हिरडी सुजणे घरगुती उपाय / हिरडी सुजणे उपाय / हिरडी सुजणे / hiradi sujane upay in marathi >>>> हिरडयांना होणा-या रोगांपैकी एक रोग, म्हणजे जिंजिव्हिटिस. जिंजिव्हिटिस हा तसा कमी तीव्रतेचा आजार सर्वसाधारणतः बर्याच जणांना झालेला आढळतो. जिंजिव्हिटिस हयामुळे आपल्या दातांच्या बाजूला असणार्या हिरडया सुजतात. जिंजिव्हिटियचे स्वरूप् तसे नरम असल्याने काही वेळा आपणांस तो जाणवत देखील नाही. मात्र या त्रासकडे किंवा आजाराकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्यास कालांतराने हयामधुन फार गंभीर स्वरूपाचे हिरडयांचे रोग हे उद्भवू शकतात. आपल्या हिरडया जर सुजल्या असतील किंवा दात घासताना आपल्या हिरडयांमधुन रक्त येत असेल तर आपणांस जिंजिव्हिटिस हा हिरड्यांचा आजर झाला असण्याची शक्यता आहे. तोंडाचे आरोग्य नीट नसणे आणि हिरड्यात इन्फेकशन असणे हे जिंजिव्हिटीसचे मुख्य कारण असते.
दररोज सकाळी आणि रात्री झोपताना ब्रश करणे व फलॉसिंग दातांच्या फटींमधील अनेकदा दोरा वापरून काढणे हयामुळे जिंजिव्हिटीस हा आटोक्यात राहू शकतो. तोंडाची स्वच्छता न राखल्यामुळे तसेच आपल्या शरीराला क जीवनसत्त्व पालेभाज्या, लिंबु, आवळा, संत्री कमी पडल्यामुळे हिरडयावर सूज असेल तर हिरडया सळसळतात, शिवशिवतात, तर कधी ठणकतात. मात्र हिरडया ठणकणे म्हणजे पु झालेला असतो मिठीची सवय असल्यासही हिरडयांना त्रास होऊ शकतो. गोड पदार्थ तसेच जास्त शिजवलेले पदार्थ व पिठूळ पदार्थ इत्यादींनी दातांच्या फटीमध्ये अन्नकण राहतात आणि ते शर्करेचे आंबट आम्ल यात रुपांतर करतात आणि आपल्या दातांच्या कठीण कवचात छिद्र तयार करतात, अशाप्रकारे आपल्याला दात व हिरडयांचे रोग, दोन वेळा ब्रश न केल्याने लवकर होतात.
आपल्या हिरड्यात किंवा तोंडात कुठला आजार झाला असल्यास आपल्या तोंडातला पूर्ण भाग लगेचच ठणकू लागतो. हिरडी मध्ये किंवा दातामध्ये जंतु किंवा इन्फेकशन वाढले असल्यास, तोंडात दुर्गंधी येत असल्यास हिरडयांतून पू व रक्त येत असल्यास आपण दातांच्या डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. आपल्या दातांच्या किंवा हिरड्यांच्या दुखण्यावर वेळीच उपचार करावे, त्यामुळे आजार आणि त्रास वाढणार नाही. त्याचसाठी आपल्याला ह्या त्रासातून लवकर आराम मिळण्यासाठीच आम्ही ‘हिरडी सुजणे घरगुती उपाय’ हा उपयुक्त लेख घेऊन येत आहोत. आमच्या आजच्या या लेखातील उपाय वापरुन आपण बर्याच प्रमाणात आराम मिळवि शकता. दातांची योग्य निगा ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे.
Table of Contents
हिरडी सुजणे घरगुती उपाय /हिरडी सुजणे उपाय / हिरडी सुजणे /hiradi sujane upay in marathi:-
हिरडी सुजणे, या समस्येवर आपण खालील काही घरगुती उपाय करू शकता आणि आलेली सूज कमी करू शकता –
हिंग आणि लिंबाचा रस
एक चर्तुथांश लिंबाचा रस एका वाटीत काढुन घ्या. यानंतर लिंबाच्या रसात हिंग मिसळून याचे चांगले मिश्रण तयार करा. आता या मिश्रण कापसाच्या तुकड्याला लावा. भिजवलेल्या कापसाचा तुकडा दुखत असलेल्या ठिकाणी दात आणि हिरडयांवर लावा या दरम्यान तोंडातुन निघालेली लाळ बाहेर काढत राहा. काही वेळातच आपल्याला या दुखण्यापासून आरम मिळेल.
सैंधव मीठ आणि हिंग –
पोटांच्या अनेक समस्यांसोबत हिंगाचे इतरही खूप उपयोग आहेत. पोटाच्या त्रासा सोबत हिरडी सुजणे यावर देखील हिंग हा प्रभावी उपाय आहे .यासाठी एक ग्लास पाण्यात दोन ते तीन चिमुटभर हिंग आणि सैंधव मीठ टाकून हे मिश्रण गरम करावं. जेव्हा हे पाणी कोमट होईल तेव्हा त्या पाण्यामुळे सूज कमी होते आणि हिंग आणि सैंधव मीठ दुखण्यापासून आराम देण्यात मदत करतात.
लवंग तेल आणि लवंग –
दात किंवा हिरडयांमध्ये होणा-या दुखण्यापासून सुटका मिळवण्यासाठी एक लवंग खूप चांगला पर्याय आहे. हिरडयांमध्ये दुखणं सुरू झाल की लगेच लवंग त्यावर ठेवली तर आराम मिळतो. लवंगामध्ये अॅंटी बॅक्टेरीअल आणि अॅंटी इन्फलोमेटी गुण असतात. जे तोंडातील किडयांना मारण्याचं काम करतात. याशिवाय आपण दातांमध्ये, लंवग दाबून ठेवावी.
त्यामुळे दुखणं कमी होतं. तर लवंगाच्या तेलात पण आपण वापर करू शकतो. यासाठी आपण लंवगाच्या तेलामध्ये कापसाच्या तुकडा बुडवून आपण दातांवर लावावा. यामुळे आपल्याला काही वेळातच आराम मिळतो.
कांदा आणि कांद्याचा रस –
भाजी किंवा सलादच्या रूपात आपण नेहमी कांदा खातो. मात्र आपल्याला माहितीय का हिरडया किंवा दातांच्या दुखण्यावर पण कांदा उपयुक्त ठरतो यासाठी कांदयाचे लहान तुकडे चिरून ते आपल्या दातांवर ठेवावेत. जिथे दुखतआहे तिथे कांद्याचा बारीक काप ठेवावा किंवा जर आपण कांदाचे तुकडे ठेवू शकत नसाल तर त्याचा रस काढून कापसाच्या बोळयात लावू शकता. यासाठी कापसाचा तुकडा कांदयाच्या रसात बुडवून आपण दुखणाच्या ठिकाणी ठेवावा. यामुळे आपल्याला दातांच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
लसूण पाकळी –
दात आणि हिरडयांमध्ये होणा-या दुखण्यातुन सुटका करून घ्यायची असेल तर लसूण पण एक चांगला पर्याय आहे. यासाठी आपण लसणाची पाकळी सोलून घ्यावी आणि दुखत असलेल्या ठिकाणी ठेवावीत. यासोबतच हळूहळू लसणाची पाकळी चावत जावी. दातांमध्ये लसणाचा रस गेल्याने दुखणं कमी होतं. हिरडी सुजली असेल तर त्यावरची सूज देखील उतरते.
कोमट मीठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या –
कोमट पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात हा उपाय सकाळ आणि संध्याकाळ दोनदा करावा. याशिवाय तुम्ही जेवल्यानंतर काही वेळाने देखील हा उपाय करू शकता. हा हिरडयांना सुज आल्यावर करण्यात येणारा हमखास उपाय आहे. मीठाच्या पाण्याने तोंडाचा पीएच स्तर संतुलित होता आणि हिरडया सुजणे समस्येपासून आराम मिळतो. मिठातल्या अॅंटी इफलमेटरी गुणांमुळे सूज कमी होण्यास मदत होते.
अद्रक पेस्ट आणि मीठ –
आलं किसुन घ्या आणि त्यात मीठ घालून पेस्ट करा ही पेस्ट सूज आलेल्या हिरडयंावर लावा आणि दहा ते बारा मिनिटं तसच ठेवा. मग चुळ भरा हा उपाय दिवसातुन दोन ते तीन वेळा करता येईल आल्यातील अॅंटी इंफलमेटरी आणि अॅंटी ऑक्सींडट्स गुणांमुळे हिरडयांची सूज कमी होण्यास मदत होते.
हळद आणि बेकिंग सोडा –
हळद आणि बेकींग सोडा मिक्स करून त्याने हिरडयांना मालीश करा मग चुळ भरा बेकींग सोडयाने ब्रश केल्याने देखील हिरडयांची सुज कमी होते. हा पाय तुम्ही सकाळ आणि संध्याकाळी एकदा असा करू शकता. हिरडयांच्या समस्येपासून आराम मिळावा म्हणून अनेकजण बेकींग सोडयाचा घरगुती उपचार म्हणून वापर करतात. यामधील अॅंटी बॅक्टेरीअल आणि अॅंटीसेप्टीक गुणांमुळे हिरडयांना झालेलं इंफेक्शन टाळता येत. तसंच हिरडयांची सुजही कमी होते.
मेहंदीचे पाने –
मेहंदीची पानं 15 मिनिटं पाण्यात उकळून घ्या हिरडयांची सुज कमी होण्यासाठी या पाण्याने गुळण्या करा हा उपाय दिवसातुन दोनदा करावा॰ मेंदीच्या पानातील अॅंटीबायोटीक गुणांमुळे तोंडातील हानीकाराक बॅक्टेरीया दुर होण्यास मदत होते तसेच मेहंदी ही मूलतःच थंड असल्याने हिरडी ठणकत असेल तर ते देखील थांबते त्यामुळे हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.
बाभळी ची साल –
बाभळीच्या सालीचा तुकडा पाण्यात किमान पाच ते सात मिनिटे उकळवा. बाभळीच्या साल मध्ये हिरड्यांच्या अनेक समस्या दूर करण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे आपल्यास त्रास लवकर कमी होण्याचा बराच फायदा होतो. बाभळीच्या सालीचे तुकडे आपण पाण्यात उकळून घ्यावे आणि आता हे पाणी थोडे कोमट असतानाच या पाण्याने गुळण्या म्हणजेच तुम्ही माउथवॉश करावा. बाभळीच्या साली उकळलेल्या या पाण्याने तुम्ही दिवसातुन तीन ते चार वेळ चुळ भरा. हा उपाय केल्याने आपल्याला हिरड्यांच्या सर्व समस्यां पासून आराम मिळेन.
वरील सर्व उपाय तुम्ही हिरडी सुजणे या त्रास साठी किंवा हिरडीच्या अजून काही समस्या असतील तर करू शकता आणि तरी देखील आपला त्रास कमी नाही झाला तर आपण वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.
सारांश – हिरडी सुजणे घरगुती उपाय / हिरडी सुजणे उपाय /हिरडी सुजणे /hiradi sujane upay in marathi –
आपल्याला जर हिरडी सुजणे, हिरडीतून रक्त येणे हा त्रास होत असेल तर आपण आमच्या आजच्या आमच्या “हिरडी सुजणे घरगुती उपाय / हिरडी सुजणे उपाय ” या लेखातील आम्ही सांगितलेले घरगुती उपाय वापरुन आपला त्रास कमी करू शकता. या लेखातील माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले “हिरडी सुजणे घरगुती उपाय / हिरडी सुजणे उपाय / हिरडी सुजणे /hiradi sujane upay in marathi” कसे वाटले , हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीसीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)