उंची कशी वाढवायची घरगुती उपाय/ उंची वाढवण्यासाठी उपाय /हाईट वाढवण्याचे उपाय/height वाढवण्यासाठी उपाय/उंची वाढवण्यासाठी व्यायाम >>> प्रत्येकाला उंची ही जास्त असावी असे वाटते; परंतु काही कारणाने एखाद्याची उंची ही जास्त प्रमाणात वाढत नाही किंबहुना त्यांची उंची वाढण्याचा वेग आणि मर्यादा ही इतर लोकांच्या तुलनेत कमी असते या कारणाने त्यांची उंची कमी दिसते. इतर मित्र- मैत्रीण पेक्षा माझी उंची कमी आहे, असे वाटत असल्याने त्यांचे मन उदास होते आणि त्यांना नाराज वाटते.
जर एखाद्या मुलाची उंची कमी असेल आणि त्याला भारतीय सैन्य दलात किंवा पोलिस खात्यात जाण्याची इच्छा तर त्याची ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही, कारण उंची कमी असल्याकारणाने त्या उमेदवाराची या परीक्षेमध्ये निवड होऊ शकत नाही. हे सर्व टाळण्यासाठी आपण योग्य वयातच काही तरी प्रयत्न नक्कीच करू शकतो आणि आपली उंची वाढवू शकतो, कारण यात अशक्य असे काहीच नाही.
आपल्यातील जिद्द आणि चिकाटीने , आत्मविश्वासाने आपण नियमित आम्ही सांगणार आहोत ते उपाय करून आपली उंची वाढवण्यात नक्कीच यश प्राप्त करू शकता. चला तर मग, या लेखात आपण जाणून घेणार आहोत, उंची कशी वाढवायची, यावर करण्यात येणारे उपाय कोणते आहेत. या लेखात आम्ही जे उपाय सांगत आहोत, हे केल्याने तुमची उंची नक्कीच वाढेल, हे आम्ही खात्रीशीर सांगतो. चला तर मग, जाणून घेऊया माहिती, उंची कशी वाढवायची घरगुती उपायांविषयी –
Table of Contents
उंची वाढवण्यासाठी उपाय / उंची कशी वाढवायची घरगुती उपाय
आपल्याला जर उंची वाढवायची असेल तर आपण आम्ही खाली सांगत असलेले उपाय करावेत, याने आपली उंची नक्कीच वाढेल.
सूर्यप्रकाश –हाईट वाढवण्याचे उपाय
सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यप्रकाश घेतल्याने आपल्याला ‘ड’ हे जिवनसत्व मिळते. आपल्या शरीराच्या सर्वांगीण विकाससाठी हे जिवनसत्व म्हणजे उत्तम नैसर्गिक स्त्रोत आहे. कमाल उंचीच्या एकूण वाढीसाठी आवश्यक असलेले महत्वाचे पोषक घटक या सूर्यप्रकाशा द्वारे तुम्हाला मिळू शकतात.
जेंव्हा तुमच्या शरीराला पुरेसे ड जिवनसत्व मिळत नाही तेंव्हा तुमची हाडे ही कमकुवत होऊ शकतात यसेच कमी ऊंची ही असू शकते. त्यामुळे दररोज 10 ते 15 मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे.
जिवणसत्व ड वाढवण्यासाठी सूर्यप्रकाशासोबत दूध, अंडी, मासे, चीज यांचे देखील सेवन करावे.यात देखील बर्याच प्रमाणात ड जिवनसत्व उपलब्ध असते.
दूध प्या
दूध यामध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक गुण असतात. ते आपल्या उंची झपाट्याने वाढण्यास फायदेशीर ठरतात त्याच बरोबर आपली हाडे देखील मजबूत करतात. त्यासाठी रोज निदान एक ग्लास दूध नक्की प्यावे.
परंतु; आजच्या काळात पूर्वी सारखे दूध सहसा मिळत नाही. शहरी भागात काही ठिकाणी कॉमिक्लिस चा वापर करून दूध बनवून विकले जाते. त्यामुळे त्यात कल्शियम आहे की नाही याची शहानिशा करून दूध विकत घ्यावे लागते. मुलांच्या परिपूर्ण वाढी साठी दूध हे अतिशय उपयुक्त असते त्यामुळेच तर दूधला पूर्णन्न असे म्हंटले जाते, त्यामुळे लहान मुलांना तर आवर्जून दुध पिण्यास द्यावे.
फळे आणि भाजीपाला
प्रोटीनयुक्त आणि कल्शियमयुक्त आहार आपल्या उंची साठी खूप आवश्यक आहे. आणि असा आहार आपल्याला फक्त फळे आणि सर्व प्रकारचा भाजीपाला यातूनच मिळू शकतो. त्यामुळे आपल्याला जर उंची वाढवायची असेल तर आपण फळे आणि सर्व प्रकारच्या भाज्या खाव्यात. फळे आणि पालेभाज्या ह्या आपल्याला आवशयक ते सर्व घटक पुरविण्यास मदत करतात.
केळी
केळी यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात काल्शियम, मग्निज, पोटॅशियम हे घटक असते, आणि हे सर्व घटक हाडांना मजबूत करतात. त्यामुळे केळी हे फळ वजन वाढवण्यासाठी खावी त्याचा चांगलाच फायदा होतो.
योग्य आहार
सकस आणि योग्य परिपूर्ण आहार हा देखील आपली उंची वाढण्यासाठी अतिशय महत्वाचा असतो. नेहमी फास्ट फूड, चिप्स, जंकफूड, स्नॅक्स, कोलड्रिंक्स यांसारखे unhealthy food आपण का खातो. याचा आपल्या शरीराच्या योग्य वाढीवर विपरीत परिणाम होतो आणि योग्य प्रमाणात वाढ होत नाही त्यामुळे योग्य आहार घ्यावा. आपण जर असे unhealthy food खात असाल तर ते टाळावे.
पाणी भरपूर पिणे
पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. दररोज दिवसातून 7 ते 8 ग्लास पाणी पिले पाहिजे. पाणी आपल्या शरीरातील घाण बाहेर टाकते त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि आपली उंची वाढण्यास मदत होते.
पोहणे – उंची वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय
उंची वाढवण्यासाठी पोहणे हा एक उत्तम पर्याय आहे. पोहल्याने आपले पूर्ण शरीर ताणले जाते आणि आपल्याला भूक देखील चांगली लागते व त्याचा उंची वाढण्यास बराच फायदा होतो. कारण पोहल्याने संपूर्ण शरीर हे ताणले जाते आणि ताणले गेल्याने स्नायू देखील ताणले जाऊन वाढण्यास मदत होते, अशा प्रकारे पोहणे हा देखील ऊंची वाढवण्याचा एक उत्तम उपाय आहे.
योग्य प्रमाणात झोप घेणे
झोप ही देखील उंची वाढण्यासाठी महत्वपूर्ण आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. झोपेच्या स्थितीमध्ये शरीराची संपूर्ण भागाची आणि उंचीची वाढ जलद गतीने होते.
बसण्याची योग्य स्थिती
बर्याच वेळेस आपल्या अयोग्य आणि चुकीच्या चालण्याच्या आणि बसण्याच्या सवयी मुळे आपली उंची वाढत नाही. वाकून चालणे, कुबड काढणे, बाक काढणे यामुळे त्याचा आपल्या उंची वाढण्यावर विपरीत परिणाम होतो आणि उंची वाढत नाही. त्यामुळे योग्य स्थित मध्ये बसावे, ताठ चालावे, मान उंच ठेवावी, चालताना पाठीचा कणा ताठ आणि मान उंचा सरळ आणि थाट ठेवावी.
व्यायाम करणे – उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय
नियमित व्यायाम केल्याने देखील उंची वाढण्यास मदत होते. त्याच बरोबर मैदानी खेळ खेळल्याने देखील शरीर निरोगी राहते तसेच उंची वाढण्यास मदत होते. व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील स्नायू ताणले जाऊन उंची वाढते. त्यामुळे व्यायाम करणे महत्वाचे आहेच आणि हा देखील उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून भरपूर प्रमाणात केला जातो आणि त्याचा उंची वाढण्यास 100% फायदा देखील होतो.
तर आता पुढील लेखात आपण पाहूया, उंची वाढवण्यासाठी नेमके कोणते व्यायाम केले पाहिजे किंवा कोणता व्यायाम आपण केला पाहिजे.
उंची वाढवण्यासाठी व्यायाम
उंची वाढवण्यासाठी आपण खालील व्यायाम करावे त्याने आपली उंची वाढण्यास नक्कीच अडत होईल, आणि आपली उंची बर्यापैकी वाढेल , त्यासाठी आम्ही खाली सांगणार आहोत ते व्यायाम दररोज करावे-
जोग्गिंग करणे : उंची वाढवण्याचा योग्य व्यायाम
जोग्गिंग केल्याने आपले हात पाय आणि पूर्ण बॉडीचा चांगलाच व्यायाम होतो आणि आपल्या पूर्ण शरीराला वाढण्यास आणि उंची वाढण्यास मदत होते, त्यामुळे तुम्हाला उंची वाढवायची असेल तर रोज सकाळच्या कोवळ्या उन्हात नियमित जोग्गिंग करावी त्यामुळे आपल्याला उन्हातून मिळणार्या ड जिवणसत्वाचा देखील फायदा होईल आणि उंची वाढेल.
दोरीवरच्या उड्या मारणे
उंची वाढवण्यासाठी व्यायाम यामध्ये सर्वात जास्त फायदेशीर ठरते तर ते म्हणजे दोरीवरच्या उड्या मारणे, याने तुमची संपूर्ण बॉडी स्ट्रेच होते आणि पाय, मान, हात, खांदे यासगळ्यांचा चांगलाच व्यायाम होतो आणि तुमची उंची शंभर टक्के वाढणार.
बॉडी स्ट्रेचिंग करणे
आपल्या संपूर्ण शरीराला स्ट्रेच म्हणजे ताणून धरावे. हात समोरासमोर ठेऊन हातांची बोटे एकमेकात अडकवावी आणि आकाशाकडे हात नेत ताणून धरावे तसेच पाय देखील बोटापासुन ताणून धरावे आणि पायाच्या घोट्यापासुन पूर्ण शरीर उचलावे. अशाप्रकारे रोज सकाळ आणि संध्याकाळ बॉडी स्ट्रेच केल्याने तुमची उंची चांगलीच आणि फास्ट वाढेल.
सायकलिंग करणे
रोज सायकलिंग केल्याने देखील उंची वाढण्यास मदत होते, त्यामुळे आपले आरोग्य देखील उत्तम राहते आणि हृदयाचे आणि फुफ्फुसाचे आरोग्य देखील चांगले राहते आणि आपली उंची वाढते. त्यामुळे आपण रोज संध्याकाळी जवळपास 20 मिनिटे तरी सायकल चालवावी. सायकल चालवल्याने पायाचा व्यायाम होऊन पायाची लांबी वाढण्यास आणि ऊंची वाढण्यास मदत करते
सूर्यनमस्कार करणे
सूर्यनमस्कार हे सगळ्याच गोष्टीवर उपयोगी येणारा व्यायाम आहे. त्यामुळे रोज नियमित सातत्याने सूर्यनमस्कार करावा. सूर्यनमस्कार केल्याने आपल्या शरीराला अगदी ताजेतवाने वाटते आणि आपल्या शरीरात भरपूर प्रमाणा ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे उंची वाढण्यास बर्याच प्रमाणात मदत होते. .
पूल-अप्स करणे : उंची वाढवण्याचे उपाय
पूल- अप्स केल्याने देखील उंची वाढण्यास मदत होते. पुल्स-आणि अप्स केल्याने शरीर भरपूर प्रमाणात ताणले जाते. त्यामुळे उंची वाढवण्यासाठी पूल-अप्स करणे हा घरगुती उपाय आणि व्यायाम बराच फायदेशीर ठरतो.
उंचीवर लटकणे : उंची वाढवण्याचा उपाय
उंचीवर लटकणे हा उंची वाढवण्यावर अतिशय रामबाण असा उपाय आहे. आपल्या उंचीपासून एक ते दीड फूट उंच असलेल्या जागेवर लटकणे हे उंची वाढण्यास उत्तम प्रकारे मदत करते. त्यामुळे अशा उंचीवरच्या जागी काही तरी लावून किमान दिवस भरातून पाच मिनिट तरी नक्की लटकावे. उंची वाढवण्यासाठी हा घरगुती उपाय केल्याने आपली उंची हमखास वाढतेच यात काही शंका नाही.
बॅट-मिंटोण खेळणे- उंची वाढवण्यासाठी उपयुक्त व्यायाम
वरील सर्व व्यायाम नियमित केल्याने आपली उंची नक्कीच वाढेल. बॅट मिंटोण खेळताना पूर्ण शरीराचा व्यायाम होऊन उंची वाढण्यास मदत होईल. त्यामुळे दररोज संध्याकाळी मोकळ्या जागेत बॅट- मिंटोण खेळावे.
सारांश – उंची कशी वाढवायची घरगुती उपाय/ उंची वाढवण्यासाठी उपाय/ हाईट वाढवण्याचे उपाय
आपली जर उंची / हाईट इतरांपेक्षा थोडी कमी किंवा छोटी असेल आणि तुम्हाला जर तुमची उंची वाढवायची असेल तर तुम्ही आम्ही वरील लेखात सांगितलेले उपाय नक्की करा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमची उंची लवकरात लवकर वाढण्यास मदत देखील होईल.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , उंची कशी वाढवायची घरगुती उपाय/ उंची वाढवण्यासाठी उपाय /उंची वाढवण्यासाठी व्यायाम / (हाईट वाढवण्याचे उपाय ) हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)
Good post. I learn something new and challenging on sites I stumbleupon every day. It will always be exciting to read through content from other writers and use a little something from other sites.