मुतखड्यावर घरगुती उपाय / मुतखडा पडण्यासाठी ९ सर्वोत्तम घरगुती उपाय

मुतखड्यावर घरगुती उपाय / मुतखडा पाडण्यासाठी घरगुती उपाय – मुतखडा होण्याची कारणे – मुतखडयाची लक्षणे – मुतखडा झाल्यावर आहारामध्ये करावयाचे बदल (Home Remedies For Kidney Stone In Marathi / Mutkhada gharguti upay) >> मुतखडा ज्याला किडनी स्टोन असंही म्हंटले जातं, त्याचा त्रास अनेक जणांना होत असतो. मुतखड्यामुळे होणाऱ्या त्रासात वेदनांची तीव्रता खूप जास्त प्रमाणात असते. मीठ आणि मुत्रातील खनिज पदार्थ यांचा एकमेकांशी संपर्क आल्यामुळे मुतखड्याचा त्रास जाणवायला सुरवात होतो. मुतखड्याचे प्रकार ही वेगवेगळे आहेत. किडनी मानवी शरीरात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते, ज्यामुळे माणसाचे शरीर निरोगी राहते. जेव्हा अयोग्य जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे मूत्राशयाच्या या कार्यांत अडथळा यायला लागतो, तेव्हा मूत्राशयातील विषद्रव्यांमुळे मूत्राशयात स्फटिकाप्रमाणे खडे तयार होतात. त्याला मुतखडा किंवा किडनी स्टोन असे म्हणतात.

खूप मोठे खडे जर किडनी मध्ये तयार झालेले असतील तर ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नसतो, पण सुरवातीच्या काळात जर खडे आकाराने लहान असतील तर डॉक्टर ऑपरेशनचा सल्ला सहसा देत नाहीत. त्यासाठी डॉक्टर भरपूर पाणी पिऊन लघवीवाटे खडा निघून जाण्यासाठी सल्ला देतात. हळू हळू हा खडा पुढे पुढे सरकतो व ज्यावेळी तो लघवीवाटे निघून जात असतो तेंव्हा खूप वेदना सहन करायला लागतात.

खरंतर या आजारा बाबत सर्वांना माहीती असणं फार गरजेचं आहे. यासाठी आपण या लेखामध्ये मुतखड्याची लक्षणे, मुतखडा होण्याची कारणे आणि मुतखड्यावर घरगुती उपाय कोणते आहेत आणि ते कसे करता येतील हे पाहुया. चला तर मग सुरू करूया माहिती;

मुतखड्यावर घरगुती उपाय / मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय – मुतखडा होण्याची कारणे – मुतखडयाची लक्षणे – मुतखडा झाल्यावर आहारामध्ये करावयाचे बदल (Home Remedies For Kidney Stone In Marathi / Mutkhada gharguti upay – Reasons of Kidney Stone In Marathi -symptoms of Kidney Stone In Marathi)

सुरवातीला आपण मुतखडयावर घरगुती उपाय कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत त्यानंतर मुतखडा होण्याची कारणे व लक्षणे समजून घेतल्या नंतर लेखाच्या शेवटी मुतखडा झाल्यास तुमचा आहार कसा असावा ते जाणून घेऊयात.

मुतखड्यावर घरगुती उपाय / मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Kidney Stone In Marathi / Mutkhada gharguti upay)

मुतखडा हा जरी गंभीर आजार असला तरी घरगुती उपाय करून मुतखड्यामुळे होणारा त्रास कमी करता येऊ शकतो. यासाठी आपल्याला काही घरगुती औषधे आणि उपायांविषयी माहिती असणे फार आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेवुया मुतखड्यावर घरगुती उपाय कोणते आहेत व ते कसे करावेत.

भरपुर पाणी प्या

मुतखड्यावर घरगुती उपाय / मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय -  मुतखडा होण्याची कारणे -  मुतखडयाची लक्षणे
भरपुर पाणी पिणे – मुतखड्यावर घरगुती उपाय

तुम्हाला जर भविष्यात मुतखड्याची समस्या कधीच नको असेल तर हा उपाय  करण्यास काहीच हरकत नाही. भरपूर पाणी पित रहा,जरी तुम्हाला मुतखडा झाला असेन तरी मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय म्हणून भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नैसर्गिकरीत्या खडा शरीराबाहेर पडण्यासाठी हा उत्तम घरगुती उपाय आहे. म्हणुन भरपूर पाणी पिण्याची म्हणजेचं दिवसातुन सात ते आठ ग्लास पाणी पिण्याची सवय स्वतःला लावावी. पाणी पिण्यामुळे आपलं शरीर हायड्रेट राहतं आणि तुम्हाला मुतखड्याचा त्रास होत नाही. 

ओवा

ओवा मुतखड्यासारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो. म्हणुनचं आहारात, मसाल्याच्या रुपात ओव्याचा समावेश असावा असा सल्ला डॉक्टर आणि वडिलधारी माणसं ही देत असतात. याचे महत्वाची कारण म्हणजे लघवीला चालना देण्यात ओवा मदतकारी ठरतो.आणि त्यामुळे मुतखडा पडण्यासाठी मदत होते.

केळी

मुतखड्यावर घरगुती उपाय / मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय Mutkhada gharguti upay - Reasons of  Kidney Stone In Marathi
केळी – मुतखड्यावर घरगुती उपाय

    केळीमध्ये बी-६ नावाचे जीवनसत्व असते. या जीवनसत्वामुळे मुतखड्यांच्या निर्मितीला आळा बसण्यास मदत होते. तसेच मुतखडा झालेल्या व्यक्तिंना केळीच्या सेवनाने म्हणजेचं केळी खाण्याने आराम पडतो.

तुळस

मुतखड्यावर घरगुती उपाय -  मुतखडा होण्याची कारणे -  मुतखडयाची लक्षणे - मुतखडा झाल्यावर आहारामध्ये करावयाचे बदल (Home Remedies For Kidney Stone In Marathi)
तुळस – मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय

    अनेक रोगांवर गुणकारी औषध म्हणजे तुळस. तुळशीची पाने ही मुतखडयावर गुणकारी ठरतात. तुळशीच्या पाने खाल्यावर लघवी होण्याचे प्रमाण वाढते. रोज तुळशीची ताजी पाने वाटून घेवुन त्याचा दोन चमचे रस पिल्यामुळे मुतखडा लघवीवाटे लवकर बाहेर पडण्यासाठी मदत होते. तुळशीची पाने वाटून न घेता नुसती चावून खाल्ली किंवा तुळस घालुन बनवलेला चहा पिला तरी ही आराम पडतो. यांखेरीस तुळशीचे बी तुम्ही रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवा आणि सकाळी ते पाणी अनुषा पोटी पिल्याने सुद्धा मुतखड्यावर फायदा होतो.

डाळिंब

मुतखडा झाल्यावर आहारामध्ये करावयाचे बदल (Mutkhada gharguti upay - Reasons of  Kidney Stone In Marathi -symptoms of Kidney Stone In Marathi)
डाळिंबाचा रस – मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय

डाळिंब हे किडनी स्टोन वर गुणकारी ठरते. डाळिंबामध्ये अॅंटीऑक्सिडेंट घटक असतात ज्यांमुळे किडनी चे कार्य उत्तम होते. डाळिंबाच्या रसामुळे लघवी साफ होते व मुतखडयावर डाळिंब मुतखड्यावर गुणकारी ठरते. मुतखडा झालेल्यांनी दिवसातून किमान एक तरी डाळिंब खावे.

द्राक्ष

मुतखड्यावर घरगुती उपाय / मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय -  मुतखडा होण्याची कारणे -  मुतखडयाची लक्षणे
द्राक्ष – मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय

द्राक्ष हे मुतखड्यावर गुणकारी ठरते. द्राक्ष्याच्या सेवनाने तुमच्या किडनीतील क्षारयुक्त खडा बाहेर पडण्यासाठी मदत होते. त्यामुळे अनेकदा मुतखडा झालेल्या रुग्णांना द्राक्ष खाण्याचा सल्ला दिला जातो.

गव्हाचे अंकुर (Wheatgrass)

गव्हाचे अंकुर हे अनेक आजारांवर गुणकारी ठरतात जसे की कॅन्सर,मूळव्याध आणि मुतखडा.गव्हाच्या अंकुराची पावडर बाजारात उपलब्ध आहे ती पाण्यात टाकून घेतल्यास मुतखडा पडण्यासाठी फायदेशीर ठरते. रोज सकाळी अनुषापोटी गव्हाच्या अंकुराचा रस घेतल्याने मुतखडा पडण्यास मदत होते.

लिंबू

मुतखड्यावर घरगुती उपाय / मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय -  मुतखडा होण्याची कारणे -  मुतखडयाची लक्षणे (symptoms of Kidney Stone In Marathi)
लिंबु – मुतखड्यावर घरगुती उपाय

लिंबामध्ये असणारे सायट्रिक ऍसिड नावाचं रसायन शरीरात कॅल्शियमचा साठा होवु देत नाही. त्यामुळे लिंबाच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरात असलेले हे कॅल्शियमचे खडे विरघळायला मदत होते. म्हणूनच जर मुतखड्याचा त्रास व्हायला लागला तर त्यावर लिंबाचा रस हा एक साधासोपा व उत्तम घरगुती उपाय आहे. तसेच लिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्यामुळे नवीन निर्माण होणारे खडे ही तयार होत नाहीत.

राजमा

मुतखड्यावर घरगुती उपाय / मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय -  मुतखडा होण्याची कारणे -  मुतखडयाची लक्षणे
राजमा – मुतखड्यावर घरगुती उपाय

किडनी आणि मूत्राशयाच्या आरोग्यासाठी राजमा फायदेशीर आहे. पाणी घालून राजमा चांगला शिजवून घ्या, राजमा शिजल्यावर तो शिजवण्यासाठी वापरलेले ते पाणी दिवसभर थोडे थोडे पीत राहावे. त्यामुळे मुतखडा लवकर बाहेर पडण्यास मदत होते.

मुतखड्याचा त्रास होण्यामागची कारणे

पाणी कमी पिण्याची सवय

तुम्ही जर कमी पाणी पित असाल तर त्यामुळे देखील तुमच्या किडनी मध्ये क्षारयुक्त खडा तयार होऊ शकतो. त्यामुळे सतत पाणी पित राहिल्याने मुतखडा सारख्या आजरांपासून तुमचे संरक्षण होईल.

आहाराचे योग्य नियोजन

आहार चांगला न घेतल्याने देखील तुम्हाला मुतखड्याचा त्रास होऊ शकतो. आहाराचे योग्य नियोजन म्हणजे तुमच्या जेवणात जास्त प्रमाणात मीठ, अति प्रोटिणयुक्त पदार्थ तसेच जास्त प्रमाणात मांसाहार केल्याने देखील मुतखडयाचा आजार उदभवतो.

अनुवांशिकता

तुमच्या कुटुंबातील कोणाला जर पूर्वीपासून मुतखडयाचा त्रास असेन तर अनुवंशिकतेने नुसार तो तुम्हाला देखील येऊ शकतो. अश्या प्रकारे देखील मुतखडा पुढच्या पिढीला येऊ शकतो. बहुदा आजोबांना किंवा त्यांचा भावांना अशा प्रकारचा मुतखडयाचा त्रास होत असेन तर तुम्ही देखील सावध राहिले पाहिजे व मुतखडा होऊ नये म्हणून पथ्य पाळले पाहिजे.

पोटाचे आजार असल्यास

आरोग्याच्या इतर समस्या ज्या मूत्राक्षयाशी संबंधित आहेत अशा आजारांनी देखील तुम्हाला भविष्यात मुतखड्याचा त्रास होऊ शकतो. जर तुमची पोटाची सर्जरी झाली असेल किंवा तुम्हाला पोटाशी संबंधित काही आजार असतील तर तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे कारण तुम्हाला मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.

वजन वाढल्याने

तुमचे वजन जर अवास्तव वाढले असेन तर, तुम्ही देखील मुतखडा होऊ नये होऊ प्रतिबंधात्मक काळजी घेतली पाहिजे. वजन वाढल्याने देखील बहुदा मूतखड्याचा त्रास होतो.

बोरवेलचे पाणी

तुम्ही जर बोरवेल चे पाणी पिण्यासाठी वापरत असाल तर शक्यतो ते फिल्टर करून घ्या. कारण बोर च्या पाणी हे क्षारयुक्त असते आणि त्यामुळे तुमच्या किडनी मध्ये क्षार चे खडे तयार होयला सुरवात होते व काही दिवसातच तुम्हाला मुतखड्याचा हा त्रास सुरू होतो. त्यामुळे शक्यतो फिल्टर केलेलं पाणीच पिण्यासाठी वापरा.

मुतखड्याची लक्षणे

सतत पोटात दुखणे

मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय - मुतखडयाची लक्षणे - Mutkhada gharguti upay -symptoms of Kidney Stone In Marathi)

सतत पोटात दुखणे हे मुतखड्याचे लक्षण असू शकते. शक्यतो मुतखडा झाल्यावर पोटात खूप वेदना होतात. अशावेळी त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी करून घेतली पाहिजे.

लघवी करताना लघवीच्या जागेची जळजळ होणे

तुम्हाला जर मुतखडा झाला असेन, तर मुत्रक्षयात वाटे क्षार शरीरातून बाहेर जात असतात, त्यामुळे कदाचित तुमच्या लघवीच्या जागेची जळजळ होत असते.अनेकदा मुतखड्याने त्रस्त झालेल्या लोकांना असा त्रास जाणवत असतो.

लघवी वाटे रक्त पडणे 

लघवी वाटे जर रक्त पडले तर ते देखील मुतखडयाचे एक लक्षण असू शकते.

ताप येणे अथवा थंडी वाजणे

किडनी मध्ये तयार झालेल्या क्षारयुक्त खड्यामुळे तुम्हाला ताप येऊ शकतो किंवा थंडी वाजून येऊ शकते. ताप येणे किंवा थंडी वाजून येणे हे देखील मुतखड्याचे लक्षण असू शकते.

उलटी होणे

मुत्राशयावर आलेला ताण आणि किडनी मधील क्षारयुक्त खडा यामुळे काही जणांना उलटी देखील होते.त्यामुळे उलटी येणे किंवा मळमळ जाणवणे हे देखील मुतखड्याचे लक्षण असू शकते.

लघवीची दुर्गंधी येणे

क्षारच्या वाढत्या प्रमाणामुळे लघवीची दुर्गंधी येते,हे देखील मूतखडयाचे एक लक्षण असू शकते.

मुतखड्याची झाल्यावर तुमचा आहार

आहारात लिंबाचा समावेश

तुम्हाला जर मूतखडयाचा त्रास असेन तर तुम्ही तुमच्या आहारात लिंबाचा समावेश नक्की करावा. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिडचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे नवीन क्षार युक्त खडा तयार होण्यास प्रतिबंध होतो व तुम्हाला मुतखडया पासून आराम मिळतो.

मॅग्नेशियम

आपल्या शरीरात असणारी जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे आणि मूलद्रव्ये हे आपल्याला अनेक प्रकारे मदत करतात आणि अनेक आजारावर उपाय म्हणून काम करतात. त्यातीलच एक खनिजद्रव्य म्हणजे मॅग्नेशियम याचा आहारात समावेश असवा, म्हणजेच मॅग्नेशियम युक्त पदार्थांचा समावेश असावा. शरीरासाठी मॅग्नेशियम अतिशय महत्त्वाचे मिनरल आहे ज्यामुळे मुतखडा पडण्यासाठी मदत होते.  

मीठ कमी खा

तुम्हाला जर मूतखडयाचा त्रास असेन तर तुमच्या आहारात मीठ कमी असावे. भाजीत वरुन मीठ घेणे टाळा,मिठामुळे शरीरातील क्षारचे प्रमाण वाढते आणि पर्यायाने मुतखडा तयार होतो.त्यामुळे मिठाचे आहारातील प्रमाण कमी करणेच फायदेशीर ठरते. हा मूतखडा कमी करण्यासाठी महत्वाचा उपाय ठरु शकतो.

फिल्टर केलेले पाणी

तुम्हाला मुतखडा झाला असेन किंवा होऊन गेला असेन तर तुम्ही नियमित पणे फिल्टर केलेलं पाणीच पिले पाहिजे. बोरवेलच्या पाण्याने मुतखड्याचा आजार उद्भवतो. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात क्षार असतात. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट बोरवेल चे पाणी पिणे टाळा व फिल्टर केलेले पाणी प्यावे.

मांसाहार

तुम्ही जर जास्त मांसाहार करत असाल तर तो करणे यावर नियंत्रित करा.कारण अति मांसाहाराने देखील शरीरातील क्षारचे प्रमाण हे वाढते व त्यामुळे मुतखडा या सारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे मांसाहार कमी करा तुम्हाला मुतखड्यापासून निश्चित आराम मिळेल.

सारांश – मुतखड्यावर घरगुती उपाय / मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय (Mutkhada gharguti upay in marathi)

वरील लेखामध्ये मुतखडयावर घरगुती उपाय आपण बघितले तसेच मुतखडा होण्याची कारणे,लक्षणे व झाल्यावर घेवयाचा आहार हे आपण बघितले. मुतखडा होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक काय केले पाहिजे हे तुम्हाला मुतखडा होण्याची कारणे व लक्षणे वाचून लक्षात आले असेलच परंतु तरी देखील जर काहींना मुतखडयाचा त्रास असेन तर अशांना वरील उपाय करून मुतखड्याच्या आजारावर आराम मिळवता येऊ शकतो. वरील लेखामध्ये दिलेले उपाय हे नैसर्गिक असून याने मुतखड्याच्या आजारावर निच्छित आराम मिळेल परंतु तरी जर तुम्हाला त्रास अधिक जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले मुतखड्यावर घरगुती उपाय कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

2 thoughts on “मुतखड्यावर घरगुती उपाय / मुतखडा पडण्यासाठी ९ सर्वोत्तम घरगुती उपाय”

  1. Eco Environment

    मस्त खूप महत्त्वाची माहिती दिली…..धन्यवाद

  2. Excellent web site. A lot of useful info here. I am sending it to several pals ans also sharing in delicious.
    And obviously, thanks in your sweat!

Comments are closed.

Scroll to Top