दात कीड घरगुती उपाय | दातांची कीड काढण्यासाठी घरगुती उपाय | दातातील कीड काढणे घरगुती उपाय >> स्वच्छ, पांढरेशुभ्र, चमकदार व निरोगी दात सर्वांनाच हवे असतात. स्वच्छ व निरोगी दात आपण जेव्हा हसतो तेंव्हा आपल्या सौंदर्यात अधिकचं भर घालतात. आजकाल आपण पाहत आहोत की अनेक प्रकारचे आजार वाढले आहेत. कोरोनामुळे तर लोकांच जगणं अवघड झालयं.
दातदुखी, दात किडणे यांसारख्या दातांच्या समस्याही आजकाल वाढताना दिसत आहेत. लहान मुलांमध्ये तर दात किडण्याचं प्रमाण अधिकच आहे. त्यामुळे दातांची योग्यप्रकारे काळजी घेण खूप गरजेच बनलं आहे. लहानपणापासूनचं सर्वांना दात चांगले व निरोगी राखण्यासाठी दोनवेळा ब्रश करणं शिकवल जातं. मात्र आपल्यातील आळशीपणामुळे व निष्कळजीपणामुळे दातांना कीड लागते.
दातांमध्ये होणारी कीड हा तोंडामधील जिवांणूमुळे उद्भवणारा आजार आहे. त्यामुळे काहीही खाताना समस्या निर्माण होते. अशावेळी आपण डॉक्टरांकडे जातो आणि त्यावर आपल्याला दात काढणे किंवा कीड काढल्यानंतर तिथे सिमेंट अगर चांदी भरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र घरगुती उपायांनी ही समस्या दूर करता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात दातांची कीड काढण्यासाठीचे घरगुती उपाय.
Table of Contents
दात कीड घरगुती उपाय | दातांची कीड काढण्यासाठी ११ घरगुती उपाय | दातातील कीड काढणे घरगुती उपाय ( home remedies for tooth decay)
खालील दातांची कीड काढण्यासाठी ११ घरगुती उपायांपैकी कोणताही उपाय आपण अगदी सहजतेने घरगुती करू शकता. चला तर मग बघूयात दात कीड घरगुती उपाय.
हळद आणि मीठ – दात कीड उत्तम घरगुती उपाय
हळद आणि मीठ एकत्र करून त्यामध्ये जवसाचे तेल घालून त्याची पेस्ट बनवून घ्या. या मिश्रणाने तयार झालेली पेस्ट घ्या व त्याने दिवसातून साधारण दोन ते तीन वेळा दात घासा. या पेस्ट मुळे दातात तयार झालेली कीड मरण्यास मदत होते. हळद मध्ये अॅंटीऑक्सिडेंट असते जे कीड कमी करण्यास मदत करते.
खायचा चुना व तुरटी पावडर – दातांची कीड काढण्यासाठी घरगुती उपाय
चिमुटभर खायचा चुना, चिमुटभर तुरटी पावडर घेवून त्यामध्ये दोन थेंब पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करून घ्या. कापसाच्या मदतीने तयार झालेली पेस्ट दातांना लावा. पेस्ट लावताना काळजी घ्या की वरील दात खालच्या दाताला लागणार नाही जेणेकरून तोंडातील लाळ निघून जाईल व त्यासोबतच दाताची कीड ही निघून जाईल.दातांची कीड काढण्यासाठी हा घरगुती उपाय उत्तम आहे. साधारण १५ दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्याने लवकरच दातांची कीड कमी करण्यास मदत होते.
लवंग तेल – दात कीड घरगुती उपाय
लवंगाचे तेल कापसाच्या बोळ्यामध्ये भिजवून कीड लागलेल्या दातावर तो कापसाचा बोळा ठेवून द्या. लवंगेमुळे दातामधील जंतुसंसर्ग कमी होतो व यामुळेच दाताला लागलेली कीड नष्ट होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर लवंग हे वासाने आणि चविणे खूप जास्त उग्र असते, त्यामुळे दाढ दुखत असल्यास त्याचा त्रास देखील जास्त होत नाही. त्यामुळे लवंग तेल हे दातातील कीड काढण्यासाठी उत्तम घरगुती उपाय आहे.
तुरटी – दात किडीवर गुणकारी
तुरटी ही दातातील कीड काढण्यासाठी गुणकारी ठरते, कोमट पाण्यामध्ये तुरटी मिसळून रोज त्या पाण्याच्या गुळण्या करा. यामुळे दातांची दुर्गंधी व कीड कमी होते.तुरटी ही जंतूंनाशक असते त्यामुळे ती कीड घालवण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करते.
वडाच्या झाडाचे दूध – दात कीड घालवण्यासाठी उपयोगी
वडाच्या झाडाचे दूध घेवून ते किडलेल्या दातावर लावावे. हे वडाचे दूध कीडलेल्या दाताला लावल्यामुळे दाताचं दुखणं हे बर्यापैकी कमी होत व याच्या सततच्या वापराणे दातांची कीडही कायम स्वरूपी नाहीशी होते.
दालचीनी – दात कीड काढण्यासाठी गुणकारी
दालचीनी चे महत्व आयुर्वेदामध्ये सांगितले आहेच, ही दालचीनी दातांची कीड घालवण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरते, दालचीणीचे तेल कापसाच्या बोळ्यामध्ये भिजवून घ्यावे आणि तो बोळा कीड लागलेल्या दातावर ठेवून द्यावा. यामुळे दाताचे दुखणे देखील थांबेल व किडदेखील नष्ट होण्यास मदत होईल. अशा प्रकारे दालचीनी ही दातांची कीड काढण्यासाठी घरगुती उपाय म्हणून वापरली जाते.
सैंधव मीठ – दातांच्या किडीवर उत्तम उपाय
दातांची कीड काढण्यासाठी घरगुती उपाय म्हणून सैंधव मीठ हे फायदेशीर ठरते, कोमट पाण्यात सैंधव मीठ मिक्स करून त्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे दातांची कीड कमी होण्यास मदत होते.साधारण आठवड्यातून दोन ते तीन वेळा सैंधव मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तुम्हाला दातांची कीड काढण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि कीड नाहीशी होईल.
कडूलिंब – दातांची कीड काढण्यासाठी फायदेशीर
कडूलिंब हे अत्यंत गुणकारी आहेच कडूलिंबाचा पाला व काड्या या मानवी शरीरसाठी गुणकारी असतात. दाताची कीड काढणे घरगुती उपाय म्हणून कडूलिंबाच्या काडीने दात घासल्याने ही दाताची कीड कमी होते. रोज सकाळी कडूलिंबाच्या काडीने दात घासल्याने साधारण एका महिन्यामध्ये तुम्हाला कीड कमी झाल्याचे दिसेल.
तुळस – दात कीड वर गुणकारी घरगुती उपाय
तुळस ही आपल्याला शारीरिक व्यधिंपासून दूर ठेवण्यास मदत करते, त्याचप्रमाणे तुळस ही दातांची कीड काढण्यास मदत करते. तुळशीची पाने रोज चावुन खाल्ल्यानेही दातची कीड कमी होते. तुळशीच्या पानांमुळे तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते आणि कीड कमी करण्यास देखील मदत होते. त्यामुळे जर तुमचे दात किडले असल्यास दिवसातून किमान दोन वेळा तरी तुळशीची पाने चांगली चावून खाल्याने देखील कीड लवकर कमी होण्यास मदत होते.
कापुर – दात किडीवर जंतुनाशक म्हणून काम करते
कापुर हा जंतु नाशक असल्यामुळे दातांची कीड काढण्यासाठी कापुर हा अत्यंत गुणकारी ठरतो, त्यासाठी याचा उपाय म्हणून वपार करण्यासाठी, कापूर आणि तुळशीच्या पानाचा बारीक चुरा करून घ्यावा हा चुरा दाताखाली पकडावा, पकडल्यामुळे दातदुखीपासून सुटका होते. साधारण आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा हा उपाय केल्याने दातांची कीड कमी होण्यास निच्छित मदत होते.
मोहरीचे तेल – दात कीड उत्तम घरगुती उपाय
मोहरीचे तेल देखील दातांची कीड काढण्यासाठी फायदेशीर ठरते. मोहरीचे तेल साधरण कोमट गरम करून घ्या आणि त्या तेलामध्ये तुरटी पावडर मिक्स करा व त्याची पेस्ट बनवा. कापसाच्या मदतीने ती पेस्ट दातावर लावा. यामुळे दातातील कीड मरते आणि किडी मुळे होणार्या वेदना देखील कमी होतात.
वरील ११ उपाय करून आपण दातांना लागलेली कीड नाहीशी करू शकतो.
दात किडू नयेत म्हणून घ्यावयाची सावधगिरी / काळजी
आता आपण पाहूयात दात कीडूच नयेत म्हणुन काय केले पाहिजे. दातांना कीड लागणे टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी पुढीलप्रमाणे :-
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाणं टाळावं. दातावर किंवा दातामध्ये अडकून राहतील असे गोड पदार्थ म्हणजेच चॉकलेट, चिखट मिठाई, यासारखे पदार्थ कमी प्रमाणात खाणे. हे गोड पदार्थ दातात अडकल्याने दात किडतात, त्यामुळे असे चिकट आणि गोड पदार्थ खाल्ल्यानंतर नेहमी चांगल्या चुळा भराव्यात आणि शक्यतो रात्री झोपताना असे पदार्थ खने टाळावे.
- सतत काही न काही खातं राहाणं किंवा वारंवार चरत राहाणं टाळावं.कारण सतत काहींकाही खाल्याने दातात ते अडकून तसेच राहतात आणि मग त्यामुळे कीड होऊन तोंडाची दुर्गंधी देखील येते.
- कच्च्या भाज्या, फळे यांसारखे तंतुमय पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करावेत.
- गोड पदार्थ खाल्ल्यानंतर दात ब्रशने घासून दातांवरील चिकट पदार्थ चुळा भरून लगेच दातावरून काढून टाकावेत. असे केल्यामुळे दात किडत नाहीत.
- फास्ट फूड, आइस्र्किम, स्नॅक्स यासारखे बाजारातील पदार्थ खाण्याचं प्रमाण कमी करावं, ज्यामुळे तुमचे दात सुरक्षित आणि ताकदवान राहतील.
सारांश – दात कीड घरगुती उपाय / दातांची कीड काढण्यासाठी घरगुती उपाय
दात किडल्यामुळे दात दुखी च्या होणार्या प्रचंड वेदांनापासून वाचण्यासाठी दातांची कीड काढण्यासाठी वरील ११ घरगुती उपाय तुम्ही करू शकता. तसेच दात किडू नयेत म्हणून सावधगिरी काय घ्यायची आहे ही माहिती देखील या लेखामध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. सर्व उपाय करून देखील जर तुमची दात कीड कमी होत नसेन आणि वेदना होतच असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले दात कीड घरगुती उपाय / दातांची कीड काढण्यासाठी घरगुती उपाय कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात