छातीत दुखणे घरगुती उपाय – Best 11 Chest Pain Home Remedies

छातीत दुखणे घरगुती उपाय /छातीत डाव्या बाजूला दुखणे घरगुती उपाय / छातीत डाव्या बाजूला चमक येणे / chatit dukhane gharguti upay >>> बरीचशी अशी लोक, थोडी वयस्कर लोक असतात ज्यांच्या छातीत डाव्या बाजुला अधून-मधून सारखे दुखत असते आणि त्यामुळे ते परेशान आणि बेचैन होतात. आपल्या छातीत डाव्या बाजुला दुखण्याची बरीचशी कारणे असु शकतात. त्यात काही साधारण कारणे ही असु शकतात ,तर काही गंभीर कारणे देखील असू शकतात. त्यात काही हार्ट अटॅक सारखी काही गंभीर आणि प्राणघातक असे देखील कारणे असु शकतात ज्यामुळे छातीत डाव्या बाजूला दुखू लागते, त्यामुळेच छातीत डाव्या बाजूला दुखणे या समस्ये कडे अगदीच दुर्लक्ष करून चालणार नाही. शरीरात छातीच्या डाव्या बाजुला असलेल्या बरगडया किंवा डाव्या बाजुला असलेल्या लंग्स मध्ये अचानक दुखत आहे असे वाटल्यास ते डाव्या बाजूचे छातीचे दुखणे असते.

छातीत दुखणे घरगुती उपाय /छातीत डाव्या बाजूला दुखणे घरगुती उपाय / छातीत डाव्या बाजूला चमक येणे / chatit dukhane gharguti upay

आपल्या घरातील वयस्क व्यक्तीच्या छातीत डाव्या बाजूला दुखणे / छातीत डाव्या बाजूला चमक येणे / छातीत दुखणे अशी कोणतीही समस्या जाणवू लागली तर आपण लगेचच घाबरतो परंतु; लगेच घाबरून नकारात्मक विचार करण्यापेक्षा आपण त्यावर तत्काल घरगुती उपाय करून आजारी व्यक्तीचा त्रास कमी करू शकतो, आणि त्यासाठी तुम्हाला मदत व्हावी याचसाठी आम्ही आजचा “छातीत दुखणे घरगुती उपाय” हा लेख घेऊन आलो आहोत, आणि जर तुमच्या घरात वयस्कर व्यक्ती किंवा छातीत डाव्या बाजूला दुखत असल्याची समस्या असलेली व्यक्ती असेन तर आजचा आमचा हा लेख तुम्ही आवर्जून वाचा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, आणि ज्यावेळी असा काही प्रसंग येईल त्यावेळी या लेखात सांगितलेले उपाय करून आपण गोंधळून आणि घाबरून न जाता उपचार कर शकाल.

छातीत दुखणे घरगुती उपाय /छातीत डाव्या बाजूला दुखणे घरगुती उपाय / छातीत डाव्या बाजूला चमक येणे / chatit dukhane gharguti upay

आपल्या छातीत डाव्या बाजूला दुखणे / छातीत डाव्या बाजूला चमक येणे म्हणजे काही गंभीरच समस्या आहे असे नाही, काही वेळेस छोट्या – मोठ्या कारणामुळे देखील दुखू शकते तर आता आपण ही कारणे बघू –

छातीत डाव्या बाजूला दुखणे / छातीत डाव्या बाजूला चमक येणे कारण –

  •  गॅस मुळे देखील छातीत डाव्या बाजुला वेदना हेाऊ शकतात . तसेच गॅसच्या त्रासा मुळे छातीत जळ – जळ देखील वाढते. पण हे दुखणे कमी वेळे पुरते असेल तर काही काळजीचे कारण नाही पण दुखणे जास्त काळ असेल तर त्वरीतच डॉक्टरां कडे जाऊन त्यांचा सल्ला घेतलेलेच चांगले.
  • पाणी कमी पिल्यामुळे अपचन होते किंवा जेवण झाल्यावर पाणी अति जास्त प्रमाणात पिल्याने देखील छातीत दुखू शकते .
  • कधी कधी पोट फुगते आणि पोटात गुबारा धरतेा आणि मग छातीत दुखते.जास्तीत जास्त पन्नास किंवा साठ वर्ष असलेल्या वृध्द लोकांना असा त्रास जाणवतो.
  • पण आज कालच्या धकाधकीच्या जीवना मध्ये वीस ते पंचवीस वयाचे किंवा त्यापेक्षा ही जास्त वय असलेल्या लोकांना छातीत दुखण्याचा त्रास होतो कारण लोकांचे बदलते लाईफ स्टाईल, जेवणाच्या वेळा, झोपण्याच्या वेळा, ताण-तणाव या सर्वच गोष्टीमुळे छातीत दुखण्याचा त्रास होतो आहे . तर आपण आज त्याच विषयावर ” छातीत डाव्या बाजूला दुखण्यावर काही घरगूती उपाय” कोणते आहेत ते पाहणार आहोत.

छातीत दुखणे घरगुती उपाय / छातीत डाव्या बाजूला दुखणे घरगुती उपाय / chatit dukhane gharguti upay

कांदा

छातीत दुखणे घरगुती उपाय /छातीत डाव्या बाजूला दुखणे घरगुती उपाय / छातीत डाव्या बाजूला चमक येणे / chatit dukhane gharguti upay
कांदा रस,लिंबू रस आणि मध

कांदा हा आरोग्या साठी फार उपयोगी आहे. कांदयामध्ये अॅंटीमायक्रोबिअल हा महत्त्वाचा गुणधर्म आहे. कांदयामध्ये समाविष्ट असणारा हा घटक छातीमध्ये झालेला संसर्ग दुर करण्यास मदत करतो. छातीत जर दुखत असेल तर कांदा अवश्य खावा .कांदा हा उपाय लागू करण्यासाठी , एक कांदा आणि एक लिंबु यांचा रस समप्रमाणात घ्यावे .  यानंतर हा मिश्ररस गरम पाण्यात टाकावा आणि त्यात मध टाकावा. आणि हे मिश्रण सलग दिवसातुन तीन ते चार वेळा घ्यावे. याने अन्नप्रक्रिया सुरळीत चालते आणि छातीचे दुखणे कमी होते .

लसूण आणि दुध

छातीत दुखणे घरगुती उपाय /छातीत डाव्या बाजूला दुखणे घरगुती उपाय / छातीत डाव्या बाजूला चमक येणे / chatit dukhane gharguti upay - लसूण दूध
लसूण आणि दूध

 छातीत जर दुखत असेल तर लसणाच्या तीन ते चार पाकळया कुटायच्या आणि एक कप दुध गॅसवर उकळायला ठेवायचे आणि त्यामध्ये कुटलेला लसुण टाकायचा आणि दुध आणि लसुण खदखद उकळुन घ्यायचे आणि ते दुध पिवुन घ्यायचे आणि हे दुध गाळून प्यायचे नाही तर कुटलेला लसणाच्या पाकळया चावून खायच्या याने छातीतील दुखणे नक्कीच कमी होते.

हळदीचे कोमट दूध

छातीत दुखणे घरगुती उपाय - हळद दूध
हळद दूध

 हळदीमध्ये अॅंटीबॅक्टेरीअल गुणधर्म असतात आणि हळद ही ब-याच दुखण्यांवर प्रभावी असा घरगुती उपचार आहे. एक कप गरम दुधात एक चमचा हळद टाकायची आणि ते मिश्रण उकळून घ्यायचे .चांगले उकळल्या नंतर हे मिश्रण तसेच कोमट असताना पिऊन घ्यायचे. याने छातीत असलेला कफ निघुन जातेा किंवा पातळ होतो आणि छातीतले दुखणे कमी होवुन आराम मिळतो . असे चार पाच दिवस केल्याने आपला त्रास नाहीसा होऊन जातो .

छाती खाली जाड उशी घेणे

 जर गॅस मुळे छाती दुखत असेल तर छाती खाली एक जाडसर उशी घ्यायची आणि उताणे पडुन रहायचे याने शरीरा तील गॅस लवकर बाहेर पडण्यास मदत होते कारण गॅस जर मोठया प्रमाणात असेल तर छाती दुखते, म्हणून असे झोपल्यास शरीरातुन गॅस बाहेर पडण्यास मदत होते आणि थोड्या वेळाने हळू हळू छाती तील दुखणे थांबते.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर 

छातीत दुखणे घरगुती उपाय /छातीत डाव्या बाजूला दुखणे घरगुती उपाय / छातीत डाव्या बाजूला चमक येणे / chatit dukhane gharguti upay
छातीत दुखणे घरगुती उपाय – अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

अ‍ॅपल सायडर व्हीनेगर बाजारात मिळते अ‍ॅपल सायडर विन्हेगरमुळे आपण खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. या व्हिनेगर मुळे पित्त, गॅस यांसारखे पोटाचे त्रास उदभवत नाहीत आणि या कारणांमुळे छाती दुखत असेल तर एक चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पिल्याने छातीत दुखण्याचा त्रास नाहीसा होतो. अ‍ॅपल सायडर विन्हेगर हा देखील छातीच्या दुखण्यावर उत्तम उपाय आहे .

कोमट तेलाने मालिश करणे

छातीत दुखणे घरगुती उपाय /छातीत डाव्या बाजूला दुखणे घरगुती उपाय / छातीत डाव्या बाजूला चमक येणे / chatit dukhane gharguti upay
कोमट तेलाने मालिश करा

 छातीत जर जास्त प्रमाणात दुखत असेल तर त्यावर सर्वात सोपा आणि उत्तम उपाय म्हणजे हलक्या हाताने केलेली मालिश यासाठी पालथे झोपायचे आणि पाठीच्या वरच्या भागाला हलक्या हाताने मसाज करून घ्यावी . असे केल्याने छातीत दुखण्याचा त्रास खुप प्रमाणात कमी होतो. आणि मालिश केल्याने आखडलेले स्नायु मोकळे होतात तसेच रक्त प्रवाह सुरळीत होतो आणि त्यामुळे छातीत दुखण्यापासुन आराम मिळतेा.

बेकिंग सोडा

 जर छातीत दुखण्याचे कारण हे पित्त असेल तर कोमट पाण्यातुन चमचाभर बेकींग सोडा घ्यावा . सोडा कोमट पाण्यातून घेतल्याने लगेच छातीत दुखणे थांबते आणि आराम मिळतो कारण यामुळे पित्त दबते. बेंकीग सोडयामुळे पित्ताचा त्रास कमी होतो आणि आपोआपच छातीचे दुखणे सुध्दा बरे होते. अशा प्रकारे आपण आपल्या या त्रासातून सुटका मिळवू शकतो .

अ‍ॅस्पिरिनची गोळी

छातीत डाव्या बाजूला चमक येणे / chatit dukhane gharguti upay -aspirin tablet

अ‍ॅस्पिरिनची एक गोळी पाण्याबरेाबर घेतल्याने छातीतले दुखणे ताबडतोब थांबते आणि आराम मिळतो जर छातीत दुखणे अगदी कमी वेळात आणि लवकर कमी करायचे असेल तर हा उपाय सर्वात उत्तम असा आहे. तरी देखील जर काही त्रास जास्त वाटत असेल किंवा इतर कुठला त्रास असेल तर याकडे दुर्लक्ष न करता आपण त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

बर्फ / कोल्ड पॅक

 जर छातीतले स्नायु आखडले असतील तरी देखील छातीत वेदना होतात. खुप अति प्रमाणात व्यायाम  केला किंवा शरीरातील जास्त हालचाल झाली किंवा कामाच्या ओघामुळे खुप दगदग झाली तरी देखील स्नायु आखडुन छातीत दुखण्यास सुरू होते तर यासाठी बर्फाचा शेक घेतल्याने अतिशय फायदा होतो आणि आपल्याला त्रासा पासून आराम मिळेन . याला आपण केाल्ड पॅक सुध्दा म्हणू शकतो. हा कोल्ड पॅक आपण घरच्या घरी सुध्दा तयार करू शकतेा. फ्रिजरमध्ये सहसा प्रत्येकाच्या घरी बर्फ जमवलेला असतो तर हयाच बर्फाचे चार ते पाच मोठे मोठे तुकडे घेऊन कॉटनच्या कपडयात गुंडाळायचे आणि ते दुखत असलेल्या छातीवर शेकायचे असे साधारण पंधरा ते वीस मिनिटे करावे. यामुळे आखडलेले स्नायु मोकळे होतात आणि छातीतले दूखणे थांबुन आराम मिळतो .

गरम पाणी पिणे

जर छातीत दुखत असेल तर गरम पाणी जास्त प्रमाणात घ्यावे. गरम पाण्याने गॅसेस बाहेर पडतात तसेच छातीतील कफ निघून जातो आणि छातीतील वेदना कमी होऊन त्रास कमी होतो . गरम पानी हे अनेक आजारावर उपाय म्हणून काम करते, त्यामुळे असा त्रास जाणवला तर गरम पानी करून ते थंड करावे आणि थोडे थोडे प्यावे याने आराम मिळेन

व्यायाम करणे

वरील उपायां सोबतच नियमित व्यायाम करणे हा कोणत्याही आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात रामबाण उपाय आहे . त्यामुळे छातीत अधून मधून दुखत असेन तर छाती दुखण्या आधीच नियमित हलकासा व्यायाम , प्राणायाम ,सूर्यनमस्कार , दीर्घश्वास या गोष्टी कराव्या , याने आपल्याला बर्‍याच प्रमाणात उपयोग होईल.

वरील सर्व उपाय हे प्राथमिक स्वरूपावर हलकीशी छाती दुखत असेन तर करावे, परंतु त्रास सारखा जाणवत असेन किंवा अति प्रचंड प्रमाणात असेन तर तज्ञांचा सल्ला, वैद्यकीय सल्ला आणि औषोधोपचार अवश्य घ्यावा .

सारांश – छातीत दुखणे घरगुती उपाय/छातीत डाव्या बाजूला दुखणे घरगुती उपाय/ छातीत डाव्या बाजूला चमक येणे(chatit dukhane gharguti upay)

आपल्याला जर छातीत डाव्या बाजूला दुखणे ही समस्या असेल तर आपण आम्ही सांगितलेले वरील घरगुती उपाय करून पहावेत याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि आपला त्रास देखील निश्चितच कमी होईल.

आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, ” छातीत दुखणे घरगुती उपाय / छातीत डाव्या बाजूला दुखणे घरगुती उपाय /छातीत डाव्या बाजूला चमक येणे /chatit dukhane gharguti upay कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top