चटणी प्रकार मराठी – विविध ९ प्रकारच्या चटणी रेसिपी

चटणी प्रकार मराठी (chatani prakar marathi) >> जेवण करताना चटणी असली की काही वेगळीच मजा येते, मग ती चटणी कोणतीही असो.आपल्या भारतीयांच्या जेवणामध्ये चटणी ही तोंडी लावायला असतेच. पूर्वीची लोक तर चटणी भाकर खाऊन दिवस काढत असत,तेंव्हाचा काळ वेगळा होता म्हणा.परंतु आज देखील चटणीचे जेवणातील महत्व काही कमी झालेले नाहीये. आज देखील आपण जेवताना चटणी ही ताटात आवर्जून वाढतोच.

चटणी बनवण्याचे काही विविध प्रकार आहेत, जवस चटणी,शेंगदाणा चटणी, कारळ्याची चटणी, तिळाची चटणी, खोबर्‍याची चटणी, लसूण खोबरे चटणी, कडीपात्त्याची चटणी, दहयाची चटणी आणि आंब्याची / कैरीची चटणी. यांखेरीस देखील अजून विविध प्रकारच्या चटणी बनवल्या जात असतात. आपआपल्या आवडी नुसार लोक विविध प्रकारच्या चटणी बनवतात. त्यापैकीच काही निवडक आणि आरोग्यास पौष्टिक असे प्रकार कोणते आहेत ते आपण या लेखात पाहणार आहोत आणि त्याची कृती आणि साहित्य हे देखील काय आहे ते पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया माहिती चटणी बनवण्याच्या प्रकाराविषयी

चटणी प्रकार मराठी (chatani prakar marathi)

चटणी बनवण्याच्या या लेखामध्ये आपण अश्याच काही चटणी चे प्रकार याबाबत माहिती बघणार आहोत.चला तर मग जाणून घेऊयात चटणी प्रकार मराठी मध्ये.थोडक्यात या विविध प्रकारच्या चटणी कशा बनवतात ते पाहुयात. यातील माहिती

जवस चटणी

जवस चटणी - चटणी प्रकार मराठी (chatani prakar marathi)
जवस चटणी प्रकार

जवस चटणी ही चवीस देखील अप्रतिम लागते आणि शरीरासाठी देखील अप्रतिम असते. त्यामुळे आपल्या घरात आणि आहारात आवर्जून या जवस च्या चटणीचा समावेश करावा. चला तर मग आता पाहूया ही चटणी बनवण्याची कृती आणि साहित्य-

1 वाटी जवस घ्यावे, जवस घेतल्यावर ते भाजुन घ्यायचे आहे. जवस भाजुन घेत असताना त्यामध्ये थोडसं जिरे देखील टाकायचं आहे व थोडसं तीळ पण टाकावे त्यामुळे अजून छान चव येईल. त्यानंतर कडीपत्ता व मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आणि ते झाल्यावर थोडा लसूण देखील भाजुन घ्यायचा आहे. आता चवीप्रमाणे मीठ आणि थोडेसे हिंग देखील टाकायचे आहे. हे सगळं एकत्र  करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण मिक्सर ला वाटुन घ्यायचे आहे. हे सर्व केल्यावर झाली तुमची जवस चटणी तयार एकदम चवदार.

चटणी प्रकार – कारळ्याची चटणी

कारळ्याची चटणी - चटणी प्रकार मराठी (chatani prakar marathi)
कारळ्याची चटणी प्रकार

एक वाटी कारळ घ्यावे, कारळ घेत असताना हे सुध्दा आपल्याला तव्यात आधी भाजुन घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडसं सुखं खोबरं घेऊन ते खिसणीने खिसून टाकायचं आहे. आता हे सगळं निट भाजुन घ्यायचं आहे, त्यानंतर कडीपत्ता भाजुन घ्यायचा आहे. त्यामध्ये एक-दोन थेंब तेल टाका आणि थोडया नंतर मिरच्या भाजुन घ्यायच्या आहेत. मिरच्या घेतांना हिरव्या नाही लाल मिरच्या भाजुन घ्यायच्या आहेत. त्यामध्ये लसुण आणि थोडे मीठ टाकायचं आहे. तसेच थोडसं हिंग देखील टाकायचं आहे. आता हे मिश्रण सगळं मिक्सरला छान असे वाटून घ्या. अशा रीतीने आपली कारळ्याची चटणी तयार होईल.

तिळाची चटणी प्रकार

तिळाची चटणी - चटणी प्रकार मराठी (chatani prakar marathi)
तिळ

तीळ या पदार्थात अतिशय पौष्टिक घटक असतात, हिवाळ्यात खाणे अतिशय लाभदायक असते, त्यामुळेच तर मकर संक्रांतीला तीळ ला मान असतो. तीळ ची चटणी करण्यासाठी तीळ सुध्दा भाजुन घ्यायचे आहेत. थोडयाशा मिरच्या परतुन घ्यायच्या आहेत. त्यामध्ये थोडसं जिरे, लसुण व कश्मीरी मिरची पावडर 1 चमचा टाकायची आहे.  मीठ चवीनुसार टाकायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण एकत्र  करून मिक्सरला वाटून घ्या.अशाप्रकारे झाली तुमची तिळाची चटणी तयार. जी तुमच्या जेवणाची रंजत आणि पौष्टिकता दोन्ही ही वाढ्वेल॰

खोबर्‍याची चटणी प्रकार

खोबर्‍याची चटणी - चटणी प्रकार मराठी (chatani prakar marathi)
खोबर्‍याची चटणी प्रकार

खोब-याची चटणी करताना पहिल्यांदा खोबर्‍यांचे काप करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये लसुण थोडा जास्त टाकला तरी चालेल. नंतर त्यामध्ये जिरे व चार ते पाच बेडगी मिरच्या टाकायच्या आहेत. रंग येण्याकरीता काश्मीरी चीली पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे. त्यानंतर मिश्रण एकत्र  करून सगळं मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर आपली स्वादिष्ट चटणी तयार होईल, हे सर्व झाल्यानंतर कडीपत्ता चा तडका मारून घ्यायचा आहे कारण असे केल्याने चटणी अधिक सुटसुटीत होते.

लसूण खोबरे चटणी

लसून खोबरे चटणी प्रकार मराठी (chatani prakar marathi)
लसून खोबरे चटणी प्रकार

लसुण खोबरे चटणी तयार करण्यासाठी आधी कढईत 1 चमचा तेल व तेलात लसुण परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये सुख्या खोबरयाचे काप सुध्दा परतून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडसं जीर टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण तयार करून झाल्यानंतर हे छान मिक्सरला लावून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटून घेत असताना त्यामध्ये थोडसं लाल तिखट टाकायचे आहे. आता त्यामध्ये चवी पुरते मीठ टाका आणि पुन्हा हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपली लसूण खोबर्‍याची चटणी तयार होईल.

कडीपत्त्याची चटणी – चटणी प्रकार

कडीपत्ता चटणी प्रकार मराठी (chatani prakar marathi)
कडीपत्ता चटणी

तीन वाटया कडीपत्त्याची पाने घ्यायची आहे. त्यानंतर कडीपत्त्याची पाने तेलात तळून घ्या. दोन-तीन चमचे खोबरे घ्या व ते पाणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे.  त्यानंतर तीळ सुध्दा भाजुन घ्यायचे आहेत आणि हे वाटण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे तयार मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. बारीक करून घेत असताना त्यात थोडसं लाल तिखट म्हणजे मिरची पावडर साधरणपणे 1  चमचा टाकायची. हे सगळं आता मिक्स करून वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडसं पाणी टाकायचे त्यानंतर आपली कडीपत्त्याची चटणी तयार होईल.

दहयाची चटणी

दहयाची चटणी - चटणी प्रकार मराठी (chatani prakar marathi)
दही

एक वाटी दही आणि एक वाटी शेंगदाण्याचा कुट घ्यायचा आहे. दही जास्त आंबट आणि शिळे नसावे. आता दही व शेंगदाण्याचा कुट मिक्स करून घ्या. त्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडसं मीठ टाकायचे आहे. तसेच थोडसं तिखट घालायचे आहे. हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली दहयांची चटणी ही तयार होईल.

शेंगदाण्याची चटणी प्रकार

शेंगदाणा चटणी प्रकार मराठी (chatani prakar marathi)
शेंगदाणा चटणी प्रकार

पहिल्यांदा शेंगदाणे भाजुन घ्यायचे. शेंगदाणे भाजुन घेतल्यावर त्यामध्ये लसूण, आलं टाकायचं आहे. साधारण पाने तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात त्यामध्ये लाल तिखट टाकायच आहे व चवी पुरते मीठ टाकायचं आहे. तसेच थोडीशी साखर आणि दोन चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे. हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे संपुर्ण मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडसं पाणी टाकायचं आहे मग आपली शेंगदाण्याची चटणी तयार होईल.सोलापूरची शेंगदाणा चटणी सर्वत्र प्रसिद्ध आहे वरील रेसिपी ही सोलापूर चटणी बांवण्यासाठी वापरली जाते. जी तुम्ही घरच्या घरी शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी अवलंबू शकता.

कैरीची चटणी – चटणी प्रकार

कैरीची चटणी - चटणी प्रकार मराठी (chatani prakar marathi)
कैरी

साधारण तीन ते चार कैरी घ्या व त्यांचे साल काढून घ्या. साल काढून झाल्यानंतर त्या कैरीचे बारीक बारीक काप करून घ्या. मिक्सरमध्ये कैरीचे केलेले काप, 1 वाटी शेंगदाणे, 4-5 मिरच्या, थोडासा लसूण, खोबरे, चवीपुरते मीठ टाकायचे आहे. तसेच चवीपुरती साखर टाकायची हे सर्व बिना पाण्याचं आधी मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडसं पाणी टाकुन मिक्सरला परत बारीक करून घ्यायचं आहे.अशा रीतीने चवदार कैरीची चटणी तयार होईल.

सारांश – चटणी प्रकार मराठी (chatani prakar marathi)

चटणी ही जेवण करताना ताटामध्ये वाढलेली असल्यावर जेवणाची मजा काही वेगळीच येत असते. विविध प्रकारच्या चटणी कशा बनवायच्या या बाबतची माहिती थोडक्यात आपण बघितली. वरील लेखामध्ये दिलेल्या माहिती आणि कृतींनुसार आणखी देखील बर्‍याच विविध प्रकारच्या चटणी बनवल्या जातात. त्या देखील तुम्ही तुमच्या घरी बनवून बघू शकता.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेली विविध चटणी प्रकार घरगुती रेसिपी माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top