केस दाट होण्यासाठी काय खावे – Top 11 Best Home Remedies

केस दाट होण्यासाठी काय खावे/ केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय/ केस दाट होण्यासाठी उपाय/ केस कशाने वाढतात >>>लांब आणि घनदाट व मजबूत केस ही सर्वांचीच ईच्छा असते. आजकाल तरुण असो वा माध्यम वयस्क मुलांना देखील त्यांचे केस दाट असावे असेच वाटत असते. परंतु म्हणतात न ‘आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येईल’ म्हणजे केस दाट व्हावे यासाठी जे आवश्यक आहे ते तुम्ही जर तुमच्या आहारात खाल्लेच नाही तर तुमच्या शरीरात कुठून येईल आणि म्हणूनच केस दाट होण्यासाठी जे आवश्यक आहे ते तुम्ही खाल्ले पाहिजे.

आता प्रश्न पडला असेल की, नेमके खावे तरी काय, जेणे करून तुमचे केस हे दाट होतील? तर तुमच्या या प्रश्नाचे समाधान करण्यासाठीच आम्ही आजचा हा’ केस दाट करण्यासाठी काय खावे’ हा लेख सादर करीत आहोत. सध्याच्या काळामध्ये आपण पाहतो की, काही वेळेला आपल्याला मोठ-मोठ्या आजार आणि संसर्गाला कधी कधी सामोरे जावे लागते. याचे कारण काहीवेळेस शारीरिक व्याधी, किंवा कमतरता हे देखील असू शकते परंतु काही वेळेस संसर्ग रोग किंवा समस्या उद्भवण्याचे कारण हे, वाढते प्रदूषण असते. पूर्वीच्या काळी हे सर्व आजार होते का?

असा प्रश्न बर्‍याच लोकांना पडत असेल, कारण त्या वेळेस लोक फक्त शेतीतून आलेल अन्न,पौष्टिक जेवण आणि आहार घेत, परंतु आज आपण पाहतोय की, लहानच नाही तर मोठी माणसे देखील पॅकेट फूड खाण्यास ईच्छुक असतात. फास्ट फूड जंकफूड खाणे हे पालेभाज्या खाण्या पेक्षा जास्त पसंद केले जाते. बाहेरचे अन्न आणि असे पदार्थ यामुळे होते असे की, आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो.

जे अन्न आपण खातो त्याचा सरळ परिणाम हा आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर होत असतो. आपल्या शरीराचा एक भाग म्हणजे आपले केस, आपल्याला अत्यंत प्रिय असतात कारण ते आपल्या सौंदर्‍यात भर घालत असतात आणि आपल्या असे पदार्थ खाण्याचा विपरीत परिणाम हा आपल्या केसांच्या वाढीवर आणि केसांच्या पत वर होत असतो. केस पातळ होण्याची ही समस्या एकदा का निर्माण झाली तर नंतर तो आटोक्यात आणण्यामध्ये नाकी-नऊ येत असतात.

ही समस्या निर्माण झाली की, मग लगेचच आपल्याला प्रश्न पडतो की, आता केस दाट होण्यासाठी काय खावे? अशी समस्या आपल्याला असेल तर त्याचे निराकरण करण्यासाठी आमचा हा आजच्या लेख अवश्य वाचवा, ज्यातील माहिती ही, तुमच्या समस्येचे निरसन करण्यास नक्कीच मदत करेल आणि त्याचा तुम्हाला फायदा देखील होईल.

केस दाट होण्यासाठी काय खावे/ केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय/ केस दाट होण्यासाठी उपाय/ केस कशाने वाढतात
केस दाट होण्यासाठी काय खावे

चला तर सुरू करूया एका विशेष माहितीला “केस दाट होण्यासाठी काय खावे” या लेखाला . यातील माहिती तुमचे केस दाट होण्यासाठी तुम्ही आहारात काय खावे ज्यामुळे तुमचे केस लांब , मजबूत आणि दाट होतील याविषयी विस्तृत स्वरुपात मार्गदर्शन करेल.

केस दाट होण्यासाठी काय खावे

केस दाट, मजबूत आणि सदृड होण्यासाठी काही ठराविक गोष्टी खाल्ल्या तर त्याचा अतिशय चांगला परिणाम होतो आणि केस वाढीस पूरक असे घटक शरीराला मिळून केस दाट होण्यास मदत होते तर केस दाट होण्यासाठी खालील पदार्थ आवर्जून खावे कारण आपण जे काही खातो त्याच्याच परिणाम हा आपल्या सौंदर्यावर आणि आरोग्यावर होत असतो;

कडधान्य- केस दाट होण्यासाठी उपाय

केस दाट होण्यासाठी काय खावे/ केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय/ केस दाट होण्यासाठी उपाय/ केस कशाने वाढतात
कडधान्य

कडधान्य ही झिंकचा उत्तम स्त्रोत आहेत. कडधान्य ही आपल्याला सहज उपलब्ध होतात, त्यामुळे याचा आहारात समावेश करणे शक्य आहे. कडधान्य मध्ये फोलेट, लोह, बायोटीन यासारखे अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच कडधान्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात, यामुळे केस दाट होण्यास बरीच मदत होते आणि तुमच्या केसांचा पोत सुधारतो.

पालक- केस दाट होण्यासाठी काय खावे

केस दाट होण्यासाठी काय खावे/ केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय/ केस दाट होण्यासाठी उपाय/ केस कशाने वाढतात
पालक

पालक मध्ये लोह आणि अ तसेच क हे जीवणसत्व असते आणि हे दोन्ही जीवणसत्व आपल्याला अनेक आरोग्यादायी आणि सौंदर्यवर्धक फायदे पुरविते. पालक किंवा हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन केल्याने केस हे लांब दाट होण्यास मदत होते. पालक मधील अ जिवणसत्व यामुळे डोक्याच्या त्वचेतील आर्द्रता ही टिकून राहण्यास मदत होते. वैद्यानीक संशोधनातून पालक मध्ये मुबलक लोह असते त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले लोहाची मात्रा देखील पालक चे सेवन केल्याने वाढते. बर्‍याच वेळेस आपल्या शरीरात लोह म्हणजेच रक्त कमी असेल तर केस गळण्याच्या समस्या निर्माण होतात आणि हळूहळू केसांचा पोत हा ढासळतो. त्यामुळे केस दाट करण्यासाठी पालक खावे त्याने तुमचे केस दाट होण्यास नक्कीच मदत होईल.

सोयाबीन- केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

सोयाबीन मध्ये स्प्रेरमीडाईन असते त्यामुळे केसांच्या वाढीची गती वाढते आणि कमी कलावधीत केस दाट होतात. सोयाबीन मध्ये स्पेरमीडाइन हे असल्याने देखील सोयाबीन खावे याने केसातील कोंडा सुद्धा नाहीसा होतो आणि केस गळती थांबून केस दाट होण्यास मदत होते. सोयाबीन हे केवळ केस दाट करण्यासाठीच नव्हे तर इतर अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरते.

दही- केस दाट होण्यासाठी काय खावे

केस दाट होण्यासाठी काय खावे/ केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय/ केस दाट होण्यासाठी उपाय/ केस कशाने वाढतात
दही

दही हे देखील केस दाट करण्यास मदत करते. दही खाल्यास आपल्याला हेल्थी बॅक्टीरिया, व्हीटॅमिन ए, बी 5, विटामीन c आणि कल्शियम यांसारखे घटक मिळतात त्यामुळे केस निरोगी राहतात आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.

अंडी- केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

अंड्या मध्ये बायोटीन आणि सर्वात जास्त प्रमाणात प्रथिने असतात. आपल्या केसांवरील फॉलीकल्स चा थर हा प्रामुख्याने प्रोटिंस पासूनच तयार झालेला असतो. याच बरोबर अंड्या मध्ये सेलिनियम आणि झिंक यासारखे इतर पोषक घटक असतात अंड्यातील घटकांमुळे केसांचे मुळापासून पोषण होते. केसांना घनदाट, मजबूत करण्यासाठी आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करावे, केस दाट करण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

अमिनो अॅसिड

केस दाट होण्यासाठी काय खावे/ केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय/ केस दाट होण्यासाठी उपाय/ केस कशाने वाढतात
अमिनो अॅसिड युक्त राजमा आणि छोले

अमिनो अॅसिड हे पोषक तत्व खूप महत्वाचे आहे. अमिनो अॅसिड हे आपल्या शरीराला अतिशय महत्वाचे आहे आणि याचा समावेश चणे, राजमा, छोले, आणि सोयाबीन या पदार्थ मध्ये असतो. त्यामुळे तुम्हाला जर केस दाट करायचे असतील तर, हे सर्व पदार्थ खावेत. यातील अमिनो अॅसिड मुळे केस दाट होण्यास मदत होते.

फळे- केस दाट होण्यासाठी काय खावे

फळे यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले व्हीटॅमिन सी, ई आणि आंबट फळातील सॅट्रिक अॅसिड हे केसांना दाट करण्यास मदत करते. आवळा, अननस, लिंबू, मोसंबी. द्राक्ष, संत्री या फळांचे सेवन केल्यास आपले केस नक्कीच लांब आणि दाट होतील. यामुळे तुमचे केस दाट तर होतीलच पण त्याचबरोबर चमकदार देखील होतील.

डाळ- केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

डाळ ही सर्वच पदार्थपेक्षा सर्वात पौष्टिक अशी समजली जाते कारण यात प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. डाळीमध्ये उडीत डाळ, मुगडाळ, चणाडाळ , मसुरडाळ यांसारख्या डाळीचे सेवन केल्याने केसांचे गळणे थांबते आणि केस दाट होण्यास मदत होते तसेच केस वाढण्यास म्हणजेच लांब होण्यास मदत होते.

रताळी

केस दाट होण्यासाठी काय खावे/ केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय/ केस दाट होण्यासाठी उपाय/ केस कशाने वाढतात
रताळे

रताळी या पदार्थ मध्ये अ जिवणसत्व असल्याने विरळ केस देखील डाट होण्यास मदत होते व केस झपाट्याने वाढतात. रताळयामध्ये बीटा- केरोटीन  याचे प्रमाण जास्त असते. यात असलेल्या या घटकामुळे केसांच्या वाढीला आणि दाट होण्याला वेग मिळतो. एक मध्यम आकाराच्या रताळ्यामधून दररोज आवशयक असलेल्या अ जिवणसत्वाच्या मात्रे पेक्षा जवळपास चार पट अधिक प्रमाणात अ जिवणसत्व अधिक मिळते. हे अ जिवणसत्व सीबम च्या वाढीसाठी अधिक आवश्यक असते त्यामुळे डोक्याची त्वचा निरोगी राहते. तसेच कोंडा दूर होतो. केस दाट, मुलायम, लांब, घनदाट, तर होतातच तसेच मजबूत देखील होतात.

बदाम

केस दाट होण्यासाठी काय खावे/ केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय/ केस दाट होण्यासाठी उपाय/ केस कशाने वाढतात
बदाम

बदामचे सेवन प्रत्येक ऋतु मध्ये करायला हवे. आपण केवळ हिवाळ्यातच बदाम खातो. परंतु याचे सेवन नेहमी केले तर केस मजबूत होतात आणि गळण्यापासून वाचतात. बदामाचे तेल किंवा इतर केमिकल प्रॉडक्ट वापरण्याएवजी बदाम खाल्ल्यास त्याचा जास्त फायदा होईल आणि तुमचे केस दाट होतील. त्यामुळे केस दाट होण्यासाठी बदाम खावे.

मासे- केस दाट होण्यासाठी मासे खावे

मॅकरेल आणि हेरिंग आणि सालमान यांसारख्या माशांच्या सेवनाने केसात एवढा अनुकूल परिणाम जाणवेल की, त्याची कल्पना देखील तुम्ही करू शकत नाहीत. मासे यामध्ये ओमेगा-3 सारखा फॅटी अॅसिडचा समावेश असतो. त्यामुळे केस डाट आणि मजबूत तसेच अतिशय चमकदार होण्यास बराच फायदा होतो. त्यामुळे केस दाट करण्यासाठी आपण आठ्वड्यातून दोन वेळेस किंवा किमान एक वेळेस तरी मासा खावा. हा देखील केस दाट करण्याचा उत्तम उपाय समजला जातो.

आपण जे खातो त्याचा परिणाम नश्चितच आपल्या केसांच्या वाढीवर आणि पतवर परिणाम करतो त्यामुळे वरील सर्व पदार्थ केस दाट करण्यासाठी खावेत. त्याचा नक्कीच फायदा होईल.

सारांश – केस दाट होण्यासाठी काय खावे/ केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय/ केस दाट होण्यासाठी उपाय

आपल्याला शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि सौंदर्यतेसाठी आवश्यक असे सर्व काही घटक हे जास्तीत जास्त करून आपल्या आहारातूनच मिळत असतात त्यामुळे आपण जे खातो तेच आपले केस दाट होण्यासाठी मदत करू शकते. म्हणून केस दाट होण्यासाठी काय खावे याविषयीची माहिती आम्ही या लेखात सादर केली आहे. यात सांगितलेले पदार्थ आहारात समाविष्ट केल्याने केस दाट आणि मजबूत नक्कीच होतील.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , “केस दाट होण्यासाठी काय खावे/ केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय / केस दाट होण्यासाठी उपाय “हे कसे वाटले, ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top