मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे/ मासिक पाळी न आल्यास काय करावे/ मासिक पाळी न येण्याची कारणे /masik pali mahiti >>मासिक पाळी येणे म्हणजेच हा प्रत्येक मुलीमध्ये होणारा पहिला बदल आणि तो अत्यंत महत्वाचा ठरणारा असा बदल आहे. सुरूवातीला पहिल्यांदा मासिक पाळी येणे म्हणजे तरुण मुलीस तिच्या स्त्रीत्वाकडे जाण्याचा सर्वात पहिला टप्पा समजला जातो. मासिक पाळी येण्याचे हे चक्र मुलीच्या वयाच्या सुमारे 12 ते 14 वर्षापासून सुरू होते आणि ते वयाच्या 45 ते 50 पर्यंत चालू राहते. या कलावधीत बर्याच छोट्या-मोठ्या गोष्टींचा स्त्रियांना आणि मुलींना सामना करावा लागतो.
आधीच्या काळी तर मासिक पाळी याबाबत खूप चुकीच्या समजुती, रूढी आणि परंपरा होत्या; परंतु आता शैक्षणिक ज्ञान आणि शिक्षणात या गोष्टींचा आभ्यास समाविष्ट झाल्याने याबाबत असणार्या गैरसमजुती आणि अज्ञान, चुकीची माहिती या सर्व बाबी कमी झाल्या आहेत. मासिक पाळीशी निगडीत अनेक समस्या आहेत आणि त्यातील च एक म्हणजे मासिक पाळी लवकर किंवा महिन्यातून दोन वेळेस येण्याची समस्या याची करणे आणि उपाय या लेखात आपण पाहणार आहोत. हा लेख आम्ही महिला आणि मुलींच्या आरोग्य विषयक समस्यांचे समाधान करण्यासाठी आणि आरोग्य तक्रारींचे निवारण करण्यासाठी सादर करीत आहोत.
Table of Contents
मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे / masik pali mahiti
मासिक पाळीचे हे चर्क्र सुरू झाल्यानंतर हे नियमित एका cycle मध्येच चालायला हवे, म्हणजे जसे की, मासिक पाळी ही दर 27 ते 28 दिवसांनी येते आणि ती एव्हड्या कलावधीत नियमित दर महिन्याला यायला हवी, सुरूवातीला म्हणजे पहिल्यांदा जेंव्हा मासिक पाळी येणे सुरू झाल्यानंतर एक ते दोन वर्षे तो नियमित येत नसली तर ही अनियमितता एखाद वर्षे मान्य करण्याजोगी असते परंतु नंतर मात्र मासिक पाळी येणे सामान्य होऊन साधारणपणे ती 28 दिवसांनी येणे सदृद्थ आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
परंतु काही कारणाने किंवा एखाद्या असणार्या समस्येमुळे मासिक पाळी हे वेळेच्या आधीच म्हणजे 15 दिवसांनी च येते आणि या लवकर येणार्या मासिक पाळी मुळे बराच त्रास आणि शारीरिक अस्वस्थतेचा सामना करावा लागतो, तर मासिक पाळी अनियमित होण्यामागे म्हणजे मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे कोणती आहेत ती आपण जाणून घेऊयात. साधरणपणे खालील कारणे ही मासिक पाळी लवकर येण्याची समजली जातात .
वजन कमी होणे अथवा वाढणे
जर तुमचे वजन अचानक वाढत असेल अथवा कमी होत असेल तर मासिक पाळी ही 15 दिवसांनी येऊ शकते, कारण या काळातच हार्मोन्स देखील बदलत असतात त्यामुळे बदलेल्या हार्मोन्स मुळे मासिक पाळी वेळेच्या आधी येऊ शकते.
सतत तणावग्रस्त मनःस्थिती
तुमचे मन हे तुमच्या शरीरावर परिणाम करते हे काही खोटे नाही, तुमच्या मनावर कुठला ताण असेल तर, तुमचे कोणत्याही कामात देखील मन लागत नाही तसेच अशक्तपणा आणि नैराश्यता जाणवते, याचे कारण म्हणजे, जेंव्हा तुम्ही बर्याच ताण आणि टेंशन मध्ये असतात तेंव्हा सतत घेत असलेल्या तणावामुळे तुमच्या रक्तातील स्टेस्स हार्मोन्स वाढतात आणि त्याचा परिणाम सरळ तुमच्या मासिक पाळी येण्यावर होतो, म्हणून सतत तणावग्रस्त मनःस्थिती हे मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याचे कारण ठरू शकते.
थायरोईड्स आजार असल्यास
थायरोइड्स ग्रंथी द्वारे मासिक पाळी साठी आवश्यक संप्रेरक तयार होऊन नियंत्रित केले जातात. त्यामुळे थायरोइड्सशी निगडीत आजार असल्यास, थायरोइड्स कमी कार्यरत असल्यास प्रोजेस्ट्रोल आणि इस्ट्रोजेण हे दोन संप्रेरक मासिक पाळी अनियंत्रित होण्यास कारणीभूत ठरतात. काही वेळा हायपरथायरोइड्स मुळे पाळी उशिरा येते आणि जास्त रक्तस्त्राव होतो तर मासिक पाळी लवकर लवकर येते.
रक्त पातळी सारखी बदलत असल्यास
आपल्या शरीरातील रक्तपातळी ही योग्य प्रमाणात असण्याला सुद्धा महत्व आहे, शरीरातील रक्त हे सर्व कार्यास पुरववले जाते आणि शरीराला नियमितता येते. मानवी शरीरात पुरूषांचे रक्ताचे प्रमाण 12 ते 14 ग्राम रक्त असावे आणि स्त्रियांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण 10 ते 12 असावे, परंतु काही वेळेस जेंव्हा स्त्रियांच्या शरीरात ही रक्ताची पातळी कमी किंवा अचानक जास्त होते तेंव्हा त्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो.
PCOS चे संक्रमण झाल्यास
PCOS म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा हार्मोनल रोग आहे. यामुळे महिन्यातून दोन वेळेस म्हणजे 15 दिवसांनी मासिक पाळी येते. PCOS म्हणजे पॉलिसिस्टीक ओव्हेरियन सिंड्रोम, याचे जर शरीरात संक्रमण झाले तर त्याचा थेट परिणाम मासिक पाळी वर होत असतो आणि मासिक पाळी महिन्यातून दोन वेळेस येते.
कर्करोग झाला असल्यास
गर्भ पिशवीला कर्करोग ची लागण झाल्यास देखील मासिक पाळी 15 दिवसांनीच येते आणि मासिक पाळी वेदनादायक देखील वाटू लागते, त्यामुळे हे एक मासिक पाळी लवकर येण्याचे अनियमित होण्याचे गंभीर कारण समजले जाते. त्यासाठी त्वरित डॉक्टरांना भेट द्यावी.
गर्भाशयात गाठी/ फाईब्रोइड्स झाल्यास
महिलाच्या गर्भाशयात फाईब्रोइड्स होणे सध्या यांचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे आणि हे सामान्य देखील झाले आहे परंतु याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण याचे गंभीर परिणाम देखील उद्भवू शकतात. ही समस्या वयाच्या 40 शी नंतर जास्त करून निर्माण होते, हा एक कॅन्सर नसलेला ट्यूमर आहे यास गर्भाशयच्या गाठी असे देखील म्हणतात. ह्या कारणामुळे मासिक पाळीत जास्त राक्त्स्त्राव आणि वेदना होऊ शकतात तसेच वेळप्रसंगी गर्भ पिशवी देखील काढून टाकावी लागू शकते. या कारणामुळे महिन्यातून दोन वेळेस किंवा अधिक वेळेस देखील मासिक पाळी येऊ शकते.
गर्भ पिशवी वर सूज आल्यास
गर्भ पिशवीला ईजा होणे, जखम होणे किंवा गर्भ पिशवीत काही समस्या निर्माण झाल्याचा महिलाच्या गर्भ पिशवीवर सूज येऊ शकते आणि गर्भ पिशीवीशी निगडीत कोणतीही समस्या निर्माण झाली तरी त्याचा थेट परिणाम हा मासिक पाळीवर होत असतो. त्यामुळे गर्भ पिशवीवर सूज येणे हे कारण देखील मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याचे एक कारण आहे. त्यामुळे कधीही अशी समस्या वाटत असल्यास सोनोग्राफी करावी जेणे करून त्यानुसार आपल्याला विलाज करता येईल.
अल्सर झाला असल्यास
अल्सर म्हणजे काय तर, पोटातील लहान आतड्याला जखम होणे किंवा आतडयात काही समस्या निर्माण होणे होय, जर असा महिलांच्या पोटात जर अल्सर चा आजार झाल्यास देखील मासिक पाळी 15 दिवसांनी येऊ शकते.
राजोनिवृत्ती जवळ आली असल्यास
निसर्ग नियमांनुसार प्रत्येक स्त्रीला वयाच्या तरुणपणात चौदाव्या वर्षापासून ते पंचेचाळीस ते पन्नास वर्षापर्यंत मासिक पाळी येत असते. या वर्षांनंतर मासिक पाळी येणे बंद होते त्यालाच राजोनिवृत्ती म्हणतात. या एवढ्या कलावधीत जर चाळीस -पंचेचाळीस वर्षापर्यंत मासिक धर्म नियमित वेळोवेळी 28 दिवसांच्या अंतराने येत असेल आण अचानक चाळीशीनंतर 15 दिवसांनी किंवा लवकर येणे, जास्त रक्तस्त्राव होणे अशा समस्या जाणवत असतील तर त्याचे कारण राजोनिवृत्ती जवळ आली असल्यास, ही समस्या उद्भवू शकते.
तर ही वरील सर्व झाली मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे ; परंतु काही वेळेस मासिक पाळी वेळेवर येत नाही त्याचे कारण म्हणजे
मासिक पाळी न येण्याची कारणे
नियमित मासिक पाळी येणे हे महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. काही नैसर्गिक कारणाने मासिक पाळी न आल्यास ते चिंतेचे कारण नसते; परंतु काही वेळा हे शारीरिक अंतर्गत समस्येचे लक्षण देखील असु शकते त्यामुळे याचे कारण जाणून घेतले पाहिजे.
- थायरोइड्स किंवा मधुमेह असणे
- शरीरा मध्ये रक्त कमी असणे
- गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केलेले असणे
- हार्मोनल असंतुलन होणे
- जास्त व्यायाम करणे
- गरोदर राहणे
- प्रसूती नंतर स्तनपाण करणे
- PCOS असणे
सारांश – मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे / मासिक पाळी न येण्याची कारणे
तुम्हाला जर असा मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याचा त्रास असेल तर किंवा महिन्यातून दोन वेळेस मासिक येत असेल तर त्याचे कारणे ही वरील लेखात सांगितलेले असू शकतात, त्यामुळे यावर लवकर उपचार करावेत, कारण जर मासिक पाळी 15 दिवसांनी येत असेल तर त्यामुळे तुम्हाला अतिशय शारीरिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे वरील कारणांनुसार उपचार आणि वैद्यकीय सल्ला घेऊन मासिक पाळी नियमित करावी.
आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेली, ” मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे ” ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)