाय
कांदा हा थंड असतो आणि कांदयामध्ये असे गुणधर्म असतात जे की नाकातील रक्तस्त्राव थांबण्यास मदत करतात आणि कांदा हा एक प्रभावी उपाय आहे ज्याने रक्त थांबण्यास मदत होते. कांदयाचा रस काढुन घ्यावा आणि त्यामध्ये सुती लोकर बुडवावी आणि ही सुती लोकर नाकपुडीवर तीन ते पाच मिनिटे ठेवा याने नाकातील रक्त वाहण्याचे प्रमाण कमी होते.
खारट मीठ आणि बेकिंग सोडा चे पाणी
खारट पाण्याने सुध्दा नाकातील रक्त वाहणे बंद होण्यास मदत होते आणि खारट पाणी तयार करण्यासाठी अर्धा चमचा बेकींग सोडा घ्यावा, अर्धा चमचा मीठ घ्यावे आणि दिड कप पाणी घ्यावे आणि हे मिश्रण चांगले मिसळुन घ्यावे आणि सिरींजच्या मदतीने हे मिश्रण नाकामधील एका नाकपुडीत टाकावी आणि दुसरी नाकपुडी बोटांच्या साहायाने दाबुन बंद करावी आणि असे केल्यानंतर डोके खाली करून पाणी बाहेर काढुन टाकावे आणि तीन ते चार वेळा करावे , याने रक्त वाहने बंद हेाण्यास मदत होईल.
गरम पाण्याची वाफ
आपण सर्दी झाल्यावर जशी वाफ घेतो अगदी तशीच वाफ नाकातुन रक्त वाहताना घेण्याचा प्रयत्न करावा परंतु नाकातून रक्त येत असेल तर या पाण्यामध्ये विक्स, झेंडुबाम हे काही टाकु नये, फक्त गरम पाणी घ्यावे याने काय होते की वाफ घेतल्यावर नाकातील आतील भागावर ओलावा निर्माण होतो आणि केारडेपणा दुर होतो यामुळे नाकातील रक्तस्त्राव थांबण्यास मदत होते.
व्हीनेगर -नाकातून रक्त येणे उपाय
एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर किंवा पांढरे व्हिनेगर घ्यावे आणि त्यामध्ये एका छोटासा कापसाचा बोळा किंवा सुती कापडाचा बोळा बुडवावा आणि रक्तस्त्राव होत असलेल्या नाकाच्या नाकपुडीवर दहा मिनिटे ठेवावे याने नाकातील रक्तस्त्रव बंद होण्यास मदत होते.
व्हिटॅमिन ई कॅप्सुल –
व्हिटॅमिन ई कॅप्सुल ही नाकातून होणारा रक्तस्त्राव कमी करण्यास मदत करते.त्यामुळे ज्या नाकातून रक्त येत आहेत त्या नाकात ही कॅप्सुल टाकावी .व्हिटॅमिन ई कॅप्सुलचे तेल काढुन घ्यावे आणि ते नाकपुडयांवर लावावे आणि ते तसेच रात्रभर नाकपुडयंावर राहु दयावे. व्हिटॅमिन ई कॅप्सुलचे तेल नाकाच्या आतील त्वचेला ओलावा देईल आणि कोरडेपणा दुर होउन नाकातील रक्त वाहणे बंद होईल.
बेलाच्या पानांचा काढा –
नाकातुुन रक्त येत असल्यास बेलाची चार पाच पाने घ्यावीत आणि ती एका पातेल्यात टाकुन खळखळ उकळुन घ्यावीत आणि ज्यांच्या नाकातुन रक्त येत आहे अशा व्यक्तीस हा बेलाच्या पानांचा काढा पिण्यास दयावा. बेलाची पाने झाडांची सहसा कुठेही भेटतात हा काढा सतत देान ते तीन वेळेस प्यावा याने अधून- मधून नाकातील रक्त येणे बंद होईल आणि आपली या त्रासापासुन मुक्तता होईल.
पिंपळाच्या पानांचा रस – नाकातून रक्त येणे उपाय
आपल्या नाकातून रक्त येत असल्यास, पिंपळाच्या पानांचा रस काढुन त्याची काही थेंब ज्या नाकपुडीतुन रक्त येत आहे. त्यामध्ये सोडावीत, असे केल्याने नाकातुन रक्त येण्याचा त्रास कमी होऊन आराम मिळतो आणि नाकातील येणारे रक्त थांबते.
लोणी चे ताक
आपण जेव्हा तुप बनवतो त्यासाठी साय जमवतो आणि त्या जमलेल्या सायीपासुन तुप बनवतो आणि तुप बनवताना त्यासायीला रवीच्या साहाययाने ढवळुन ढवळुन तुप काढतात आणि ते त्याच्यापासुन पाणी वेगळे होते. त्या पाण्याला ताक असे म्हणतात. तर लहानपणापासुनच मुलांना असे घरी बनवलेले ताक पिण्यास दिल्यावर नाकातुन रक्त येण्याचा त्रास कधीच उदभवत नाही.
डिंक – नाकातून रक्त येणे घरगुती उपाय
खायचा डिंक घ्यायचा हा डिंक बाजारात मिळतो. किराणा दुकानामध्ये डिंकाचे मोठे मोठे खडे असतात. हे खडे बारीक करुन दोन चमचे होतील इतपत घ्यावेत आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकुन हा डिंक तीन ते चार घंटे भिजत ठेवावा. रात्रभर भिजवलेला डिंक हा फुगून एक मोठी वाटी बनतो. आणि हा डिंक फुगलेला एक वाटीमध्ये दोन ते चार चमचे घ्यायची त्यामध्ये गोडवा येण्यासाठी थोडासा मध टाकावा आणि त्याची खिरीमध्ये रूपांतर येण्यासाठी थोडेसे दुध टाकावे. याने थंडावा मिळतो आणि हा प्रयोग रोज केल्यास नाकातुन रक्त कधीच येत नाही.
जाडी खडीसाखर आणि धने – नाकातून रक्त येणे उपाय
साबुत धने घ्यायचे आणि मोठया खडयांची खडी साखर घ्यावी. धने हलकेसे कुटून घ्यावे तसेच खडीसाखर सुध्दा कुटावी आणि हे धनेपुड खडीसाखर एक तास भिजवावी नंतर हे मिश्रण गाळुन घ्यावे आणि सकाळी दुपारी संध्याकाळी असे पिऊन घ्यावे , असे केल्याने नाकातुन रक्त येणे हा त्रास बर्याच प्रमाणात कमी होतो आणि हळूहळू नाहीसा होतो.
सारांश – नाकातून रक्त येणे घरगुती उपाय / नाकातून रक्त येणे उपाय /नाकातून रकी येणे कारण / nakatun rakt yene upay
अशाप्रकारे वरील माहिती वाचून आपल्याला असलेली नाकातून रक्त येण्याची समस्या असेल तर आपण वरील उपाय वापरुन त्याचे निराकरण करू शकता व त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा देखील होईल आणि आपले नाकातून येणारे रक्त थांबेल.
आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, नाकातून रक्त येणे घरगुती उपाय / नाकातून रक्त येणे कारण / नाकातून रक्त येणे उपाय / nakatun rakt yene upay कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)