गरम मसाला रेसिपी / गरम मसाला सामग्री / Garam Masala Recipe In Marathi >> गरम मसाला हा प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतोच, कारण गरम मसाला हा भाजीमध्ये आणि वरणामध्ये टाकल्यास त्या भाजीची आणि वरणाची चव खुप वाढते आणि जेवणात अजून रंजत येते. बाजारात अनेक प्रकारचे मसाले मिळतात परंतु; ते मसाले वापरल्यास बर्याच वेळी पोट जड पडणे, मसाल्याचेच ढेकर येणे किंवा छातीत दाह होणे असे प्रकार होऊ शकतात. बाजारात मिळणार्या गरम मसाल्याने अशा समस्या तर उद्भवू शकतातच शिवाय हा मसाला जास्त दिवस देखील टिकण्याची शक्यता कमी असते , म्हणून गरम मसाला आपण आपल्या घरात बनविणे योग्य असे मला वाटते.
गरम मसाला घालून केलेल्या भाजीची आणि वरणाची चव काही औरच लागते, त्यामुळे आपण सर्वांनीच आमच्या लेखातील माहिती वाचून गरम मसाला घरी बनवावा, आणि त्या साठीच आम्ही आजचा लेख घेऊन आलो आहोत. परफेक्ट आणि सुवासिक गरम मसाला बनविण्यासाठी त्यामध्ये जे आख्ये जिन्नस, मसाल्याचे पदार्थ टाकले जातात त्याचे प्रमाण हे योग्य असणे गरजेचे आहे.
आपण पाहतो, की जगाच्या प्रत्येक कोपर्यात गरम मसाला वापरला जातो आणि त्या त्या प्रांतच्या लोकांच्या आवडी प्रमाणे मसाल्यात वापरण्यात येणारे पदार्थ आणि मसाला बनविण्याची कृती हे सर्व वेगवेगळे असते. हा मसाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळया कृती प्रमाणे आणि पदार्थांनी बनवला जातो. प्रत्येक राज्याच्या जिल्ह्यात देखील गरम मसाला बनविण्याची कृती आणि घटक हे वेगवेगळे असतात जसे की, महाराष्ट्रियन गरम मसाला, नाशिक चा मसाला, कोल्हापुरी मसाला, साताराचा मसाला. आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या पद्धतीने गरम मसाला बनविला जातो. पंजाबमध्ये सुध्दा हा गरम मसाला बनविण्याची पध्दत वेगळी आहे. तसेच युपी बिहार, साऊथ अशा ठिकाणी सुध्दा हा मसाला वेगवेगळया प्रकारे बनवला जातो. गरम मसाल्यामध्ये जे मुख्य मसाले टाकले जातात ते साधारण सर्वत्र सारखेच असतात आणि आपआपल्या घरी बनवलेल्या गरम मसाल्याची चव अतिशय अप्रतिम आणि उत्तम असते.
आपण जो गरम मसाला बनवतो तो हवाबंद डब्यात स्वच्छ डबा धुवून पुसलेला असावा. अशा डब्यात हा गरम मसाला आपण वर्षानुवर्षे ठेवु शकतो. या मसाल्याचा डब्बा उघडला तरी याची सुवासिकता आणि घमघमाट सर्व घरात पसरते आणि हा मसाला जसाच्यातसा राहतो व हवा बंद डब्बा असल्याने त्याचा वास देखील तसाच राहतो. फक्त त्याची साठवण योग्यप्रकारे करता आली पाहिजे आणि हया मसाल्याला पाण्याचा एक थेंब सुध्दा नाही लागला पाहिजे मग हा मसाला कित्येक महीने एकदम छान राहू शकतो आणि त्या मसाल्यापासुन बनवलेल्या भाज्या, पुलाव, वरण आपण अतिशय उत्कृष्ठ प्रकारे चवदार बनवू शकतो. गरम मसाला अगदी व्यवस्थित बनवला गेला तर घरच्या घरी आपण हॉटेल सारख्या चवीच्या भाज्या बनवू शकतो. चला तर मग गरम मसाला रेसिपी (garam masala recipe).
Table of Contents
गरम मसाला रेसिपी(garam masala recipe in marathi)
आज आम्ही एका अतिशय महत्वाच्या आणि दैनंदिन जीवनात उपयोगी येणार्या रेसिपी सोबत आलो आहोत ती रेसिपी म्हणजे , गरम मसाला रेसिपी. घरच्या घरी बनवता येणारी जी रेसिपी आम्ही घेऊन येत आहोत ,ती अतिशय चविष्ट आणि सोप्या पद्धतीची आहे. चला तर मग , सुरूवातीला जाणून घेऊया गरम मसाला सामग्री –
गरम मसाला सामग्री मराठी
1. बडीशेप(Anised) दोन चमचे घ्यावीत
2. लाल मिरची (Red Chilly )अर्धा किलो घ्याव्यात
3. हिंग (Asafoetida ) दोन ते तीन चमचे घ्यावेत.
4. रक्तमुळ (Alkanet Root) उपलब्ध असेल तर एक चमचा घ्यावेत.
5. मसाल्याची विलायची (Black cardamom)मोठी तीन ते चार घ्याव्यायात
6. काळी मिरी (Black paper)तीन ते चार चमचे घ्यावेत.
7. शाही जिरे (Black cumin) आतपाव जिरे घ्यावीत
8. तमालपत्र (Indian Bay Leaf )पाच ते सहा पाणे घ्यावीत.
9. दालचिनी (cinnamon) एक मोठा तुकडा घ्यावा
10. लवंग (Cloves) दोन चमचे घ्यावेत
11. धने (Corriender seed ) चार चमचे घ्यावेत.
12. कडीपत्ता ( Curry leafs)पाच ते सहा पाने घ्यावीत.
13. मेथीचे दाणे( Fenugreek Seeds) आवडत असतील तर त्याच्यानुसार
14. जायपत्री (Mace )पाच ते सहा पान घ्यावीत
15. चक्रफुल (Star Anise )पाच ते सहा घ्यावेत
16. जायफळ(NutMeg) अर्धे जायफळ घ्यावे
17. हळद (Turmeric )एक चमचा घ्यावे
18. मीठ (Salt )चवीपुरते घ्यावे
19. ओवा(Caromseem ) आतपाव घ्यावे
20. खसखस ( Pappy seeds )दोन चमचे घ्यावेत
21. सुंठ एक तुकडा घ्यावा.
वरील सर्व साहित्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार जास्त देखील घेऊ शकता .
मसाला पुढीलप्रमाणे तयार करावा
१ . गरम मसाला बनविण्यासाठी सर्व मसाले स्वच्छ साफ करून घ्यावेत आणि वर सांगितलेल्या प्रमाण मध्ये घ्यावेत. तुम्हाला जेवढा जास्त दिवसांसाठी मसाला करायचा आहे, त्याप्रमाणे हे साहित्याचे प्रमाण तुम्ही वाढवु शकता आणि गरम मसाला बनवु शकता.
२ . मोठे मोठे जे साबुत जिन्नस आहेत जसे की सुंठ, दालचिनी, जायफळ, तमालपत्र हे जिन्नस थेाडेसे बारीक करून घ्या .
३. सर्व पदार्थ साफ करून झाल्यानंतर एक दिवस कडक उन्हात वाळू द्यावे जेणे करून मसाला छान भाजला जाईल आणि बारीक देखील होईल तसेच पाणी किंवा ओलसर न राहिल्याने मसाला जास्त दिवस टिकेन. त्यासोबत लालमिरची सुद्धा उन्हात वाळवण्यास ठेवावी.
४ . त्यांनतर गॅस चालु करा त्यामध्ये हे सर्व जिन्नस टाका आणि थोडेसे तेल टाकून कमी गॅसवर चांगले भाजुन घ्या. सर्व मसाले एकत्र भाजले तरी चालेल किंवा थोडे थोडे मसाले घेऊन भाजले तरी चालेल जसे तुम्हाला सोयीस्कर असेल तसे तुम्ही भाजुन घेऊ शकता.
५ . वरील सर्व मसाले करपू न देता भाजावे. सर्व मसाले छानप्रकारे भाजुन झाल्यावर गॅस बंद करावा आणि सर्व भाजलेले जिन्नस थंड करून घ्या. आता लाल मिरची थोडे थोडे तेल टाकून भाजून घ्यावी. छान वास येई पर्यंत आणि खरपूस अशी भाजावी.
६ . सर्व जिन्नस थंड झाल्यावर जे मोठे मोठे जिन्नस आहेत जे की दालचिनी, सुंठ, विलायची, चक्रफुल हे मिक्सरच्या भांडयात टाकुन वाटुन घ्या . लक्षात ठेवा चांगले बारीक करून घ्या अजिबात जाडसर ठेऊ नका.
७ . त्यानंतर बाकीचे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांडयात टाकुन एकदम बारीक करून घ्या.
८ . त्यानंतर मग सर्व जिन्नस एका पातेल्यात काढा आणि चांगले मिसळुन घ्या आणि परत एकदा मिक्सरच्या भांडयात टाकुन फिरवुन घ्या. जेणेकरून सर्व जिन्नस एकजीव होवुन पुर्णपणे मिळुन येतील आणि सर्व एकत्रित होतील.
९ . त्यानंतर परत हे मसाले चांगल्याप्रकारे मिक्सरवरून एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ मिसळावे. मीठ थोडे जास्त टाकले तरी चालेल, कारण मीठ मुळे मसाला जास्त दिवस टिकतो , त्यास जाळे किंवा किडे आळि होत नाही , परंतु गरम मसाल्यात मीठ जास्त टाकले असेन तर भाजीत मीठ कमी टाकावे जेणे करून खारट होणार नाही.
१० . मग हा मसाला तयार झाल्यावर एका हवाबंद डब्यामध्ये एका प्लॅस्टिक च्या बॅग मध्ये भरून ठेवावा, म्हणजे बॅग ची गाठ पाडली की मसाल्याचा वास जात नाही. डब्बा ओला नसावा आणि त्याला कुठलाही आधीचा वास नसावा याने मसाला वर्षभर टिकतो.
११ . मीठ थोड्या जास्त प्रमाणात टकले तर हा मसाला बरेच महिने चांगला टिकतो आणि त्याचा वास देखील खुप छान राहतो. आपण बनविलेला हा गरम मसाला कोणत्याही भाजीमध्ये अथवा वरणामध्ये टाकल्यास त्यास अप्रतिम अशी चव आणि सुगंध येतो व आपल्या जेवणाची छान रंजत वाढते.
१२ . मसाला हा जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही हा मसाला घरी मिक्सर मधून बारीक न करता , बाहेरून गिरणीतुन किंवा मिरची कांडप यंत्रातून सुध्दा कांडुन आणू शकतात.
१३ . या मसाल्यामधील एक जिन्नस जायफळ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकु शकता आणि जायफळ भाजतांना जास्त न भाजता थोडेसेच गरम करून घ्या आणि नंतर मिक्सरमध्ये टाकुन घ्या.
१४ . आपल्याला जर गरम मसाला जास्त तिखट पाहिजे नसेल आणि केवळ छान तर्रीदार रंग पाहिजे असेन तर तुम्ही मसाल्याला फक्त जास्त लाल रंग येण्यासाठी कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची किंवा कर्नाटक ची बेंडगी मिरची सुध्दा घेऊ शकता परंतु ; तिखट लाल मिरची सुद्धा टाकावी कारण तिखटपणा असल्यास मसाल्याची चव खुप छान लागते.
अशा प्रकारे तुम्ही आमची आजची गरम मसाला रेसिपी वाचून चविष्ट आणि दर्जेदार गरम मसाला बनवू शकता, आणि आपल्या भोजनाची रंगत वाढवू शकता . ही कृती आणि साहित्य योग्य प्रमाणात घेऊन घरी बनवलेला गरम मसाला तुम्ही अगदी वर्षभर वापरू शकता, छान भाजल्याने याला अजिबात कुम्मट किंवा दमट वास येत नाही आणि यात जाळे किंवा कीड देखील लागत नाही. फक्त ओला हात लागणार नाही याची काळजी घ्यावी.
सारांश -गरम मसाला रेसिपी /गरम मसाला सामग्री मराठी / garam masala recipe in marathi
आपल्याला जर उत्कृष्ट आणि अगदी चवदार , जास्त दिवस टिकणारा गरम मसाला बनवायचा असेल तर ,आमच्या या ” गरम मसाला रेसिपी” मध्ये सांगितलेली माहिती , साहित्य आणि कृती वापरुन , तुम्ही घरच्या घरी एकदम हॉटेल स्टाइल आणि झणझणीत मसाला बनवू शकता . आजची माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल आणि या माहितीचा तुम्हाला फायदा होईल .
आपल्याला ही गरम मसाला रेसिपी / गरम मसाला सामग्री मराठी / garam masala recipe in marathi , या विषयी ची माहिती कशी वाटली, आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)