पुदिन्याचे फायदे / पुदिना खाण्याचे फायदे / पुदिना चे फायदे /mint leaves benefits >>पुदिन्याच्या वापरामुळे आपल्या बनवलेल्या स्वयंपाकाची चव वाढते. स्वयंपाकघर या व्यतिरिक्त पुदिण्याचे अनेक असे आरोग्यदायी फायदे आहेत. पुदिण्याच्या वेगवेगळ्या चटण्या देखील खाण्यास अगदी उत्तम लागतात.आपल्याला पाणीपुरीच्या पाण्याची चटपटीत चव देखील पुदिण्याच्या चव आणि सुगंधामुळेच मिळतात.
आपल्याला माहीतच असेल की, पुदिन्यामध्ये बर्याच प्रमाणात अॅंटीइन्फ्लौमेंटरी तसेच अॅंटीबेक्टेरियल असे गुणधर्म असतात, जे आपल्या शरीराच्या आतील तसेच बाहेरील आजारावर आणि साधारण अशा रोगावर बर्याच प्रमाणात फायदेशीर असतात. त्यामुळे आपल्याला पुदिण्याचे कोणते कोणते आणि कसे फायदे आहेत, ही सर्व माहिती माहीत असायला पाहिजे आणि ती माहिती आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठीच आम्ही “पुदिन्याचे फायदे” हा लेख घेऊन येत आहोत.
पुदिन्याचे अनेकविध असे बरेच फायदे आहेत जे अजून पर्यंत सर्वांनाच माहीत नाही आहेत. पुदिना हा मिंट लीव्ज म्हणून ओळखला जातो. पुदिण्याची पाने ही दिसण्यास अगदी छोटी- छोटी आणि बारीक असतात, परंतु त्यांचे फायदे आणि गुण हे बर्याच प्रमाणात आपल्याला मिळत असतात, त्यामुळे आपण आपल्या रोजच्या आहारात पुदिनयाच्या पानांचा वापर हा केलाच पाहिजे.
पुदिना हेउत्तम एक चव देणारे , सौंदर्य वाढवणारे आणि आणि उत्तम सुगंध प्रदान करणारे एकमेव असे पाने आहे, पुदिना पाने ही या सुंगध –सौंदर्य -चव त्रिवेणी संगमाणे अगदी परिपूर्ण अशी आहेत. चला तर मग जाणून घेऊया माहिती, पुदिन्याच्या फायद्यांविषयी. आपण हा लेख आणि यातील माहिती वाचून त्याचा उपयोग आई फायदा करून घेऊ शकता; परंतु ‘अति सर्वत्र वर्ज’ ही उक्ती लक्षात ठेऊन कुठल्याही पदार्थाचे सेवन करावे, त्यामुळे तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम सहन करावे लागणार नाहीत.
Table of Contents
पुदिन्याचे फायदे / पुदिना खाण्याचे फायदे / mint leaves benefits :
पुदिना हा थंडीच्या दिवसात आणि उन्हाळयात देखील वापरला जातो. पुदिना हा आपल्या पदार्थांची चव वाढवतो, उत्तम असा सुगंध प्रदान करतो आणि त्याच बरोबर आपण याचा फायदा सौंदर्य वाढवण्यासाठी देखील करू शकतो. परंतु, कुठलीही गोष्ट ही नियंत्रणात असावी, अति काहीही कधीही हानिकारकच असते, त्यामुळे पुदिन्याचे फायदे जारी जास्त असले तरी त्याचे सेवन हे नियंत्रणात आणि योग्य प्रमाणातच करावे.
पुदिन्याच्या पानांचे अति प्रमाणात सेवन केल्याने त्या अतिसेवन केल्याने आपल्याला दुष्परिणाम देखील भोगावे लागू शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि नियंत्रणात पुदिन्याचे सेवन करावे. तसेच आपल्याला काही एलेरजी असल्यास हे उपाय आणि फायदे करू नये किंवा वैद्यकीय सल्ला घ्यावा.
पचनक्रिया सुधारते –पुदिन्याचे उपयोग
पुदिन्याच्या वापरामुळे, जर आपल्याला अॅसिडिटीचा त्रास होत असेन तर तो कमी होतो तसेच पोटातील दाह देखील शांत होतो आणि आपली पचनक्रिया देखील सुधारते. त्यामुळे आपल्याला जर अपचन चा त्रास असेल तर आपण आपल्या आहारात पुदिण्याचा समावेश करावा त्याचा नक्कीच तुम्हाला चांगलाच फायदा होईल आणि तुमची पचनक्रिया देखील सुधारेल.
पेन-किलर्स म्हणून पुदिना उपयोगी
पुदिना हा नैसर्गिक पेन-किलर्स प्रमाणे काम करतो म्हणून बर्याच वेळा आयुर्वेदिक औषध मध्ये पुदिण्याचा समावेश केला जातो. पोट कफ छातीत जळजळ मळमळ यासारख्या छोट्या-मोठ्या अनेक आजारावर पुदिण्याचा अर्क हा आधी पासूनच दिला जातो आणि त्याचा फायदा देखील होतो. त्यामुळे तुम्हाला काही वेळेस पेनकिलर्स घेण्याची गरज नाही पडणार.
माऊथ फ्रेशनर म्हणून पुदिना उपयोगी
तोंड आणि दात चांगल्याप्रकारे स्वच्छ केल्यानंतर देखील काही जणांच्या तोंडाला घाणेरडा वास येतो, याचा त्यांना स्वतःला आणि इतरांना देखील त्रास होतो.काही वेळेस ही समस्या अस्वच्छते सोबत पचनक्रियाच्या समस्या निर्माण झाल्यास देखील उद्भवते. काही वेळेस बराच वेळ झोपेतून उठल्यानंतर तर काही वेळेस बराच वेळ काहीच न खाल्ल्याने देखील दुर्गंधी येते, अशा वेळी आपण पुदिन्याचे पाने चावून खावी. पुदिना हा माऊथ फ्रेशनर चे काम करतो.
खाज कमी होते- पुदिन्याचे फायदे
पुदिन्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. जळजळ होणे देखील कमी होते. त्वचेला खाज सुटणे, दाह होणे यांसारख्या वेदना देखील पुदिना पेस्ट लावल्याने कमी होतात. पुदिन्यातील मिंट या गुणधर्ममुळे कोणत्याही वेदनेपासून आपल्याला आराम मिळतो. त्यामुळे आपल्याला जर खाज होत असेल तर त्यावर पुदिन्याच्या पानांचा रस लावावा त्याने खाज कमी होते.
दमा आजारावर फायदेशीर
पुदिन्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म हे दमा असलेल्या रुग्णासाठी अतिशय लाभदायक असे आहे. धुळी पासून किंवा माती पासून अथवा इतर कशाची हानी होत असेल तर आपण नियमित आहारात पुदिन्याची चटणी किंवा पुदिन्याचा अर्क स्वयंपाक घरात वापरावा. त्यामुळे दम्या सारख्या आजाराचा आपल्याला जास्त त्रास होणार नाही, तसेच कुठल्याही प्रकारची हानी आणि दुष्परिणाम देखील होणार नाहीत.
वजन कमी करण्यास मदत – पुदिन्याचे उपयोग
बर्याच जणांना वजन वाढण्याची समस्या असते, कमी खाल्ले तर देखील काही जणांचे भन्नाट वजन वाढते आणि अनेक आजारांना आमंत्रण मिळते. जर वजन कमी करण्यास, नियंत्रणात राहण्यासाठी आपण आपण आपल्या आहारात पुदिन्याचा वापर केल्यास आपल्या समस्या नाहीश्या होतील आणि वजन हे नियंत्रणात राहील.
दिवसभरात ऊर्जा मिळवण्यास फायदा
पुदिन्याच्या पानांचा रस पिल्यास किंवा ताकामध्ये पुदिन्याचे पान बारीक करून टाकून ते ताक पिल्यास आपल्याला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते आणि त्याचबरोबर दिवसभर फ्रेश आणि टवटवीत देखील वाटते. तसेच कोशिंबीर मद्ये देखील पुदिन्याचे पाने टाकावी. पुदिण्याचे पाने खाल्याने वजन सुद्धा कमी होते आणि शरीराला ऊर्जा जास्त मिळते. त्यामुळे दिवसातून एक वेळेस तरी याचे आपल्या आहारात समाविष्ट करणे महत्वाचे आहे.
घसा बसला असेन तर उपयोगी
आपला घसा बसला असेन, आवाज बसला असेन, किंवा घशाचे कोणतेही इन्फेकशन झाले असेल तर, पाण्यात पुदिना पाने टाकून ते पानी उकळावे आणि हे पानी कोमट झाल्यावर त्या पाण्याने गुळण्या कराव्या. तसेच मीठच्या पाण्यात पुदिना उकळून त्याने गुळण्या केल्या तरी देखील घशाची समस्या दूर होते. पुदिना हा सर्दी खोकला आणि घसा सगळ्यांवर फायदेशीर आहे.
उचकी थांबवण्यास मदत – पुदिना खाण्याचे फायदे
अपचन किंवा जागरण झाल्यास आपल्याला उचकी येऊ शकते. अशा वेळी सतत येत असलेली उचकी थांबवण्यासाठी त्या व्यक्तिला दहा बारा पुदिन्याची पाने चावून खाण्यास द्यावी त्याने लवकर उचकी कमी होण्यास मदत होते. मळमळ किंवा पित्त उसळले असेल तरी देखील पुदिना हा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरत असतो. त्यामुळेच याला बहुपयोगी पाणे असे म्हणतात.
कॉलरा आजारावर रामबाण उपाय
आपल्याला जर कॉलरा झाला असेन तर आपण कांद्याच्या रसासोबत व लिंबाच्या रसा सोबत पुदिन्याच्या पानांचा रस पिल्याने या आजारचा त्रास कमी होऊन आपल्याला लवकर आराम मिळतो.
जखम भरण्यासाठी फायदेशीर
जर शरीरावर कुठेही जखम झाली असेन तर किंवा खरचटले असेल तर त्याच्यावर पुदिण्याची ताजी पाने बारीक करून त्याचा लेप लावावा. त्यामुळे जखम चिघळणार नाही आणि त्याचे कोणतेही इन्फेकशन होऊन ती जखम पसरणार नाही व लवकर आराम मिळेन.
नियमित मासिक पाळी येत नसल्यास फायदेशीर
मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर पुदिन्याची सुकी पाने घ्यावी आणि त्याची बारीक पूड बनवावी व दिवसातून दोन वेळेस ती पूड मधात टाकून नियमितपणे घ्यावी. असे केल्याने मासिक पाळी नियमित येण्यास मदत होईल. पुदिना हा अॅंटीबॅक्टीरिया आणि अॅंटी इन्फ्लोमिओ म्हनून काम करतो, आणि त्या मुळेच रक्त शुद्धीकरणात त्याचा फायदा होतो.
आकलनशक्ती वाढण्यास मदत- पुदिन्याचे फायदे
पुदिन्यामध्ये पोषक घटक हे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचा आकलनशक्ती वाढण्यास उपयोग होतो. पुदिन्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म आपली स्मरणशक्ती वाढण्याचे काम करतात. नियमित पुदिन्याचे सेवन करणारे लोक इतरांच्या तुलनेत खूपच हुशार आणि सक्रिय असतात, त्यामुळे पुदिना आकलनशक्ती वाढण्यास आणि बुद्धीचा विकास करण्यास फायदेशीर ठरतो.
सौंदर्यासाठी पुदिन्याचा उपयोग / mint leaves benefits / use of mint for beauty
वरील सर्व आरोग्यवर्धक फायद्याबरोबरच अनेक सौंदर्य वर्धक फायदे देखील या पुदिण्यामुळे आपल्याला मिळत असतात ते इतर फायदे आणि उपयोग कोणते आहेत ते पाहूया –
पिंपल्स कमी करण्यास मदत- पिंपल्स साठी पुदिण्याचा उपयोग
पिंपल्स आणि ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स च जर त्रास होत असेल तर किंवा ते घालवायचे असतील तर पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून धुवून त्याचा लेप लावावा त्यामुळे बर्यापैकी चेहरा सुंदर आणि तेजस्वी होण्यास मदत होते.
काळे डाग कमी करण्यास मदत – डाग घालवण्यासाठी पुदिण्याचा उपयोग
पिंपल्स मुळे जर तुमच्या चेहर्यावर जर काळे डाग पडले असतील तर लिंबूच्या रस मध्ये पुदिन्याची पाणे बारीक करून पेस्ट करावी. ही पेस्ट काळे डाग पडले त्या जागी 20 मिनिट लावावी, त्याने डाग कमी होतात, तसेच डोळ्याखाली काली वर्तुळे झाली असतील तर त्याखाली देखील ही पेस्ट लावावी.
सारांश – पुदिन्याचे फायदे/ पुदिना खाण्याचे फायदे / पुदिन्याचे उपयोग / mint leaves benefits
आपल्याला जर पुदिन्याचे फायदे माहीत नसतील आणि आपण पुदिन्याचे पानांचे सेवन करीत नसाल तर हा लेख नक्की वाचा यातील माहिती वाचून आपल्याला कोणत्या गोष्टीवर पुदिन्याच्या पानाचा कसा उपयोग होतो आणि तो कसा करून घ्यावा हे लक्षात येईल. त्यामुळे आपल्याला वरील पैकी कोणताही त्रास असेल तर आपण या लेखात सांगितलेले पुदिन्याचे उपयोग करावे त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले ,पुदिन्याचे घरगुती उपयोग / पुदिन्याचे फायदे /( mint leaves benefits) हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)