मान दुखणे घरगुती उपाय | मान दुखीवर उपाय (man dukhane upay / man dukhi upay in marathi ) | Remedy for neck pain >> सततचे एक जाग्यावर बसून काम करून किंवा मानेला जास्त ताण पडल्यास मान दुखीचा त्रास सुरू होतो. तसे म्हटले तर मानदुखीची अनेक कारणे आहेत. खुप लोकांना कसेही आडवे तिडवे झोपण्याची सवय असते. अशा चुकीच्या झोपल्यामुळे सुध्दा मानेवर ताण पडतो आणि मग मान दुखी सुरू होते. असे आडवे तिडवे झोपल्याने मानेला आधार मिळत नाही. झोपेत मग मान अवघडल्यासारखी होते आणि मग मानेला ताण पडुन मान दुखते. आणि मग झोपेतुन उठल्यावर जाणवते की मान दुखत आहे.
त्याचबरोबर अनेक जणांना खुप मोठया मोठया उशा घेण्याची सवय असते, कडक किंवा जाड उशी झोपताना डोक्याखाली घेतल्याने मानेवर ताण पडतो. आणि मग मान दुखायला सुरू होते. व्यायाम करणे हे आपल्या आरोग्यासाठी खुप उपयुक्त आहे पण हाच एखादा व्यायाम चुकीच्या पध्दतीने केल्यास देखील मानदुखी होवु शकते. कुणाच्या सल्ल्याशिवाय किंवा कुणालाही न विचारता मनाने व्यायाम केला आणि तो जर व्यवस्थित नाही केला तर मान दुखीच्या त्रासाबरोबरच इतर देखील स्नायूंचे दुखण्याचे त्रास उदभवु शकतात. एखादया वेळेस खेळता खेळता मानेला झटका बसला तरी मान दुखायला चालु होते.
आयटी क्षेत्रातील अनेकांना एकाच जागेवर लॅपटॉप किंवा कॅम्पुटर वर जास्त वेळ बसुन काम असते, आणि मग जास्त कामामुळे जागेवरून उठायला जमत नाही त्यामुळे मग अशावेळेस खुर्चीवर बसल्याने पाठीला तर आराम मिळतो. पण मान वरच्या वर राहते आणि मग मानेमध्ये वेदना सुरू होतात. तर अशाच प्रकारच्या मान दुखीवर काही घरगुती उपाय आहेत ते आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात मान दुखणे घरगुती उपाय / मान दुखीवर उपाय (man dukhane upay / man dukhi upay in marathi) कोणते कोणते आहेत.
Table of Contents
मान दुखणे घरगुती उपाय / मान दुखीवर उपाय (man dukhane upay / man dukhi upay in marathi) | Remedy for neck pain
१. जर तुम्हाला जास्त वेळ बसुन राहण्याचे काम असेल, तर काम करताना तुमच्या बसण्याच्या सवयी बदला. जास्त वेळ एक सारखे बसुन काम असेल तर अशावेळेस मध्ये मध्ये बसल्या बसल्या मान वर खाली फिरवावी, डाव्या उजव्या बाजुला मान फिरवावी याने नक्कीच आराम मिळेल. तसेच सलग बसुन राहु नका कामाच्या मध्ये थोडया थोडया वेळाने गॅप घ्यावा. याने जास्त मानेवर ताण येणार नाही, तसेच मध्ये मध्ये स्ट्रेचिंग करून परत कामाला लागा असे केल्याने मान दुखीचा त्रास तुम्हाला होणार नाही.
२. ऑफिसमध्ये बसल्या बसल्याच दोन्ही हात एकमेकांत अडकावुन त्यावर आपले डोके ठेवावे आणि डोक्याला थोडेसे दाबावे. असे केल्याने मानदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
३. तुम्हाला जर सतत मान दुखीचा त्रास होत असेन आणि मान जर जास्तच दुखत असेल तर मानेच्या जागेवर थंड किंवा गरम शेक दयावा, दुखणार्या मानेवर बर्फाचा शेक दिल्याने आखडलेले स्नायु मोकळे होऊन मानदुखीचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर मान दुखत असल्यामुळे मानेवर आलेली सुज सुध्दा कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जर सततचा मान दुखी चा त्रास असेल तर आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा अशा प्रकारे शेक दिल्याने निच्छितच मन दुखी पासून आराम मिळतो.
४. अंघोळ करताना मानेवर जितके सहन होईल तितके गरम पाणी टाकल्याने आखडलेले स्नायु मोकळे होऊन दुखत असलेली मान दुखायची राहते. मान दुखी वरील हा घरगुती उपाय करताना, भाजेल इतके गरम पाणी घेऊ नये. जितके तुमच्या त्वचेला सहन होईल तेवढेच गरम पाणी घ्यावे. अनेकदा झोपेत अवघडलेली मान अशा प्रकारे गरम पाण्याने शेकल्यास नक्कीच आराम मिळतो. ज्यांना ऑफिस मध्ये सतत एका जागेवर बसून काम असते आशांनी देखील रोज हा उपाय केल्यास मान दुखी पासून निच्छित आराम मिळतो.
५. मान दुखत असलेल्या जागेवर हलक्या हाताने कोणतीही क्रीम न लावता मसाज केल्याने देखील मान दुखण्याचा त्रास कमी होण्यास मदत होते. मसाज केल्याने आखडलेले स्नायु मोकळे होतात आणि मग मान दुखणे देखील थांबते. एखादी वेदनाशम क्रीम असल्यास ती लाऊन मसाज करावी. मसाज करताना एका गोष्टीची काळजी घ्यावी ती म्हणजे हलक्या हातानेच मसाज करावी, नाहीतर जास्त जोरजोरात मसाज केल्याने दुसरेच आजार मागे लागु शकतात. त्यामुळे स्वतःच आपल्या हाताने मसाज करावी.
६. झोपताना डोक्याखाली चांगली उशी घ्या
झोपताना उशी नाही घेतली तर चांगलेच पण काही लोकांना बिना उशीची झोप येत नाही. मग अशावेळेस मानेखाली कमी जाड व मऊ उशी घ्यावी. याने मानेला विश्रांती मिळु शकते आणि सकाळी उठल्यावर मान दुखी सारख्या समस्या उद्भवत नाहीत.
७. ज्यांची मान नेहमीच दुखते अशा व्यक्तींनी प्रवास करताना मानेचा पट्टा वापरावा, त्याने प्रवासा दरम्यान शरीराच्या होणार्या अवास्तव हालचाली मुळे मान दुखी सारखे आजार वाढत नाहीत. अशा प्रकारे लांबच्या प्रवासा दरम्यान मानेचा पट्टा हा उपयोगी पडते. ज्यांना जास्त प्रमाणात मान दुखीचा त्रास आहे अशा व्यक्ती हा पट्टा रोज वापरू शकतात याने मान दुखी चा त्रास निच्छित कमी होतो.
८. लैव्हेंडर तेल
लैव्हेंडर तेलाचा उपयोग केल्याने देखील मानदुखीचा त्रास कमी होतो. लैव्हेंडरच्या तेलाचा उपयोग खुप जुन्या काळापासुन औषधी म्हणुन केला जातो. तर हेच लैव्हेंडर चे तेल मान दुखत असलेल्या जागेवर चोळल्यास मान दुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.आठवड्यातून किमान ३ वेळा हे तेल मानेला झोपताना लावा मान दुखीवर उपाय म्हणून हे तेल अत्यंत गुणकारी ठरते.
९. अर्निका या फुलापासुन तयार केलेले औषध मिळते. त्या औषधाचा वापर देखील मान दुखत असल्यास केल्याने, मान दुखण्याचा त्रास नक्कीच कमी होण्यास मदत होते आणि तुमच्या मानेला आराम मिळु शकतो. त्यामुळे जर मान दुखत असेल तर अर्निका फुलाचे तेल किंवा त्याचा रस मानेला लावावा.
१०. आले (अद्रक)
आल्याचा वापर सुध्दा मान दुखीच्या आजारावर केला जातो. आल्याने मान दुखी चा त्रास कमी होण्यास मदत होते. आले सुध्दा खुप बहुउपयोगी असे औषध आहे. आल्याचा रस काढुन दुखत असलेल्या मानेवर चोळल्याने आराम मिळतो त्यामुळेच आले हे मान दुखणे उपाय म्हणून देखील वापरले जाते.
११. मान दुखण्याचा त्रास होत असेल तर हिटींग पॅडचा उपयोग करावा. यामुळे नक्कीच तुमच्या मानेला आराम मिळु शकतो. मान दुखत असल्यास हिटींग पॅड घेऊन मानेच्या खाली ठेवून थोडावेळ झोपल्याने देखील मानेला आराम मिळतो. तसेच मानेचे स्नायु ताणले गेले असतील, तर ते मोकळे होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे गरम पाण्याची पिशवी सुध्दा मानेखाली ठेवल्याने आखडलेल्या नसा मोकळया होण्यास मदत होते. रोज रात्री झोपताना मानेला आशा पद्धतीने शेक दिल्याने साधारण १५ दिवसांमध्ये तुम्हाला मान दुखी पासून निच्छित आराम मिळतो.
१२. काही लोकांना कामाचा ताण घ्यायची खुप सवय असते. म्हणजे आवश्यक नसलेले काम सुध्दा ही लोक करण्यासाठी मरमर करतात. पण असे केल्याने मग मानेवर ताण सुध्दा जास्त पडतो. मग मानेचे स्नायु अवघडतात, आणि मग मानेवर ताण पडुन मानदुखीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे मग तुम्हाला आवश्यक आहे तेवढेच काम करावे. त्यामुळे तुम्हाला मान दुखी चा त्रास होणार नाही.
१३. झोप सुध्दा शरीरासाठी आवश्यक आहे. त्यामुळे रोज किमान सात ते आठ तासांची झोप ही आपल्या मानवी शरीरासाठी खुप आवश्यक आहे. झोप न झाल्याने मग ताण -तणाव निर्माण होतो आणि कमी झोपेमुळे मानेवर सुध्दा ताण पडतो. म्हणुन मान दुखण्याच्या त्रासापासुन वाचायचे असेल तर पुरेपुर झोप ही आवश्यक आहेच.
सारांश – मान दुखणे घरगुती उपाय | मान दुखीवर उपाय (man dukhane upay / man dukhi upay)
वरील लेखामध्ये दिलेले मान दुखीवर उपाय आपण पहिले, हे सर्व उपाय तुम्ही घरच्या घरी अगदी सहजतेने करू शकता, हे उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च देखील येत नाही आणि मान दुखीवर आराम देखील मिळतो. मान दुखणे घरगुती उपाय यांखेरीस आपण मान दुखू नये म्हणून काय काय काळजी घ्यायची हे देखील या लेखामध्ये पाहिले. वरील उपाय करून देखील तुम्हाला मान दुखी पासून आराम मिळत नसेल आणि मान जास्त च दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले मान दुखणे घरगुती उपाय कसे वाटले, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)