मिसळ कशी बनवायची – Best Misal Recipe

मिसळ कशी बनवायची / मिसळ पाव रेसिपी मराठी / मिसळ कशी बनवतात / misal kashi banvaychi / misal recipe in marathi >> आजकाल आपण सर्वचजन पाहतोय की ,आजकाल च्या मुलांना भाजीपोळी खाण्याचा भारीच कंटाळा येतोय. भाजीपोळी खायची म्हणटल, की लगेचच मुले नाक मुरडतात, मुलेच काय आपण मोठी माणसे देखील रोजच्या त्याच त्याच जेवणला कंटाळा करत असतो. मुलांना केवळ चटपटीत पदार्थ खायचे असतात परंतु; आपल्याला वाटते की, लहान मुलांना त्यांच्या सर्वांगीण विकासा साठी आणि परिपूर्ण वाढीसाठी सकस, पौष्टिक आणि पुरेपूर प्रथिने, लोह, जीवनसत्वे आणि करबोद्के मिळणारा आहार असावा.

याचसाठी आम्ही आपल्याला अतिशय उपयुक्त आणि आवश्यक असा लेख घेऊन येत आहोत, ज्यात तुमच्या लहान मुलांच्या जेवणाचा आणि वाढीचा प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होणार आहे, आणि त्याचा फायदा देखील होणार आहे. चला तर मग पाहूया आजची माहिती ती म्हणजे , मिसळ कशी बनवायची.

मिसळ कशी बनवायची / मिसळ पाव रेसिपी मराठी / मिसळ कशी बनवतात / misal kashi banvaychi / misal recipe in marathi
मिसळ

तुम्हाला जर रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेन किवा रोजच्या भाजीचा प्रश्न असेन, त्याच बरोबर लहान मुलांची छोटीशी भूक पौष्टिक रित्या भागवायची असेन, तर आपण आजचा लेख नक्की वाचा, तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल. मिसळ पाव, कोल्हापुरी मिसळ, नाशिक ची झणझणीत मिसळ ही मुंबईकर आणि पुणेकर यांची आवडती डिश तर आहेच परंतु; त्याचसोबत तेवढ्या पुरतीच मर्यादित न राहता, ही डिश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली आहे आणि बर्‍याच महाराष्ट्रीयांचे आवडते खाद्य देखील बनली आहे.

या मिसळ चा फायदा असा की, तुम्ही सकाळचा नाश्ता, दुपार चे जेवण,संध्याकाळ चा नाश्ता, रात्री चे जेवण म्हणून देखील मिसळ खाऊ शकता. झणझणीत मिसळ ही झटपट भूक भागवणारी चटपटीत डिश तर आहेच तसेच अतिशय पौष्टिक देखील आहे. चला तर मग, पाहूया आजच्या लेखात मिसळ कशी बनवायची या विषयी संपूर्ण माहिती.

मिसळ ही आपण पुणेरी पद्धतीने, कोल्हापुरी पद्धतीने बनवू शकतो. मिसळ बनविणे हे सोपे जरी असले तरी त्याचे मसाल्याचे आणि साहित्याचे प्रमाण हे योग्य असले पाहिजे. मिसळसाठी आम्ही आज जी रेसिपी सांगत आहोत ती अतिशय उत्कृष्ठ आणि सोपी व सर्वांना आवडेल अशी आहे आणि या माहितीचा तुम्हाला नक्कीच बराच फायदा होईल. सुरू करूया आजच्या “मिसळ कशी बनवायची/मिसळ पाव रेसिपी मराठी(misal recipe in marathi/misal kashi banwaychi)” या अतिशय उपयोगी येणार्‍या लेखाला.

मिसळ कशी बनवायची (misal kashi banvaychi) / मिसळ पाव रेसिपी मराठी

मिसळ कशी बनवायची / मिसळ पाव रेसिपी मराठी / मिसळ कशी बनवतात / misal kashi banvaychi / misal recipe in marathi
मिसळ पाव रेसिपी मराठी

मिसळ ही बनविण्यास सोपी आणि खाण्यास चविष्ठ आणि पटकन भूक भागवणारी आहे, त्याचसाठी बर्‍याच महिला मिसळ बनविणे पसंत करतात, तर आता सर्वप्रथम आपण पाहूया की मिसळ बनविण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते –

मिसळ बनविण्यासाठी लागणारे साहित्य

तर या लेखात आपण , पाहूया की, झणझणीत मिसळ बनविण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, तर आपल्याला लागणारे साहित्य आहे –

मोड आलेली मटकी दोन वाटी, दोन कांदे, एक टोमॅटो, लसूण – अद्र्क पेस्ट, किसलेले खोबरे तीन छोटे चमचे , अर्धा चमचा धने, थोडे जिरे, फोडणी साठी तेल, चार ते पाच बेडगी मिरची, कढीपत्ता पाने आणि थोडी कोथिंबीर इत्यादि .वरील सर्व साहित्य वापरुन आपण नंबर एक मिसळ बनवू शकतो. आता आपण पाहूया की, वरील साहित्य वापरुन आपण मिसळ कशी बनवायची

मिसळ बनविण्याची कृती (misal recipe in marathi)

झणझणीत आणि मसालेदार मिसळ बनविण्याची सर्वोत्तम कृती आपण खालीलप्रमाणे करावी , या पद्धतीने मिसळ बनवावी ।

मिसळ कशी बनवायची / मिसळ पाव रेसिपी मराठी / मिसळ कशी बनवतात / misal kashi banvaychi / misal recipe in marathi
मिसळ पाव

1.         आता आपण मिसळ कशी बनवायची हे पाहणार आहोत . तर मिसळ बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मोड आलेली मटकी घ्यावी लागेन , जर मोड आलेली मटकी घरात नसेन तर ,मटकी ला मोड आणावे लागतील . मटकीला मोड आणण्यासाठी दोन वाटी मटकी तीन तास भिजत ठेवून मग पाण्याबाहेर काढून भिजलेल्या मटकीला निथळून घ्यावे आणि मग भिजून फुगलेली मटकी रात्रभर सूती कापडात बांधून मोड आणण्यास दमट जागी ठेवावे . आता या बांधलेल्या मटकीला सकाळपर्यंत छान मोड आलेले असणार , झाली तर आपली मोड आलेली मटकी तयार .

2.        मोड आलेली मटकी तयार असल्यास , मटकी ला कुकर मध्ये पाणी टाकुण थोडे वाफून घ्यावे म्हणजे मटकी ही अजिबात कच्ची राहणार नाही , आणि पोटाला त्रास देखील होणार नाही . तसेच खाताना मऊ लागेन .

3.       मटकी ला कुकर मधून एक शिट्टी घेऊन वाफवल्यानंतर एका पातेल्यात काढावे आणि मग मिसळ बनविण्याचा मसाला तयार करून घ्यावा . मिसळचा मसाला बनविण्यासाठी दोन कांदे , बारीक काप करून फ्राय करून घ्यावे , धने आणि जिरे देखील भाजून घ्यावे , किसलेले तीन चमचे खोबरे लाल – तपकिरी भाजून घ्यावे , टोमॅटो , आणि थोडी कोंथिंबीर घ्यावी , हे सर्व साहित्य मिक्सर मधून बारीक करून घ्यावे .

4.       मिसळ साठीचा संपूर्ण मसाला तयार झाल्यानंतर , एक पॅन अथवा कढई घ्यावी . कढईमध्ये तीन चमचे तेल टाकावे , दहा ते बारा कढीपत्ता ची पाणे टाकावी . त्यानंतर तेलात मध्ये आपण जो मसाला मिक्सर मधून मसाला काढला आहे तो टाकावा आणि पाच ते सात मिनिटे तेलामध्ये छान खरपूस भाजून घ्यावा . मसाल्याला छान तेल सुटले की त्यानंतर मसाल्या मध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद , अर्धा चमचा गरम मसाला असेन तर थोडा मिसळ मसाला टाकावा . आणि आपल्या चवीनुसार आवडी नुसार मीठ टाकावे .

5.    त्यानंतर तीन सुक्या लाल मिरच्या टाकाव्या आणि हे सर्व साहित्य तेलात जवळपास पाच ते सात मिनिटे छान फ्राय होऊ द्यावे . छान मस्त तेल सुटले की , त्या संपूर्ण मसाल्या मध्ये आपण शिजवून घेतलेली मटकी टाकावी .

6.   तेलात टाकलेली मिसळ छान पैकी शिजू द्यावी . मटकीला छान उकळी आली की त्या मध्ये थोडे साजूक तूप टाकावे आणि धने जिरे पावडर टाकावी . मिसळ वरती अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी आणि पूर्ण पॅन झाकला जाईल अशी एक प्लेट पूर्णपणे पॅन वर झाकावी , त्यामुळे सपूर्ण फोडणीची वास आणि धने जिरे पावडर याचा सुगंध पुर्णपणे मिसळ मध्ये मिक्स होईल .

7. मिसळ तयार झाल्यानंतर त्याला योग्य प्रमाणात ग्रेव्ही आहे की नाही हे पहावे , नसेन तर कांदा – टोमॅटो आणि भाजलेल्या खोबरे भाजलेले धने जिरे तसेच झणझणीत रंग येण्यासाठी बेंडगी मिरची ची पेस्ट करून हे सर्व साहित्य मिक्सर मधून काढावे आणि त्यानंतर तडका पॅन मध्ये फोडणीस तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर चार ते पाच कढीपत्ता पाने त्या तेलात टाकावे व मिक्सर मधून काढलेला हा सर्व ग्रेव्ही मसाला त्या तेलात टाकावा आणि मस्त तेल सुटे पर्यन्त तेलात होऊ द्यावे . पाच मिनिट झाल्यानंतर त्यात एक कप पानी टाकावे आणि दोन ते तीन मिनिटे उकळू द्यावे .

8. झाली आपली झणझणीत मिसळ तयार . मिसळ तयार झाल्यानंतर एका प्लेट मध्ये सर्व्ह करावी . मिसळ ला छान चव आणि सजावट साठी त्यावर बारीक चिरलेला कांदा तसेच बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी थोडे लिंबू रस टाकावे , आणि एक लिंबू ची फोड द्यावी . तसेच या मिसळ वर थोडे बटर देखील टाकावी अजून मस्त चव आणि सेंट येतो .

9. सर्वात शेवटी मिसळ वरती फरसान टाकावे म्हणजे ते गरम मिसळ मध्ये मऊ पडणार नाही . किंवा मग फरसान मिसळ मध्ये टाकण्याएवजी ताटातच बाजूला ठेवावे , म्हणजे प्रत्येकजन आपल्या आवडीनुसार फरसान मिसळ मध्ये मिक्स करेल .

10. अशा प्रकारे , आपली मिसळ तयार . ही तयार झालेली मिसळ आपण पाव भाजून त्या सोबत मिसळ- पाव म्हणून द्यावी .पाव देण्याआधी पाव ला मधोमध कापावे आणि , बटर लावून पाव भाजावे . बटर लावून भाजलेले पावला बारीक शेव लावावी आणि गरमागरम मिसळ सोबत द्यावी .

उत्कृष्ठ मिसळ साठी काही टिप्स

वरील सर्व साहित्य आणि आणि कृती वापरुन अजून जास्त प्रमाणात उत्कृष्ठ मिसळ बनवायची असेल तर, खालील काही टिप्स वापराव्या

  1. मिसळ ला फोडणी टाकण्याआधी थोडेसे साजूक तूप टाकून भाजावे , त्याने अजून छान चव येते .
  2. मिसळ मध्ये मिसळ पूर्ण तयार झाल्यानंतर पुदिना पाणे बारीक कूट करून कोथिंबीर सारखे मिसळ वर टाकावे आणि पूर्ण पॅन अथवा कढई झाकली जाईल असे झाकण त्यावर झाकून ठेवावे .

सारांश – मिसळ कशी बनवायची / मिसळ पाव रेसिपी मराठी / misal recipe in marathi

आपल्याला जर उत्कृष्ठ आणि झणझणीत मिसळ बनवायची असेन तर आमच्या लेखातील वरील ” मिसळ कशी बनवायची ” ही माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी येईल , आणि वरील रेसिपी वाचून आपली मिसळ नक्कीच सर्वोत्कृष्ठ बनेल, यात काही शंका नाही. मिसळ बनविण्याचे वरील साहित्य आणि कृती आपल्याला मिसळ बनविण्यास फायदेशीर ठरेल.

आपल्याला ही “मिसळ कशी बनवायची /मिसळ कशी बनवायची रेसिपी  मराठी (misal kashi banvaychi/misal recipe in marathi)या विषयी ची माहिती कशी वाटली, आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top