चामखीळ घरगुती उपाय / चामखीळ वर औषध – 9 Best Home Remedies

चामखीळ घरगुती उपाय /चामखीळ वर औषध /चामखीळ घालवण्याचे औषध /chamkhil upay >>> अनेक लोकांना अंगावर कुठेही चामखीळ असण्याची किंवा सतत चामखीळ येण्याची समस्या असते. आपल्या चेहर्‍यावर एखादा जरी चामखीळ आला तरी ते संपूर्ण चेहर्‍या वर पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या चेहर्‍यावर हाता पायावर किंवा शरीराच्या कोणत्या ही भागा वर चामखीळ आली तर त्याला अजिबात स्पर्श करू नये. चामखीळ हे लगेचच पसरणार्‍या आजारात येतात म्हणजेच हा स्पर्श जन्य आजार आहे . चामखीळ याला इंग्लिश मध्ये wart असे म्हणतात.

चामखीळ घरगुती उपाय /चामखीळ वर औषध /चामखीळ घालवण्याचे औषध /chamkhil upay
चामखीळ

शरीरा मधील पेपिलोमा नावाचा विषाणु हा त्वचेवर चामखीळ येण्याचं एक महत्वाचं कारण असतो. चामखीळ चेहरा, मान, हात, पाय, पाठ यावर येवू शकतात. अनेक वेळा त्वचे वरच्या असमान वृद्धीमुळे पण शरीरावर चामखीळ तयार होवु शकते. कधी-कधी चामखीळ अनुवंशिक सुद्धा असु शकतात तर कधी चामखीळ शरीरातील बदलणार्‍या हार्मोन्स मुळे ही येवु शकतात. चामखीळ शरीरासाठी धोकादायक किंवा त्रासदायक नसतात,

यामुळे कोणत्या ही वेदना होत नाहीत पण ते शरीराची सुंदरता मात्र कमी करतात आणि पसरण्याची शक्यता असते. चामखीळी पासुन मुक्ती मिळवण्या साठी लोक बर्‍याच महागड्या उपचारांचा अवलंब करतात पण त्यांना पुर्णपणे या पासुन मुक्ती मिळत नाही. पण काही घरगुती उपायांनी आपण या चामखीळी पासुन आपण आरामात आणि स्वस्तात मुक्ति मिळवू शकतो म्हणजे उपाय करू शकतो.

चला तर मग पाहुया चामखीळ घालवण्या साठी कोणते घरगुती उपाय करता येतात आणि चामखीळ वर कोणते औषध प्रभावी आहे ते आपल्याळ आजच्या या लेखात. आज सांगिलेल्या माहितीचा आणि औषध व उपायांचा वापर करून आपल्याला सारखी सारखी येत असलेल्या चामखीळ पासून आपण मुक्ति मिळवू शकता त्यामुळे आजचा हा लेख आपणास चामखीळ घालवण्यास नक्कीच उपयोगी येईल.

चामखीळ घरगुती उपाय /चामखीळ वर औषध /चामखीळ घालवण्याचे औषध /chamkhil upay in marathi

आपल्याला जर त्वचेवर चामखीळ येण्याची समस्या असेन चामखीळ आले असतील तर आपण चामखीळ घालवण्याचे औषध / चामखीळ वर औषध किंवा चामखीळ घरगुती उपाय करावेत याने आपल्याला नक्कीच फायदा होईल.

लसुण : चामखीळ वर औषध

चामखीळ घरगुती उपाय /चामखीळ वर औषध /चामखीळ घालवण्याचे औषध /chamkhil upay
लसूण – चामखीळ वर गुणकारी

 लसुण प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असते. लसणाचं सेवन करणं आपल्याला अनेक समस्यां पासुन दुर ठेवण्यास मदत करतं. लसुण फक्त खाण्यासाठीचं नसुन सौंदर्य वर्धक देखील आहे, लसूण हा सुंदरते साठी देखील फायदेशीर आहे.

चामखीळ घरगुती उपाय /चामखीळ वर औषध /चामखीळ घालवण्याचे औषध /chamkhil upay
लसूण च्या पाकळयांची पेस्ट करून चामखीळ वर लावा

लसणा मध्ये अँटिफंगल आणि विषाणुं च्या वाढीस प्रतिबंध करणारे असे अनेक गुणधर्म असतात जे त्वचेवरील चामखीळ काढण्यास आणि घालवण्यास मदत करतात. लसणा च्या पाकळ्या चामखीळी वर घासा किंवा लसणा च्या पाकळ्यांची पेस्ट बनवुन ती चामखीळी वर लावा. दिवसातुन दोन ते तीनवेळा तुम्ही हा उपाय करु शकता. या उपायाने चामखीळ जाण्यास मदत होते.

लिंबाचा रस : चामखीळ वर उत्तम उपाय

चामखीळ घरगुती उपाय /चामखीळ वर औषध /चामखीळ घालवण्याचे औषध /chamkhil upay
लिंबाचा रस – चामखीळ वर लावा

 लिंबा मध्ये व्हिटॅमिन सी असल्याने लिंबू त्वचेस फायदे कारक असते आणि म्हणुनच लिंबाचा वापर सौंदर्यां साठी केला जातो. लिंबाचा रस लावल्याने चामखीळ किंवा तिळ येणे ही समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होते. लिंबाचा रस हा कापसाने चामखीळी वर लावा व थोड्या वेळा साठी कापुस त्यावर तसाच ठेवा. जवळ पास एक-दोन मिनिटांनी कापुस काढून टाका. दिवसा तुन किमान दोन ते तीन वेळा लिंबाचा रस लावल्यास चांगला परिणाम दिसुन येतो आणि चामखीळ निघून जाते.

बटाटा

बटाटा खाप - घरगुती उपाय
बटाटा – चामखीळ साठी उपयुक्त

बटाटा हा शरीरा वरील काळे डाग काढण्यासाठी फायदेशीर असतो. त्या प्रमाणेच बटाटा चामखीळ व तीळ काढण्यासही उपयोगी असतो. बटाट्यामध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म आढळतात. बटाट्याचे काप किंवा त्याचा रस काढून ते काप / रस चामखीळ असलेल्या भागावर चोळून त्यावर बँडेज लावून ठेवावे. सातत्त्याने आठवडा भर असे करावे. आठवडा भरा नंतर चामखीळ हे बँडेज सोबत आपोआप निघून येइल.

सफरचंदाचं व्हिनेगर

चामखीळ वर औषध /चामखीळ घालवण्याचे औषध - सफरचंदाचे व्हिनेगर
सफरचंदाचे व्हिनेगर – चामखीळ घालवण्याचे औषध

चामखीळीची ही समस्या मुळापासुन दुर करण्यासाठी सफरचंदाचं व्हिनेगर अधिक फायदेशीर असतं. हे त्वचेसाठी सर्वात प्रभावी औषध असुन यामध्ये दाहक व संसर्ग विरोधी असे गुणधर्म असतात जे की त्वचे वरील डाग काढून टाकतात. चामखीळी वर हे व्हिनेगर कापसाने लावा, व थोडा वेळ कापुस तसाच ठेवा. दिवसातुन दोन ते तीन वेळा हा उपाय करा, तुमच्या शरीरा वरील चामखीळ जाण्यास नक्कीच मदत होईल.

केळीची साल  

चामखीळ घरगुती उपाय /चामखीळ वर औषध /चामखीळ घालवण्याचे औषध /chamkhil upay
केळीचे साल

केळी अनेक गुणांनी समृद्ध आहे, केळी जशी खाण्यासाठी आणि सौंदर्य साठी उपयोगी आहे त्याप्रमानेच केळीची साल ही देखील खुप फायदेशीर असते. केळीची साल त्वचे साठी अतिशय चांगली असते. चामखीळी पासुन मुक्त होण्या साठी केळीची साल एक उत्तम औषध आहे. केळीची साल चामखीळ सुकवण्यास फायदेशीर ठरते. केळीची साल चामखीळ असलेल्या भागा वर ठेवा आणि या जागेला कापडाने बांधुन ठेवा. नियमित याचा वापर केल्यास काही दिवसात चामखीळ कोरडी पडायला सुरवात होते व काही दिवसातचं निखळुन पडते.

बेकिंग सोडा आणि एरंडेल तेल

बेकिंग सोडा - घरगुती उपाय
बेकिंग सोडा – चामखीळ वर उपाय

 जसा चांगल्या, सुंदर त्वचे साठी बेकिंग सोडा फायदेशीर असतो तसाच तो चामखीळी घालवण्या साठी देखील तेव्हढाच फायदेशीर असतो. चामखीळ घालवण्या साठी बेकिंग सोडा प्रभावी ठरतो. बेकिंग सोडा मध्ये एरंडेल तेलाचे काही थेंब मिसळावे आणि त्याची पेस्ट बनवुन घ्यावी. आता ही तयार पेस्ट चामखीळी वर लावावी व एक तासाने धुवून टाकावी. याच्या नियमित वापराने थोड्याच दिवसात फरक दिसेल आणि चामखीळ निघून जाईल.

कांद्याचा रस

Chamkhil gharguti upay - kanda ras
कांदा रस

कांद्याचा रस हा देखील अत्यंत उपयोगी येणारा आहे .कांद्याचा रसाचा वापर करून ही चामखीळ घालवता येते. एका कांद्याचा रस काढून चामखीळ असलेल्या भागा वर लावून हाताने मालिश करा. महिनाभर अश्या पद्धतीने याचा वापर केल्यास चामखीळी ची समस्या ही नक्कीच कमी होवू शकते आणि आपल्या शरीरा वरची चामखीळ नाहीशी होऊ शकते.

मध

चामखीळ घरगुती उपाय /चामखीळ वर औषध /चामखीळ घालवण्याचे औषध /chamkhil upay - मध
मध

मध हा नैसर्गिक औषधी आणि आयुर्वेदिक औषधी पढे येत असल्याने त्याचे कोणतेचं दुष्परिणाम हे होत नाहीत. मध हा चामखीळी वर लावून एक तासभर तसेच लावून ठेवावे, यावर बँडेज लावावा. एक तासाने बँडेज काढून स्वच्छ पाण्याने ती जागा पुसून घ्यावी. याच्या नियमित च्या वापराने चांगले परिणाम दिसून येतात.मध हा मुळातच अतिशय चिकट असतो त्यामुळे चामखीळ असलेल्या जागेवर मध लावून पट्टी बांधल्यास चामखीळ लवकर निघून जाते.

हळद,मध, व्हिटॅमिन सीची गोळी

आपल्याला माहीतच आहे की, हळद ही बर्‍याच गोष्टींसाठी आणि आजारावर घरगुती उपाय म्हणुन अतिशय उपयोगी ठरते. तशीच ही बहुपयोगी हळद चामखीळ घालवण्यासाठी ही तेव्हड्याच प्रमाणात उपयोगी येतअसते. मध, हळद आणि व्हिटॅमिन सीची गोळी यांची पेस्ट तयार करावी व चामखीळ असलेल्या जागी लावावी. आणि साधारण एक तासाने वाळल्या नंतर पाण्याने धुवून टाकावी.

सारांश -चामखीळ घरगुती उपाय / चामखीळ वर औषध / चामखीळ घालवण्याचे औषध (chamkhil upay)

आपल्याला जर सतत चामखीळ येत असेल किंवा आलेली असेल आणि ती कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी तुम्ही विचार करत असाल तर ती घालवण्यासाठी, कमी करण्यासाठी आपण आमच्या “चामखीळ घरगुती उपाय” या लेखातील घरगुती उपाय वापरुन आपला त्रास कमी करू शकता आणि या माहितीचा आणि उपायांचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.

आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, ” चामखीळ घरगुती उपाय / चामखीळ वर औषध / चामखीळ घालवण्याचे औषध /(chamkhil upay), कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top