मक्याचे पदार्थ / मका पासून तयार होणारे पदार्थ / स्वीट कॉर्न मका / makyache padarth in marathi …. >>मक्यापासून तयार होणारे पदार्थ हे अतिशय चविष्ट बनतात आणि ते सर्वप्रिय देखील आहे . बरेच नवीन पदार्थ करताना त्यात मक्याचे पीठ टाकले जाते , त्यामुळे मका हे इंडो-चाईनीज पदार्थातील दुवा समजला जातो , कारण काही पदार्थ हे मक्याचे पीठ न टाकता बनविता येणे अशक्य असते . तर मक्यापासून बनवले जाणारे ते पदार्थ कोण-कोणते हे समजण्यासाठीच आम्ही आजचा लेख सादर करीत आहोत, ज्याद्वारे आपल्याला ते बनविण्यास मदत होईल . मका हे भारतात तिस-या क्रमांकावर पिकवले जाणारे तृणधान्य आहे .
भारतात मक्याचे पीक हे इतर पिकांच्या सोबत ब-याच प्रमाणात घेतले जाते. ब-याच भागात मका हे तृणधान्य जनावरांना चारा आणि इतर डाळींच्या पीठासाठी पर्याय म्हणुन वापरले जाते . मक्याचे कणिस आणि पीक हे खवय्यांसाठी पदार्थ बनविण्यासाठी उपयोगी येते तर , मक्याचे तृण म्हणजे पाने हे जनावरांसाठी उत्तम चारा म्हणुन वापरले जाते. जनावरा साठी चारा विकुन देखील त्यातुन ब-यापैंकी उत्पन्न काढले जाते . अशा प्रकारे मका हे पीक अनेक गोष्टी साठी उपयोगी यत असते .
मका हे जनावरा च्या चार्यासाठीच नव्हे , तर आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी देखील फलदायी आणि चव प्रदान करणारे पीक आहे. मक्याच्या कणसात भरपुर प्रमाणात स्टार्च, कर्बोदके, प्रथिने तंतुमय घटक असतात, त्यामुळे ते शरीरासाठी उत्तम अन्न म्हणटले जाते. मक्याचे पदार्थ खाल्यास जर आपले वजन वाढत नसेन तर आपले वजन वाढण्यास बरीच मदत होते .
तसेच मक्याचे पदार्थ खाण्याचा अजून एक फायदा म्हणजे हे पदार्थ खाल्ले की लवकर भूक देखील लागत नाही ज्या लोकांना मधुमेह [ शुगर ] आहे त्यांना लवकर लवकर भूक मक्याच्या कणसामध्ये जे भरलेले मोत्यासारखे रसदार आणि गोडसर दाणे असतात ते पाहुन तर आपल्या सर्वांची मक्याचे कणिस मस्त भाजुन त्यावर मीठ-लिंबु लावुन खाण्याची आपली इच्छा न झाल्यास नवलच !
आधीच्या काळी मका केवळ जनावरांना चारा म्हणुन खाऊ घालण्यासाठी आणि त्याचे कणिस भाजुन खाण्यासाठी वापरले जात असे , परंतु आपण पाहतो की , सध्याच्या काळात मका आणि मक्याचे पीठ तसेच त्या पासून बनविले जाणारे पदार्थ हे सर्वांच्याच जीवनाचा आवडीचा भाग बनले आहे . याचा वापर करून अनेक पदार्थ तर बनवले जातात त्याचबरोबर ब-याच खाद्यपदार्थात घट्टपणा आणणारा घटक म्हणुन देखील मक्याच्या पिठाचा वापर केला जातो. अनेक चायनीज पदार्थ बनविण्यासाठी त्याला घट्टपणा/दाटपणा आणण्यासाठी सर्रास मक्याच्या पीठाचा उपयोग केला जातो किंबहुणा या पीठा शिवाय ते पदार्थच बनत नाहीत.
अशा या बहुउपयोगी मका या तृणधान्यापासुन नेमके कोणकोणते पदार्थ बनतात ? याची संपूर्ण माहिती आपल्या पर्यंत पोहचविण्यासाठीच आम्ही घेऊन येत आहोत अतिशय महत्वाचा आणि उपयोगी येणारा असा आजचा लेख. या लेखात मक्याच्या पीठापासून तयार होणारे पदार्थ या विषयीची संपूर्ण माहिती आहे . चला तर पाहूया मक्याचे पदार्थ कोणकोणते आहेत आणि ते कसे बनवावे .
Table of Contents
मक्याचे पदार्थ / मका पासून तयार होणारे पदार्थ व त्यांची कृती / makyache padarth in marathi
मक्याचा दाणा हा छोटा जरी असला ,तरी त्याला अनेक पदार्थांतुन अगदी मोठमोठया चवी प्राप्त झालेल्या आहेत , यात तर काही शंका नाहीच . मक्याचे कणीस हा तर मक्याचा सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे , आणि म्हणूनच म्हणटले जाते …..
” थंड-थंड हवा ……मंद मंद पाऊस……..
चटपटीत पदार्थांसोबत …..गरम गरम
मक्याचे कणिस भाजुन खाण्याची भारी हाऊस……………”
ही उक्ती काही खोटी नाही . नुकताच पावसाळा संपला असला तरी मंद म्हणजे थोडा पाऊस पडतोच आहे . त्यातच जरी चमचमीत पदार्थ जरी असले तरी कोवळे भाजलेले कणीस खाण्यासाठी तोंडाला पाणी हे सुटतेच सुटते या ‘भाजलेल्या कणीस‘ सोबतच पाहुया मक्क्यापासुन बनणारे भारतीय व काही विदेशातले हटके आणि नाविन्यपुर्ण असे पदार्थ जे आम्ही आपल्या समोर घेऊन येत आहोत. मक्यापासून तयार होणारे पदार्थ, या लेखात आपण बघणार आहोत.
आपल्याला माहितच आहे की, मका हा मुलांना आवडणार्या बर्याच पदार्थामद्धे वापरला जातो आणि त्याची चव आणि खरपूसपणा द्विगुणित करतो . चला तर मग जाणून घेऊयात मका पासून तयार होणारे पदार्थ कोण कोणते आहेत.
कॉर्न बटाटा फिंगर चिप्स
कॉर्न बटाटा फिंगर चिप्स हे मक्क्याचे पीठ आणि बटाटा वापरून बनवले जातात . कॉर्न बटाटा फिंगर चिप्स हे अतिशय चवदार आणि क्रिस्पी, खुसखुशीत होतात. लहान मुलांची तर ही सर्वात आवडीची डिश आहे . त्याचबरोबर कॉर्न बटाटा फिंगर चिप्स , हे करण्यास देखील अतिशय सोपे आहेत आणि कमी साहित्यात बनवता येतात . त्यासाठी मक्क्याचे पीठ पातळसर भिजवायचे आणि त्यात अलगद वाफाळुन घेतलेल्या बटाटयाचे फिंगर चिप्स बुडवून लाल-तपकिरी रंग येईपर्यंत तळायच्या आणि आता मस्त शेजवान सॉस सोबत खाण्यास आपला हलका आणि कुरकूरीत नाश्ता तयार .
कॉर्न मंच्युरियन
मंच्युरीयन हा चायनिज पदार्थ असून तो आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये सर्वांनाच आवडतो . सध्या इंडो-चाइनीज पदार्थ चे बरेच लोक चाहते झाले आहेत . कॉर्न मंच्युरीयन बनविण्यासाठी मक्याचे तीन वाटी पीठ, एक वाटी पत्ता गोबीचे बारीक काप आणि पाववाटी मक्याचे कोवळे दाणे, हिरवी मिरची पुड, बारीक कापलेले गाजर, चवीनुसार मीठ घ्यावे व घट्ट मळावे त्यांनतर त्याचे गुलाबजाम ऐवढे गोळे बनवुन लालसर ब्राउन रंग येई पर्यंत तळावे आणि नंतर चिलीसॉस, सोयासॉस, टोमॅटो सॉस आणि चिरलेला लसूण हे सर्व तेलात टाकुन त्याची ग्रेवी बनवावी व त्यात तळलेले मक्याचे गोळे टाकावे. कॉर्न मंच्युरीयन बनवुन झाल्यास अर्धा दिवस फ्रिजमध्ये ठेवुन देखील वापरता येतात. अशाप्रकारे मक्क्यापासुन मंच्युरीयन बनवता येते.
कॉर्न पॅटीस
पॅटीस हा चटपटीत पदार्थ देखील जवळपास सर्वांनाच अगदी मनातूनआवडतो . हे कॉर्न पॅटीस बनविण्यासाठी कोवळे मक्क्याचे ताजे दाणे , हिरवी मिरची , कोंथबीर पुदीना, धनेपुड, जिरेपुड थोडे अद्रक या सर्व साहित्याची पेस्ट बनवुन घ्यावी . मक्याचे दाणे देखील ओबड -धोबड मिक्सरमधून काढावे . त्याला छान ही पेस्ट टाकुन मिक्स करावे आणि थोडा चिकटपण येण्यासाठी एक बटाटा स्मॅश करून टाकावा फ्रायपॅनमध्ये थोडे थोडे तेल टाकावे आणि पॅटीसच्या शेपचची चापट वडी त्या तेलावर टाकावी आणि चारही बाजूने खरपुस भाजावी . नंतर पुदिण्याची चटणी बनवावी आणि चिंचेचा कोळ, गुळ थोडे लालतिखट व मिठ घालुन चिंचेची चटणी बनवावी.
एका प्लेटमध्ये मक्याचे भाजलेले पॅटीस घ्यावे व त्यावर एक चमचा ग्रीन चटणी आणि दोन ते तीन चमचे चिंचेची चटणी टाकावी आणि वरून बारीक चिरलेला कांदा व बारीक शेव टाकुन चटपटीत नाश्ता म्हणून खाण्यासाठी द्यावे .हा पदार्थ देखील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातात .
स्वीट कॉर्न मका
स्वीट कॉर्न मका हा सध्या मक्या पेक्षा चवीस जास्त गोड, मधुर आणि रसाळ असतो , तसेच या मक्याचे दाणे हे टपोरे व रसदार असतात. या स्वीट कॉर्न मका पासून देखील बरेच पदार्थ तयार होतात, तसेच हा मका आणि याचे कणीस देखील भाजून खाण्यास अप्रतिम लागते तसेच या पासून काही पदार्थ देखील बनवता येतात ते म्हणजे –
कॉर्न / स्वीट कॉर्न भेळ
आपल्याला बाजारात 2 प्रकारचे कॉर्न मिळतात , एक म्हणजे साधा कॉर्न आणि दूसरा स्वीट कॉर्न . स्वीट कॉर्न म्हणजेच गोड मका , हा जरा जास्त रसदार आणि चवीस गोड असतो . बाजारातून स्विट कॉर्न आणावे आणि त्याचे दाणे काढुन ते उकडुन घ्यावे . नंतर गाळणीत दाणे गाळुन घ्यावे . त्यावर वर पुदीना चटणी, चिंचेची चटणी प्रत्येकी एक एक चमचा टाकावी .
त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकावा, टोमॅटो आणि कोंथबीर टाकावी, असेल तर थोडा चिमुटभर चाट मसाला टाकावा आणि बारीक शेव सजवुन दयावी, झाली न आपली अगदी मसालेदार, चटपटीत, आणि नाविन्यपुर्ण अशी मक्याच्या दाण्याची डिश अगदी पंधरा मिनिटात तयार ! मुलांच्या छोट्या भुकेवर ही अगदी उत्तम आणि परिपूर्ण अशी डिश आहे , मक्यातून मुलांना भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात .
मक्याचे सूप
मक्याचे { स्वीट कॉर्न } चे दाणे काढावे आणि ते सर्व मिक्सर मधून बारीक काढावे. मिक्सर मधून काढलेल्या दाण्यांचा ज्यूस हा ज्यूसर च्या गाळनी च्या साह्याने गाळून घ्यावा . गाळणीतील चोथा फेकून द्यावा आणि खाली राहिलेला ज्यूस एक पॅन मध्ये मंद आंचेवर गॅस वर उकळून घ्यावा . उकळत असताना त्यात थोडे मीठ आणि जिरे पावडर टाकावी तसेच काळे मीठ देखील टाकावे . पाच ते सात मिनिटे उकळू द्यावे ,थोडे थंड झाल्यावर एक वाटीमध्ये टाकावे आणि त्यात थोडे काळेमीठ किंवा चाट मसाला टाकावा . असे हे कॉर्न सूप गरम गरम प्याल्याने भूक ही भागते आणि ते शरीरासाठी हे अतिशय पौष्टिक देखील असते .
अशाप्रकारे झन्नाट मक्क्यापासुन….. भन्नाट पदार्थांचे नाव घेताच… तोंडालाअगदी पाणी सोडणारे पदार्थ ….बनवता येतात आणि खवय्यांना मनमुराद चटपटीत पदार्थ खाऊ घालून ….तृप्त करता येते.
आमचा हा लेख वाचुन नक्कीच सर्व सुगरण महिलांना मक्क्यांच्या पदार्थांना बनवुन बघण्याची इच्छा ही नक्कीच झाली असणार ! आणि खाद्य शौकीन वाचकांना हा लेख वाचून हे सर्व पदार्थ खाण्याची इच्छा नक्कीच झाली असणार ..तर मग विचार कसला करताय लागा तयारीला !
सारांश -मक्याचे पदार्थ / मका पासून तयार होणारे पदार्थ/ स्वीट कॉर्न मका/ makyache padarth in marathi)
आपल्याला जर मक्यापासून पदार्थ बनवायचे असतील किंवा मक्यापसून बनलेले पदार्थ आवडत असतील तर , आमच्या वरील ” मक्यापासून तयार होणारे पदार्थ ” या लेखातील माहिती , साहित्य आणि कृती वापरुन आपण घरच्या घरी उत्कृष्ठ आणि चवीष्ठ असे मक्याचे पदार्थ बनवू शकता , वरील माहिती आणि कृती वाचून , मक्याचे पदार्थ कसे बनवायचे , हे तुम्ही नक्कीच शिकला असणार आणि नक्कीच तुम्हाला या माहितीचा अतिशय फायदा होईल .
आपल्याला वरील लेखामध्ये सांगितलेली मक्याचे पदार्थ घरगुती रेसिपी / मका पासून तयार होणारे पदार्थ /स्वीट कॉर्न मका / makyache padarth in marathi) ही माहिती कशी वाटली, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)