दूध आणि खजूर खाण्याचे फायदे / दुधासोबत खजूर खाण्याचे फायदे (dudh ani khajur khanyache fayade) >>दूध हा पदार्थ सर्वात पौष्टिक आहे त्यामुळे दुधाला पुर्णान्न असे म्हंटले जाते. दूध हे आपल्या रोजच्या आहारात सर्रास वापरले जाते. तसेच सध्या दुधापासून भरपूर पदार्थ बनवले जात असल्याने त्याचा देखील आपल्या आहारात समावेश केला जातो. नियमित दिवसातून एक वेळेस तरी दूध पिल्याने आवश्यक ती सर्व प्रोटिंस, मिनर्ल्स आणि व्हीटमिन आपल्या शरीराला मिळतात. आवश्यक आणि योग्य ती सर्व पोषकतत्वे आपल्याला दूधातून मिळतात.
दुधासोबतच अजून एक पदार्थ तो म्हणजे खजूर , हा देखील दूध सोबत खाल्याने द्विगुणित फायदा होतो. आपण पाहतो की, सहसा खजूर हे केवळ उपवासला खाल्ले जातात, परंतु वास्तविक पाहता, लोहची कमरतरता असलेल्या व्यक्तीने खजूर नियमित खाल्ले पाहिजे. खजूर खाल्ल्याने शरीरातील साखर देखील वाढत नाही आणि आपल्या शरीराला आवश्यक ती सर्व पोषकतत्वे मिळतात.
खजूर आणि दुध हे नियमित खाल्याने आपल्या शरीराची रोग्प्रतीकार शक्ति देखील वाढते आणि शरीरातील लोहचे प्रमाण देखील वाढते. तर या आरोग्यविषयक लेखात आपण दूध आणि खजूर खाण्याचे विविध फायदे कोणते आहेत तेच पाहणार आहोत, ही माहिती वाचल्या नंतर आणि याक हे फायदे आपल्या लक्षात आल्यानंतर आपण नक्कीच खजूर आणि दूध खाण्यास सुरुवात कराल. चला तर मग सुरू करूया आजच्या लेखातील माहितीला –
Table of Contents
दूध आणि खजूर खाण्याचे फायदे (dudh ani khajur khanyache fayade)
रोज नुसते दूध पिण्या ऐवजी त्यासोबत खजूर खाल्यास त्याचा बराच फायदा होतो. दूध आणि खजूर भिजत घालून ते खावे. दुधात भिजवलेले खजुर खाण्यास अतिशय चविष्ट लागतात. तसेच आरोग्या साठी देखील लाभदायक असतात. दूध आणि खजूर खाण्याचा फायदा असा की, खजूर गरम असल्याने ते खाल्यास, सर्दी,खोकला,अशक्तपणा पित्त यांसारखे त्रास कमी होतात.खजूर आणि दूध एकत्र सकाळी कोमट दुधात दोन ते तास भिजवावे व खावे याने बरेच फायदे होतात आणि आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात.
ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत
कमी वयात बर्याच लोकांना ह्रदयाचे आजार मागे लागतात त्याला कारणीभूत चुकीची आहार पद्धती आहे. तळलेले पदार्थ जंकफूड यांसारख्या असंख्य कारणांमुळे ह्रदयाचे आरोग्य बिघडते ते सुधारण्यासाठी तसेच सुरळीत चालू ठेवण्यासाठी नियमितपणे दुधात भिजवलेले खजूर आणि दूध खावे, त्याने ह्रदयाचे आरोग्य सुधारते आणि चांगले राहण्यास मदत होते.
सर्दी – खोकला कमी करण्यास फायदेशीर
आपण सर्दी झाल्यावर अनेक घरगुती उपाय करत असतो. वेगवेगळे काढे घेणे, वाफ घेणे याच सोबत आपण जर दूध आणि खजूर खाल्ले तर त्याचा बराच फायदा होईल. खजूर हे गरम गुणधर्माचे असल्याने त्याच्यातील गरमी मुळे शरीरातील थंडी आणि सर्दी कमी होते आणि सर्दी व खोकला दोन्ही कमी होते.
रक्त वाढणे आणि रक्त शुद्ध होण्यासाठी मदत होते
खजुर मध्ये अनेक पोषक तत्वे असतात ज्यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. आपल्या शरीरात जर कमी रक्त असेल, किंवा हिमोग्लोबिन कमी असेल तर दूध आणि खजूर खावे. तसेच याचा रक्त शुद्ध करण्यासाठी देखील फायदा होतो. दूध आणि खजूर खाल्याने रक्ताच्या गाठी होण्याची समस्या असेल तर ती देखील दूर होते.
अशक्तपणा दूर करते
अशक्तपणा, थकावट येत असेल तर आपण दोन ते तीन खजूर, दोन खारीक, चार बदाम , केशर टाकून ते प्यावे त्याने आपल्याला आलेला अशक्तपणा नक्कीच दूर होईल आणि आपले काम करण्यासाठी आपण दिवसभर फ्रेश राहू शकाल, तजेलदार राहू शकाल. शुगर आणि प्रोटीन यांचे प्रमाण खजूर मध्ये जास्त असल्याने आलेला अशक्तपणा हा लवकर दूर होतो.एखाद्या एनर्जि ड्रिंक प्रमाणे दूध आणि खजूर खाल्याने ऊर्जा मिळते आणि शरीरातील अशक्त पणा दूर होतो.
झोप लागण्यास मदत होते
रोजची धावपळ, दगदग, कामाचा ताण त्यामुळे रात्री लवकर झोप लागत नाही, त्याचबरोबर बर्याच लोकांना रात्री उशिरापर्यंत मोबाइल बघत बसण्याची सवय असते आणि त्यामुळे झोप गेली की पटकन लागत नाही अशा वेळी लवकर झोप लागण्यासाठी आपण रोज रात्री झोपण्याचा पंधरा मिनिट अगोदर कोमट दुधात तीन खजूर भिजू घालून खावे याने रात्री लवकर झोप लागण्यास मदत होते.
मसल्स वाढण्यास आणि वजन वाढण्यास फायदेशीर
खजूर मध्ये भरपूर प्रमाणात कल्शियम आणि प्रोटिन असल्याने दूध आणि खजूर खाल्याने आपल्या वजनात देखील भरपूर वाढ होते, आणि मसल्स वाढण्यास देखील मदत होते त्याचबरोबर सिक्स पैच देखील येण्यास मदत होते, त्यामुळे दूध आणि खजूर नियमित खाल्ले पाहिजे. खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत कारण आरोग्यासाठी हे खजूर अतिशय पौष्टिक असतात.
रक्तप्रवाह सुरळीत चालण्यास मदत होते
दूध आणि खजूर मध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि लोह असते, त्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत चालण्यास मदत होते आणि त्याच बरोबर स्टॅमिना देखील बर्याच प्रमाणात वाढतो.तुमची कोणतेही काम करण्याची क्षमता देखील वाढते. रोज एक खजूर दुधात भिजत घालून खाल्यास त्याने शरीरातील रक्त देखील वाढते. खजूर खाल्याने रक्त देखील शुद्ध होते.
पुरुषांच्या शुक्रानुंची संख्या वाढते
खजूर आणि दूध यांचे पुरुषांनी हिवळ्याच्या दिवसात नियमित सेवन केल्याने त्यांची शुक्रानुंची संख्या वाढण्यास मदत होते तसेच वंध्यत्व येण्यापासून देखील खजूर आणि दूध यांचे सेवन केल्यास रोखले जाते. खजूर आणि दूध या दोन्हींचे सेवन करणे हे पुरुषांसाठी तर एक वरदान च समजले जाते. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघवा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
अतिसार समस्या दूर करते
खजूर आणि दूध हे मोठ्या प्रमाणात पोटॅशियम ने परिपूर्ण असते त्यामुळे खजूर आणि दूध खाल्ल्यास तुमच्या शरीराला पोटॅशियम हे मुबलक प्रमाणात मिळण्यास मदत होते आणि पोटॅशियम असल्याने अतिसार ची समस्या असेल तर ती लवकर दूर होते आणि आपला त्रास कमी होतो.
हाडे मजबूत होतात
खजूर आणि दूध यांच्या मध्ये कल्शियम, तांबे, मॅग्ंनिज, खनिज, सेलेमियम हे घटक भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे दूध आणि खजूर यांचे सेवन केल्यास आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते.
त्वचा निरोगी ठेवण्यास मदत
खजूर मध्ये जास्त प्रमाणात अॅंटीऔक्सिडेंट उपलब्ध असतात त्यामुळे स्कीन म्हणजेच त्वचेशी निगडीत कोणताही त्रास रोखण्यास खजूर फायदेशीर ठरते. वाढत्या वया सोबत आपली त्वचा सैल पडते तर खजूर खाल्ल्याने त्वचा घट्ट आणि सतेज राहण्यास मदत होते तसेच आपल्या त्वचेवर फोड येत असतील तर ते देखील कमी होतात.
गर्भवती महिलांसाठी वरदान
खजूर मध्ये जवळपास आवश्यक ते सर्वच घटक हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे बाळाच्या सढृड वाढी साठी, बाळाचे हाडे मजबूत होण्यासाठी, वजन वाढण्यासाठी, रक्त वाढण्यासाठी, आणि गर्भवती महिलेचा अशक्तपणा जाण्यासाठी डॉक्टर देखील त्या महिलेला नियमित खजूर आणि दूध खाण्याचा सल्ला देतात. त्याने आई आणि बाळ दोघांना देखिल बराच फायदा होतो.
अशा प्रकारे दूध आणि खजूर खाण्याचे एक ना अनेक फायदे आहेत, ते कोणते आहेत आणि कसे करून घ्यावे याची पूर्ण माहिती या लेखाद्वारे आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवली आहे. या माहीचा वापर करून तुम्ही तुमच्या आरोग्याचा फायदा करून घेऊ शकता आणि या लेखाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.
सारांश – दूध आणि खजूर खाण्याचे फायदे (dudh ani khajur khanyache fayade)
आपल्याला जर शरीरात लोहची कमतरता असेल, किंवा अशक्तपणा येत असेल तर आपण आमच्या लेखात सांगितलेल्या माहितीनुसार दुध व खजूर खावे, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमच्या शारीरिक सबलीकरणास मदत होईल.
आपल्याला ही “दुध आणि खजूर खाण्याचे फायदे” मराठी रेसिपी आणि माहिती ” या विषयी ची माहिती कशी वाटली, आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)