डोळे लाल होणे घरगुती उपाय/डोळे लाल झाल्यावर घरगुती उपाय (dole lal hone upay in marathi)>> डोळे ही देवाने मानवाला दिलेली अनमोल व अतिशय सुंदर अशी देणगी आहे. जर डोळे नसते तर आपण ही सुंदर सृष्टी पाहूच शकलो नसतो. डोळे ही जगाला पाहण्याकरता लागणारी खिडकी आहे. डोळे हा ५ इंद्रियांपैकी एक महत्त्वाचा आणि संवेदनशील अवयव आहे म्हणून त्याची काळजी योग्य प्रकारे घ्यायलाच हवी.
आजकाल वाढत्या ताण-तणावमुळे, वाढलेल्या कामामुळे , मोबाईल, लॅपटॉप-कॉम्पुटर यांच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे अनेक आजार वाढले आहेत. आपण आता बघतो आहोत की किती तरी लहान मुलांना चष्मा लागलेला आहे. डोळे कोरडे होणे, डोळ्यातून पाणी येणे ,डोळे लाल होणे यांसारख्या गोष्टींसोबतच डोळ्यांचे आजार देखील वाढत चालले आहेत. आपण रोज डोळ्यांची काळजी घेण्याच्या सवयी जर स्वतःला लावून घेतल्या, तर आपल्याला डोळयांच्या होणाऱ्या अडचणी किंवा विकार टाळता येऊ शकतात. आजकाल आपण पाहतो कि डोळे लाल होणे हा एक सामान्य प्रश्न झाला आहे. डोळे लाल होण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय आपण आता पाहूया .
Table of Contents
डोळे लाल होणे घरगुती उपाय/डोळे लाल झाल्यावर घरगुती उपाय (dole lal hone upay in marathi)
या लेखाच्या सुरवातीला आपण बघूयात डोळे कशामुळे लाल होतात, डोळे लाल होण्याची कारणे कोण कोणती आहेत आणि त्यानंतर डोळे लाल होणे घरगुती उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊयात.चला तर मग जाणून घेऊयात डोळे लाल होण्याची कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय.
डोळे लाल होण्याची कारणे (Causes of red eyes in marathi)
- डोळ्यांवर जास्त वेळ जर ताण पडला तरी डोळे लाल होऊ शकतात .
- जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळे किंवा फिरल्या मुळे ही डोळे लाल होऊ शकतात .
- जास्त वेळ मोबाईल वापरल्यामळे देखील डोळे लाल होऊ शकतात .
- कोरोना व लॉकडाऊनमुळे आजकाल सर्व काही ऑनलाईन व घरी बसून काम चालू आहे. त्यामुळे लॅपटॉप व कॉम्प्युटरचा वापर वाढला आहे, आणि अशा गोष्टींमुळे ही डोळ्यांचे लाल होणे यांसारखे दुष्परिणाम वाढू लागले आहेत .
- डोळ्यांमध्ये धूळ अथवा कचरा गेला, गाडी चालवताना डोळ्यात कचरा अथवा धुळीचे सूक्ष्म जंतु जातात आणि यामुळे देखील तुमचे डोळे लाल होऊ शकतात.
- आपण पाहतो की आजची तरुण पिढी केसाला तेल लावणे टाळते त्यामुळे केस व डोक्याची त्वचा कोरडी होते. आणि याच कोरडेपणामुळे ही डोळे लाल होतात .
- झोप कमी झाल्यामुळे देखील अनेकांचे डोळे लाल होतात.
- बहुधा सततच्या सर्दी – खोकल्यामुळे डोळ्यातून पाणी येऊन डोळे लाल होतात.
वरील कारणांमध्ये डोळे लाल होण्यासोबतच डोळ्यांची खाज, सुजन, डोळ्यातील कोरेडेपणा, डोळ्यातून पाणी येणे, अंधुक दिसणे इत्यादी समस्या देखील उदभवू शकतात. आता आपण डोळे लाल होणे काही घरगुती उपाय पाहूयात ज्यांची अंमलबजावणी तुम्ही घरच्या घरी करून डोळे लाल होणे ही समस्या कमी करू शकता.
डोळे लाल होणे घरगुती उपाय (dole lal hone upay in marathi)
डोळे लाल होण्यावर घरगुती उपाय बघताना सुरवातीला आपण डोळे लाल होऊ नयेत, म्हणून काय काळजी घ्यायची ते जाणून घेऊयात आणि नंतर घरगुती उपाय कोणते करता येतात ते पाहुयात.
डोळे लाल होणे घरगुती उपाय – घ्यावयाची काळजी
- सगळ्यात महत्त्वाची डोळ्यांची काळजी घेणे म्हणजे जेव्हा आपण सकाळी अंथरुणातून उठतो, त्याच वेळी सर्वप्रथम आपले दोन्ही हात एकमेकांवर घासून डोळ्यांवरून फिरवावेत आणि मगच डोळे उघडावेत. त्यामुळे डोळ्यांवर अचानक ताण पडणार नाही व डोळे उघडायला त्रास देखील होणार नाही.
- डोळ्यांची सारखी उघडझाप करणे त्यामुळे डोळ्यांचा व्यायाम होतो या व डोळे जास्त वेळ ताणले जात नाहीत. यामुळे आपले डोळे लाल होण्यापासून वाचू शकतात.
- जर तुम्ही जास्त वेळ उन्हात काम करत असाल, तर तुम्ही सन ग्लास वापरावेत. धूळ-माती, कचरा यापासून तुमचे संरक्षण होते. उन्हामुळे डोळ्यांना त्रास होतो, म्हणून जर तुम्हाला पाणी उपलब्ध असेल तर तुम्ही साधारण दर दीड ते दोन तासांनी आपले डोळे पाण्याने धुवू शकता. त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल व डोळे लाल होण्यापासून वाचू शकतात.
- मोबाईल फोन, टीव्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटर यांचा वापर कमीत कमी करा.ज्यामुळे तुमचे डोळे व्यवस्थित राहतील आणि डोळ्यांचे आजार देखील होणार नाहीत. जर आपण दिवसभर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वर काम करत असाल तर या गोष्टीची काळजी घ्या, की आपल्या रूम मध्ये योग्य आणि पुरेसा प्रकाश असायला हवा. याशिवाय डोळ्यांचा अँगल सरळ राहील असेच बसावे. कॉम्प्युटरचा वापर करीत असताना अर्ध्या-एक तासानंतर मधे मधे ब्रेक घ्यावा आणि मध्ये मध्ये स्क्रीनवरून डोळे सरकवून दूरवर पहावे.
- आठवड्यातून एक ते दोन वेळा रात्री झोपताना केसाला छान तेल लावून झोपावे त्यामुळे डोके शांत व थंड होते आणि डोळ्यांनाही थंडावा मिळतो.
- रोज योग्य व पुरेपूर झोप घ्यावी. रात्री कमीतकमी ६ तास तरी तुमची झोप झाली पाहिजे यामुळे डोळ्यांना देखील आराम मिळतो व झोप पुर्ण झाल्यामुळे डोळे देखील लाल होत नाहीत.
- जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्यामुळेही डोळ्यांचे आरोग्य सुधारले जाऊ शकते.
- डोळ्यांना थंड पाण्याने शेकायला हवे, असे केल्याने डोळ्यांना थंडक व आराम मिळतो.
डोळे लाल होणे घरगुती उपाय
तुमचे जर डोळे लाल झालेले असतील किंवा सतत होत असतील तर तुम्ही खालील घरगुती उपाय करा, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला काही खर्च येणार नाही आणि घरच्या घरी तुम्ही हे उपाय करू शकता ज्यामुळे काही साइड इफेक्ट देखील होणार नाहीत आणि तुम्हाला डोळे लाल होण्या पासून निच्छित आराम मिळेल.
कोरफड – डोळे लाल होणे उत्तम उपाय
कोरफड ही थंड गुणधर्म असेलली वनस्पती म्हणून ओळखली जाते आणि डोळे लाल होण्याचे एक कारण डोळ्याची उष्णता वाढणे हे देखील असू शकते त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. यात असणारे अल्कलाइन आणि एंटीइंफ्लामेटरी गुणधर्म डोळ्यांचा कोरडेपणा दूर करून, त्यांना ओलावा प्रदान करतात. यासाठी दररोज कोरफडीचा गर पाच ते दहा मिनिटे लावावा व नंतर डोळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत.
गुलाब जल – गुणकारी उपाय
गुलाब जल हे देखील डोळ्यांना थंडावा देण्यासाठी उपयोगी येते म्हणजेच तुमच्या डोळ्यांना थंडावा प्रदान करते, त्यामुळे डोळे जर लाल होत असतील तर गुलाब जल हे डोळ्यांना वरच्या बाजूने लावल्यास देखील तुम्हाला चांगला आराम जाणवेल. त्यामुळे डोळे लाल होणे वर उपाय म्हणून आपण याचा देखील उपयोग करू शकता. किंवा एका सूती कपडावर थोडे गुलाबजल टाकावे आणि ते डोळ्यावर ठेवावे.
काजळ – डोळे लाल होणे उत्तम घरगुती उपाय
अथवा सुरमा डोळ्यांवर ताण आणते, तसेच ब्युटी प्रॉडक्ट व मेकअप यामध्ये केमिकल मोठ्या प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांना नुकसान होते म्हणून यांचा वापर शक्यतो कमी व गरजेच्या वेळीच केलेला बरा. म्हणून जर डोळे लाल होत असतील तर काजळ वापरू नये.
काकडी – डोळ्यांना थंडावा देते
काकडी ही थंड असल्याने तिला कापून डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांतील खाज, सूज, जळजळ दूर होते आणि डोळे लाल होणे या समसयेपासून सुटका होते. काकडी मध्ये डोळ्यांना थंडावा देण्याचा गुण सर्वात जास्त प्रभावी असतो, त्यामुळे डोळे लाल झाले तर, त्यावर वर सांगितल्या प्रमाणे काकडी ठेवावी.
मीठ आणि पाणी
पाणी उकळून थंड करावे. पाणी थंड झाल्यावर यामध्ये मीठ मिसळा. हे मीठ-पाणी कापसाने डोळ्यांवर लावा. हा देखील डोळे लाल होणे वर उत्तम घरगुती उपाय आहे.
आय ड्रॉप (eye drop)
काही शारीरिक कारणामुळे किंवा इजा झाल्याने देखील डोळे लाल होऊ शकतात त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यांचे ड्रॉप खरेदी करा, व त्याचा नियमित वापर करा. त्याने देखील डोळे लाल होणे कमी होईल.
सारांश – डोळे लाल होणे घरगुती उपाय (dole lal hone upay in marathi)
मुळात डोळे लाल होणे यात जास्त घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण प्रवास आणि लहान मोठे इन्फेक्शन, धूळ,कचरा यामुळे ही समस्या उद्भवू शकते. त्यावेळी वरील घरगुती उपाय केल्याने तुमच्या डोळ्यांना नक्कीच आराम मिळेल. परंतु जर आपल्याला डोळे लाल होण्यासोबत अत्याधिक वेदना, डोकेदुखी, अंधुक दिसणे सारख्या समस्या होत असतील, तर सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मगच पुढील उपचार करावेत.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले डोळे लाल होणे घरगुती उपाय कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)