डोसा कसा बनवायचा / डोसा बनवण्याची पद्धत / डोसा बनवणे / डोसा बनवण्याची रेसिपी >> आपण बाहेर हॉटेल मध्ये डोसा खातो, परंतु हाच डोसा घरी कसा बनवायचा या बाबत आपण आज जाणून घेणार आहोत. तसे बघायला गेले तर डोसा बनविण्याचे निरनिराळे प्रकार आहेत. त्यापैंकी काही कूरकूरीत डोस्याचे प्रकार आपण आज या लेखामध्ये बघणार आहोत.
सर्वात प्रथम आपण डोश्याचे बॅटर कशाप्रकारे तयार करतात हे पाहणार आहेात. आणि एकदा का तुम्ही डोश्याचे बॅटर तयार केले, मग त्यापासुन तुम्हाला विविध प्रकारचे डोसे बनवता येऊ शकतात.चला तर मग जाणून घेऊयात डोसा कसा बनवायचा.
Table of Contents
डोसा कसा बनवायचा / डोसा बनवण्याची रेसिपी (dosa kasa banvaycha/dosa banavnyachi recipe)
या लेखामध्ये आपण एकूण ४ प्रकारचे डोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण डोश्याचे बॅटर कसे बनवायचे ते बघूयात. आणि त्या नंतर आपण मसाला डोसा, सेट डोसा, मुगडाळ डोसा आणि गव्हाच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत.
डोश्याचे बॅटर कसे बनवायचे
डोश्याचे बॅटर बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि डोसा बनवण्याची रेसिपी मराठीत
डोसा बनवण्याची कृती करण्याआधी आपल्याला बनवावे लागते तर ते डोश्याच्या साठी लागणारे तांदूळ आणि उदीड दाळ चे बॅटल. तर हे बॅटल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि योग्य प्रमाण हे खालील प्रमाणे आहे;
1.जाड किंवा भरडा तांदूळ – दोन वाटी
2.उकडे तांदूळ – एक वाटी
3.उडीद दाळ – अर्धी वाटी
4.मेथीचे दाणे- एक ते दोन चमचे
5.मीठ – चवीपुरते.
वरील सर्व साहित्य आणि त्याचे योग्य प्रमाण घेऊन हे सर्व साहित्य जास्त पाण्यात चार तास भिजत ठेवावे. दाळ आणि तांदूळ हे वेगवेगळे भिजत घालावे. यात आपण एक मूठ तुरडाळ भिजत घातल्यास त्याने देखील डोसा अधिक कुरकुरीत होतो. आता पाहूया हे बॅटल बनवायचे कसे –
डोश्याचे बॅटर बनविण्याची कृती
- डाळ, मेथीचे दाणे आणि तांदूळ स्वच्छ धुवून ते चार तास पाण्यात भिजत ठेवल्यानंतर निथळून घ्यावे.
- साधारण सर्व पानी काढून टाकल्यानंतर हे सर्व डाळ व तांदूळ बारीक मिक्सर मधून वाटून घ्यावे.
- तांदूळ थोडे जाडसर आणि दाळ बारीक काढावी आणि चवीनूसार मीठ टाकून एखादया उबदार ठिकाणी ठेवावे.
- आता हे डोसाचे पीठ रात्रभर असेच ठेवावे आणि अशाप्रकारे ठेवल्यास हे पीठ चांगल फुगून वर येतेम्हणजेच आंबते.
- थंडीच्या दिवसात ते थोड जास्त वेळ ठेवावे लागतात, कारण हे पीठ आंबण्यासाठी कोमट आणि दमट वातावरण असावं लागत.
अशाप्रकारे डोश्याचे बॅटर तयार केले जाते. चला तर मग आपण हया बॅटर पासून वेगवेगळया प्रकारचे डोसे करता येतात, ते कस हे पाहूया.
मसाला डोसा कसा बनवायचा (masala dosa kasa banvaycha)
मसाला डोसा बनवण्यासाठी लागणारे साहीत्य
डोश्याचे बॅटल (वरीलप्रमाणे) योग्य ते साहित्य आणि त्याचे योग्य प्रमाण घेऊन बनवावे आणि त्यापासून डोसा बनवण्याची पद्धत आणि डोसा बनवण्याची रेसिपी वापरुन डोसा बनवावा.
मसाला डोसा साठी लागणार्या मसाल्याचे साहीत्य:-
- चार ते पाच बटाटे उकडून घ्यावे आणि मग त्याचा लगदा बनवावा किंवा बारीक चिरुन घ्यावे.
- एक कांदा बारीक चिरुन घ्यावा.
- तीन ते चार चिरलेल्या हिरव्या मिरच्या, तिखट जमत नसेल तर कमी तिखट मिरची घ्यावी.
- हे सर्व साहित्य परतवण्यासाठी तेल घ्यावे.
- लसूण आल्याची पेस्ट करून घ्यावी.
- मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता व उडीददाळ घ्यावी.
- आपल्या चवीनुसार मीठ घ्यावे.
मसाला तयार करण्याची कृती:-
वरील सर्व मसाल्याचे सामान घेऊन डोसा बनवण्यासाठी मसाला बनवावा.
1.कढईत तेल टाकून तेल तापल्यावर मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता , उडीददाळ, हिरव्या मिरच्या , लसूणआणि आल्याची पेस्टची फोडणी करावी.
2.त्यानंतर कांदा गुलाबी होईपर्यंत बारीक गॅस वर परतून घ्यावा.
3.खमंग वास सुटल्यावर त्यात बटाटयाच्या फोडी टाकाव्यात आणि चांगले परतावे.
4.चवीनुसार मीठ टाकून हे सर्व साहित्य एकजीव करावे.
5.चवीसाठी थोडी कोंथबीर टाकावी आणि भाजी म्हणजेच मसाला तयार करून घ्यावा.
मसाला डोसा बनवायची कृती
वरील प्रमाणे डोसा बनवण्याचे बॅटल आणि डोश्यातील मसाला भाजी तयार झाल्यानंतर मसाला डोसा बनवावा. डोसा हा नॉनस्टिक तव्यावरच बनवावा. त्यामुळे डोसा तयार होत असताना तव्याला चिटकणार नाही.
1.सर्वप्रथम गॅस व नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवावा. गॅस मोठ्या आचेवर ठेवावा.
2.पाणी तव्यावर शिंपडून तवा कितपत गरम झाला याचा अंदाज घ्यावा आणि मग त्यावर हे बॅटल पळीने किंवा वाटीने टाकावे.
3.तव्याच्या मध्यभागी डोसा बॅटर टाकल्यानंतर त्याला पसरट चमच्याने गोलसर पसरावे. पसरवत असताना सर्व बाजूने एकसारखी जाडी राहील याची काळजी घ्यावी.
4.बाजूने तेल सोडून डोसा खरपूस एका बाजूने भाजुन घ्यावा आणि नंतर हळुवार दुसर्या बाजूने भाजण्यासाठी उलटवावा. तुटणार नाही याची काळजी घ्यावी.
5.दोन्ही बाजूने डोसा छान भाजला गेला की वरून थोडे बटर डोसाला लावावे. त्यामुळे टेस्ट व्हॅन येते.
6.आता या तयार झालेल्या डोसा वर तयार केलेला मसाला म्हणजेच तयात मसाला भाजी टाकून पसरून घ्यावी आणि त्याला एक वाफ येऊ द्यावी.
7. छान वाफ आल्यानंतर डोसा झाला असणार व त्यानंतर डोस्याला दुमडून सर्व्ह करावा.
सेट डोसा कसा बनवायचा (set dosa kasa banvaycha)
सेट डोसा बनवण्याची कृती
सेट डोसा बनवण्याची कृती खालील प्रमाणे करावी.
- सेट डोसा बनविण्यासाठी तवा गरम करून घ्यावा.
- पाणी शिंपडुन तवा गरम झाल्याचा अंदाज घ्यावा.
- पळीने तव्याच्या मध्यभागी बॅटर सोडावे व सर्व बाजूने एकसारखे जाडसर पसरावे, कुठेही जाड किंवा पातळ राहणार नाही याची काळजी घ्यावी.
- मात्र बॅटर तवाभर न पसरवता पॅनकेक प्रमाणे थोडसंच पसरवून घ्यावे.
- सेट डोसा हा, मसाला डोसा याच्या तुलनेत थोडासा जाड असतो.
- त्यावर वरच्या बाजूने चिरलेला कांदा, कोंथबीर आणि आवडत असल्यास हिरवी मिरची बारीक कट करून टाकावी.
- कडेने तेल लावून खालची बाजु अगदी खरपुस अशी भाजुन घ्यावी.
- एक बाजू शेकली की उलथन्याने तो डोसा उलटा करावा ज्यामुळे वरची बाजु देखील शेकली जाईल आणि दोन्ही बाजूने जाडसर असल्याने डोसा पूर्ण शेकला जाईल.
- दोन्ही बाजुने खरपुस झालेला आणि स्पॉंजी झालेला हा सेट डोसा गरमागरम वरतून बटर लावून सर्व्ह करावा. या डोस्याने पोट लवकर भरते.
मुगडाळ डोसा / मूग डोसा रेसिपी (mugdal dosa kasa banvaycha)
काही वेळेस आपल्याला मसाला किंवा सेट डोसा बनवण्याचे दाळ तांदूळ चे बॅटल बनवण्याचा कंटाळा येतो किंवा हिवाळ्यात हे आंबत नाही त्यामुळे कधी कधी मुगडाळ डोसा बनवावा, हा खाण्यास देखील चविष्ट लागतो आणि पौष्टिक देखील असतो.
डोस्याचे बॅटर बनविण्यासाठी लागणारे साहीत्य
1.दोन वाटया जाडे तांदूळ किंवा भरडा तांदूळ
2.अर्धी वाटी मुगदाळ साल असलेली असेल तरी चालेल
3.चवीपुरते मीठ
वरील सर्व साहित्य वापरुन आपण उक्तृष्ठ आणि आरोग्यास पोषक असा देखील डोसा आहे. चला तर पाहूया हा मुगडोसा बनवण्याची कृती आपण पाहूया
बॅटर तयार करण्याची कृती
1.तांदुळ आणि डाळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवावी.
2.सकाळी दोन्ही डाळ व तांदूळ वाटून घ्यावे.
3.चवीनुसार त्या बॅटरमध्ये मीठ आणि गरजेनुसार पाणी टाकुन बॅटर तयार करावे. हा डोसा बनवण्यासाठी या बॅटल ला आंबावण्याची गरज नसते.
डोसा बनविण्याची कृती
1.बॅटरमध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या , कोंथबीर, जीरे, हळद, टाकावी. आपल्या चवीनुसार मीठ टाकावे.
2.आता तवा गरम करायला ठेवा आणि पाणी शिंपडून तवा चांगला गरम झाला आहे की नाही याचा अंदाज घ्यावा.
3.तव्यावर डोसा गोलाकार पसरवा आणि तेल लावून खरपुस भाजुन घ्यावा. इतर डोस्यापेक्षा या प्रकारच्या डोश्याला थोडे जास्त प्रमाणात तेल लागते.
अशा प्रकारे, आपण तांदूळ आणि मुगाची दाळ वापरुन आपण डोसा बनवू शकतो. हा डोसा बनवण्यासाठी आपण हिरवे मूग याचा देखील वापर करू शकतो. मुगडाळ आणि हिरवे मूग हे दोन्ही देखील आपल्या शरीरसाठी अतिशय पौष्टिक असतात, त्यामुळे बरेच लोक केवळ उडीद दाळ आणि तांदूळ वापरुन डोसा बनवण्यापेक्षा मुगाचा डोसा बनवणे जास्त पसंद करतात.
गव्हाच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा (gavhacha dosa kasa banvaycha)
गव्हाच्या पिठाचा डोसा तयार करण्यासाठी लागणारे साहीत्य
उडीद दाळ आणि तांदूळ तसेच तांदूळ आणि मूग किंवा मुगडाळ वापरुन ज्याप्रमाणे डोसा बनवला जातो त्याच प्रमाणे गव्हाच्या पिठा पासून देखील डोसा बनवला जातो, तो कसा बनवायचा हेच आपण आता या पुढील लेखात पाहणार आहोत. साधारणपणे गव्हाच्या पीठाचा डोसा बनवण्यासाठी खालील साहित्याचा वापर करावा लागतो.
गव्हाचे पीठ जवळ पास एक वाटी
बेसन पीठ अर्धी वाटी
आवडी नुसार लाल तिखट किंवा हिरवी मिरची
आपल्या चवीनुसार मीठ
आवशकते नुसार तेल
दोन वाटी पाणी इ.
आता हे वरील सर्व साहित्य वापरुन गव्हाच्या पीठा पासून डोसा कसं बनवायचा त्याची कृती आपण पाहूया
गव्हाच्या पिठाचा डोसा बनवण्याची पद्धत
1.एक बाउल घ्यावा आणि त्यात तुमच्या अंदाजानुसार किंवा वर सांगितलेल्या प्रमाण नुसार गव्हाचे पीठ घ्यावे. म्हणजे तुम्हाला डोसे किती करायचे त्यानुसार घ्यावे.
2.एक वाटी गव्हाच्या पिठात अर्धी वाटी बेसन पीठ टाकावे आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यावे.
3.त्यामध्ये थोडे थोडे पाणी मिसळत पातळ बॅटर तयार करून घ्यावे तसेच दोन चमचे तेल देखील टाकावे.
4.त्यानंतर गॅसवर तवा ठेवावा व तो नॉनस्टिक चा असावा. तवा गरम झाला की नाही हे बघण्यासाठी पाणी शिंपडून घ्या.
5.त्यानंतर तव्यावर हे तयार केलेली बॅटर सोडा आणि ते पुर्ण तव्यावर पसरवा आणि संपूर्ण कडेने तेल सोडा.
6.डोसा पसरवल्यानंतर सगळीकडून कडेने तेल सोडून खरपूस भाजावे.
7.हळुवार पणे डोसा पलटवावा आणि दुसर्या बाजूने देखील छान शेकून घ्यावा मग ते झाकण ठेवून पाच मिनिटे मंद आचेवर शिजु दयावे जेणे करून कच्चा राहणार नाही आणि छान खुसखुशीत देखील होईल.
अशा प्रकारे आपण छान असा गव्हाच्या पीठाचा वापर करून गरमागरम डोसा सर्व्ह करावा, यावर देखील बटर टाकावे त्याने डोश्याला वेगळीच छान चव येते. वरील लेखात तांदूळ आणि उडीद डाळ चा डोसा, सेट डोसा मसाला डोसा आणि गव्हाच्या पीठाचा डोसा बनवण्याची पद्धत, डोसा बनवण्याची रेसिपी मराठीत आम्ही सादर केली आहे , यावरुन डोसा कसा बनवायचा हे तुमच्या लक्षात आलेच असेल.
सारांश – डोसा कसा बनवायचा (dosa kasa banvaycha)
डोसा कसा बनवायचा हे या लेखामध्ये डीटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहेच. एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल की डोसा बनवण्यासाठी डोश्याचे बॅटर महत्वाचे आहे ते तुम्ही एकदा बनवले की तुम्ही कोणत्याही प्रकारचा डोसा अगदी सहज बनवू शकता. तुम्हाला डोसा बनवण्याची ही घरगुती रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा.
डोसा बनवण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात
डोसा बनवण्यासाठी लागणारे पदार्थ हे तुम्ही कोणता डोसा बनवत आहात त्यावर अवलंबून आहेत. प्रत्येक डोश्यासाठी तुम्हाला डोश्याचे बॅटर हे बनवावे लागतेच आणि हे डोश्याचे बॅटर बनवण्यासाठी तुम्हाला जाड तांदूळ, उकडे तांदूळ, उडीद डाळ, मेथीचे दाणे व चवीनुसार मीठ हे पदार्थ लागतात.
आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)