दुग्ध व्यवसाय माहिती / दुग्ध व्यवसाय फायदे / दुग्ध व्यवसाय धोके/ नाबार्ड दुग्ध व्यवसायासाठी योजना / dudh vyavsay >>>नौकरीच्या शोधामध्ये अनेक युवक-युवती हे बेरोजगार आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे नौकर्यांपेक्षा बेकारांची संख्या फार मोठी होत चालली आहे. त्यामुळे बेकारीला कंटाळून अशा बेकार लोकांनी म्हणजेच बेरोजगार लोकांनी आत्मघातच्या आणि चुकीच्या मार्गाकडे वळण्यायेवजी, असा एखादा स्वयंरोजगारचा मार्ग शोधावा. स्वयंरोजगार ही उत्तम आयुष्य जगण्यासाठी अतिशय सुवर्ण संधी आहे, त्यामुळे आज तुम्ही आमचा हा लेख नक्की वाचवा.
आज आम्ही तुमच्यासाठी वर्षांनुवर्षे चालणारा तुमच्या आयुष्यासाठी मार्गदर्शक ठरणारा हा दुग्ध व्यवसाय लेख घेऊन येत आहोत. हा तुम्हाला अगदी शून्यातून परिपूर्ण यश प्राप्ती करण्यास उपयुक्त आहे, यात आम्ही संपूर्ण माहिती देत आहोत आपण फक्त आपले काम आणि व्यवसाय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करावे.
आता आपण आमच्या आजच्या या लेखात, दुग्ध व्यवसायची परिपूर्ण माहिती जाणून घेऊया, ज्यातील माहिती आणि मार्गदर्शन हे तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल आणि आपल्या पुढील भविष्यात त्याचा नक्कीच होईल आणि तुम्हाला आर्थिक भरभराट होईल.
Table of Contents
दूध व्यवसाय बद्दल माहिती
प्रामुख्याने आपल्या भागात दोन प्रकारचे दूध हे विकले जात असते, त्यातील एक प्रकार म्हणजे म्हशीचे दूध आणि दुसरा प्रकार म्हणजे गाईचे दूध. त्यामुळे आपल्याला जर हा दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर, आपण गाई किंवा म्हशीचे पालन करणे, हे उत्पन्न वाढी साठी महत्वाचे ठरते, उपयोगी ठरते.
दुग्ध व्यवसाय करण्यासाठी प्रामुख्याने देशी गाई, गावठी गाई, आणि संकरीत गाई तसेच दूधाळ म्हशी ह्या पाळल्या जातात. कुठलाही व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागते. त्या साठी आपण कर्ज देखील घेऊ शकतो. आपल्या भारत देशात अशा अनेक शेती शी निगडीत व्यवसायासाठी आपले सरकार आपल्याला कर्ज देण्यास मदत करते. हा दुग्ध व्यवसाय अधिक प्रगत बनवण्यासाठी आपले केंद्र सरकार आणि नाबार्ड याच्या तर्फे आपल्या साठी अनेक योजना या राबविल्या जातात.
नाबार्ड तर्फे, नाबार्ड च्या अंतर्गत दुग्ध व्यवसायासाठी योजना बद्दल माहिती घेऊन आपण बँक मध्ये जाऊन कर्ज घ्यावे आणि आपल्या दुग्ध व्यवयसायची सुरुवात करावी. दुधाचा व्यवसाय करण्यासाठी तुमच्या कडे गाई -म्हशी असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही पशू-संवर्धन विभागातर्फे गाई-म्हशीचे गत वाटप करणे, यासारख्या योजनाचा लाभ घेऊ शकता.
या संदर्भात तुम्ही सविस्तर माहिती तुम्ही ग्राम पंचायत आणि इंटरनेट च्या साहाय्याने घेऊ शकतो त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय उद्योजक विकास योजना देखील आपल्याला फायदेशीर ठरू शकेल.त्यामुळे आपण यासर्व योजनाचा अवश्य लाभ घ्यावा.
गायींच्या जातीची निवड
जेव्हा आपण दुग्ध व्यवसाय करण्याचा विचार करतो त्यावेळी योग्य जातीच्या गाईची निवड करणे हे आवश्यक आहे कारण त्यावर भरपूर नफा अवलंबून आहे. चला तर थोडक्यात गाईच्या जातीचे प्रकार पाहुयात-
गावलाव गाय
गावलाव गायी ह्या प्रामुख्याने दूध मध्यम प्रमाणात देतात. गावलाव गाई प्रामुख्याने सातपुडा, वर्धा, सिवली, नागपूर ह्या ठिकाणी आढळतात. या गाई चालत असताना कान वर करून चालत असतात. यांचा रंग हा पांढरा असतो आणी उंची ही मध्यम असते. या गावलाव प्रकारच्या गाई ह्या जास्त प्रमाणात दूध देत असतात त्यामुळे या जातींच्या गाई या व्यवसायसाठी फायदेशीर ठरतात.
भागणाडी गाय
भागणाडी गाय, या प्रकारच्या गाईची जात ही भरपूर प्रमाणात दूध देते त्यामुळे ज्यांना गाई दुग्ध व्यवसाय करण्यासाठी पाहिजे असतात ते लोक या जातीच्या गाई ची निवड करतात. भागणाडी गाय ही जात जास्त करून नदीच्या काठी असलेल्या गावात आढळते. नाडी गवत आणि त्याची रोटी बनवून या जातीच्या गाई पासून भरपूर दूध काढले जाते.
दूध व्यवसाय माहिती – फायदे आणि धोके
दुग्ध व्यवसाय करण्यासाठी तुमच्या कडे पुरेशा चांगल्या प्रतीच्या दुधाळ गाई किंवा म्हशी असाव्या. आपल्याला त्याची पारख नसल्यास आपण, पशू-संवर्धन विभागाकडे जाणून गाई-म्हशी ची चौकशी करून, गाई आणि म्हशीचे वाटप करणे, ह्या योजनेचा लाभ घ्यावा,
याच सोबत ‘उद्योजक विकास योजना’ ही देखील तुम्हाला या व्यवसायात बरीच उपयोगी ठरते. त्यामुळे आपण यासर्व योजना आणि उपक्रम बाबतीत जागरूक राहावे आणि त्याचा उपयोग करून घ्यावा. स्वच्छ दूध म्हणजे पाणी किंवा इतर कुठलाही पदार्थांची भेसळ नसलेले म्हणजे सोमॅटिक पेशी कमी असलेले दूध, म्हणजे स्वच्छ आणि नितळ दूध होय.
दुग्ध व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी त्यातील लाभ, तोटा हा मोजता येणे हे फार महत्वाचे असते. गाई किंवा म्हशीला हिरवा चारा न मिळाल्यामुळे गाईची दूध देण्याची क्षमता कमी होते आणि अशक्तपणा वाढतो. त्यामुळे दूध जास्त प्रमाणात निघण्यासाठी गाईची म्हशीची योग्यरीत्या काळजी घेणे हे अत्यावश्यक आहे.
दूध व्यवसायला वलय आणि नफा मिळवून देण्यासाठी, दुधाला उच्च दर मिळणे हे आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्या दुग्धव्यवसायातील दुधाची गुणवत्ता ही चांगली राहील, तोपर्यंत लोक तुमच्या कडून दूध विकत घेतील, त्यामुळे योग्यरित्या हा व्यवसाय करणे, हे सुद्धा यशस्वी होण्याचे सर्वात मोठे मार्ग म्हणून समजले जाते.
आपल्याला माहीतच आहे की, आपल्या भारतात कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या काही सरकारी नोंदणी करणे आवश्यक आहे त्या सर्व नोंदणी करून घ्याव्या. या सर्व नोंदणी करून आपण आपल्या व्यवसायाचे अनुदान आणि कर्ज त्याच बरोबर सरकारी योजनांचा फायदा घ्यावा.
दुग्ध व्यवसाय करण्यासाठी यामध्ये योग्य त्या गाईंची निवड करणे व गायींचे पालन पोषण करणे, चार्याची व्यवस्था करणे आणि राहण्याची व्यवस्थित सोय करणे या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. दूध व्यवसाय जोमाने पुढे नेण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करून आपण आपला दूध व्यवसाय अतिशय वेगाने पुढे नेऊ शकतो.
दूध व्यवसायाचे फायदे
वरील प्रमाणे आपण दुग्ध व्यवसाया बद्दल माहिती पाहिली आणि व्यवसाय करण्यासाठी विविध योजना आणि कर्ज याबद्दल सविस्तर माहिती घेतली आता आपण दुग्ध व्यवसायचे फायदे पाहणार आहोत. दूध व्यवसायात फायदा आणण्यासाठी त्यातील फायदा, त्यातून होणारा लाभ , होणारा तोटा किंवा नुकसान यासर्व बाबी मोजता येणे आणि मोजणे हे देखील फार आवश्यक आहे.
बारा महीने हिरवा चारा न मिळाल्यामुळे गाईची अशक्तपणा वाढण्याची शक्यता आणि दूध देण्याची क्षमता देखील कमी होते. त्यामुळे दूध व्यवसायातून फायदा करून घेण्यासाठी, दूध व्यवसायाचा फायदा होण्यासाठी गाई-म्हशींची काळजी घेणे हे अत्यावश्यक आहे. हे सर्व करत असतानाच आपल्याला या व्यवसायचे बरेच फायदे देखील मिळत असतात, ते कोणते आहेत हे आपण आता पाहूया.
- गाईचे खत आपण आपल्या शेतीसाठी वापरू शकतो किंवा ते बाहेर विकू शकतो.
- शेती करत असल्यास आपल्याला पूर्ण आठवड्याचा खर्च देखील भागवता येतो.
- दुग्ध व्यवसाय करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा व्यवसाय करण्यासाठी सरकार कडून अनुदान मिळते.
- दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोड व्यवसाय म्हणून अतिशय चांगला व्यवसाय आहे.
- मोठ-मोठ्या कंपनी ते दुकानापर्यंत दूध पोहचून आपल्या व्यवसायात उत्तम नफा आणि प्रगती करू शकतो.
वरील सर्व दूध व्यवसायाचे फायदे आहेत. हे सर्व फायदे आपल्याला दूध व्यवसाय करत असाल तर त्यातून होऊ शकतील. त्यामुळे कोणताही विचार न करता या व्यवसायाला सुरुवात करावी आणि तुमच्या उत्कर्षाचे दरवाजे तुमच्या साठी खुले होतील.
दुग्ध व्यवसाय धोके
दूध व्यवसायाचे फायदे कोणते आहे आणि कसे आहेत हे पाहिल्या नंतर या व्यवसायचे काय आणि कोण-कोणते धोके आहेत हे देखील आपण समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे दूध व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण आपण, या व्यवसायाशी निगडीत असलेले धोके कोणते आहेत, हे देखील समजून घेणे हे अत्यावश्यक आहे.
जोपर्यंत आपल्या दूध व्यवसायातील दुधाची गुणवत्ता ही चांगली आहे, म्हणजेच दूध फॅट्स युक्त आणि घट्ट आहे तो पर्यंतच लोक तुमच्या कडून दूध हे विकत घेतील त्यामुळे योग्यरित्या हा व्यवसाय करणे हे सुद्धा यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाचे आहे, म्हणजे जर तुमची गाय किंवा म्हैस ही घट्ट दूध देत नसेल तर देखील हा दुग्ध व्यवसाय करणे, हा या व्यवसायातील धोका आहे.
गाई म्हशींच्या आरोग्याची काळजी नाही घेतल्यास याचा थेट विपरीत परिणाम हा व्यवसायावर होतो त्यामुळे जनावरांचे आरोग्य स्वच्छता आणि साफ सफाई तसेच लसीकरण हे योग्यरित्या करावे अन्यथा तुमचा व्यवसाय हा धोक्यात येऊ शकतो.
नाबार्ड दुग्ध व्यवसायासाठी योजना
आपल्या भारतात रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार हमी योजना अंतर्गत, नाबार्ड योजने अंतर्गत दुग्ध व्यवसाय करणार्या रोजगारांना अनेक योजना या शासणामार्फत दिल्या जात असतात, त्याचा वापर करून आपण आपला व्यवसाय पुढे नेऊ शकतो, तर त्या नाबार्ड दुग्ध योजना कोणत्या आहे ते आपण पाहूया –
जनावरे खरेदी करण्यास रक्कम देते
नाबार्ड दुग्ध व्यवसाय योजने अंतर्गत जवळपास दहा जनावरे, चांगल्या प्रतीच्या गाई खरेदी करण्यासाठी, त्याची रक्कम देय करण्यास नाबार्ड दुग्ध व्यवसाय योजना मदत करते, याचा फायदा होतो. ज्यांना शेतीशी पूरक व्यवसाय करायची ईच्छा असते परंतु भांडवल नसते तर अशा वेळी या लोकांना सरकार तर्फे आर्थिक मदत केली जाते.
पशुखाद्य
नाबार्ड दुग्ध व्यवसाय योजना अंतर्गत, हा व्यवसाय सुरू केल्यानंतर कमीत कमी वीस गाय आणि म्हशी साठी पशूखाद्य घेण्यासाठी अनुदान हे दिले जाते. त्यामुळे गाई म्हशींना पौष्टिक खाद्य पुरवठा होतो आणि दूध जास्त प्रमाणात मिळते. नाबार्ड योजना अंतर्गत जनावरांसाठी उत्कृष्ठ प्रतीचे पशुखाद्य दिल्याने जनावरांची दूध देण्याची क्षमता ही जास्त वाढते तसेच दुधाची पत देखील सुधारते म्हणजे दूध घट्ट दिले जाते.
दुग्ध प्रक्रिया यंत्र
डेअरी टाकण्यासाठी त्यासाठी आवश्यक असणारे दुग्ध प्रक्रिया यंत्र , फॅट्स तपासण्याचे यंत्र उपलब्ध करण्यासाठी नाबार्ड दुग्ध व्यवसाय योजने अंतर्गत 13 लाख 20 हजार रूपयां पर्यंतची मदत पुरवली जाते. जर तुम्ही एखादे यंत्र खरेदी केले असेल तर त्यावर 25% भांडवली साबसिडी ही देखील सरकारच्या नाबार्ड या योजने अंतर्गत दिली जाते.
अनुदान
नाबार्ड दुग्ध व्यवसाय अंतर्गत तुम्हाला केवळ पाच किंवा त्यापेक्षा कमी असणार्या गाई ची डेअरी सुरू करायची असेल तर तुम्ही त्या खर्चाचा पुरावा दाखवावा, त्यानंतर या योजने अंतर्गत तुम्हाला सरकार कडून पन्नास टक्के अनुदान हे मिळू शकते. म्हणजेच जरी जास्त प्रमाणात गाई-म्हशींची संख्या नसेल तरी, देखील तुम्हाला सरकार बरीच मदत करते.
डेअरी किंवा दुकान टाकण्यासाठी भांडवल देते
नाबार्ड दुग्ध व्यवसाय योजना या अंतर्गत तुम्हाला डेअरी टाकण्याकरिता एकूण भांडवलच्या जवळपास 33 % एवढी रक्कम ही नाबार्ड दुग्ध व्यवसाय अंतर्गत व्यवसाइकला देय केली जाते.
सारांश – दुग्ध व्यवसाय माहिती / दुग्ध व्यवसाय धोके/नाबार्ड दुग्ध व्यवसायासाठी योजना/दूध व्यवसाय बद्दल माहिती
आपल्याला जर रोजगारची गरज असेल आणि तुम्ही दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही आमच्या या लेखातील माहिती वाचून, दुग्ध व्यवसाय योग्य जातीच्या गाई घेऊन , यातील धोके, नुकसान आणि फायदे यांचा विचार करून तसेच नाबार्ड योजनाचा फायदा घेऊन हा व्यवसाय सुरू करावा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि या व्यवसायात तुम्हाला यश देखील येईल.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , “दुग्ध व्यवसाय माहिती / दुग्ध व्यवसाय फायदे आणि धोके / नाबार्ड दुग्ध व्यवसायासाठी योजना/नाबार्ड दुग्ध व्यवसायासाठी योजना ” ही घरगुती व्यवसाय माहिती कशी वाटली , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)