चक्कर येणे घरगुती उपाय/ चक्कर येण्याची कारणे / चक्कर येणे उपाय (chakkar yene upay) >>> चक्कर येणे ही एक सामान्य समस्या आहे. चक्कर येणे ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कधी न कधी नक्कीच अनुभवलेली असते. चक्कर येण यालाच भोवळ येण असं सुद्धा म्हंटले जाते. जेव्हा चक्कर येते तेव्हा असं वाटतं की, जणू काही आपल्या भोवतीच्या सर्व वस्तु या फिरत आहेत, डोकं हलक वाटायला लागतं, गरगरायला लागतं. सहसा उन्हाळयाच्या दिवसात तर बर्याच जणांना उन्हात गेले की चक्कर आल्यासारख वाटत असते.
उन्हात जास्त वेळ फिरले तर गरगरल्या सारखे वाटते.हे सर्व लक्षण सर्वसाधारणपणे आपल्याला असणार्या अशक्तपणा याचे आहे. चक्कर येणं हा कोणताही आजार नसुन ती एक शारीरिक कमजोरी असल्याचं लक्षण आहे. आपण जर कमी प्रमाणात पाणी पिले तरी देखील आपल्याला चक्कर आल्यासारखे वाटत असते. चक्कर येणे हा गंभीर आजार नसला तरी देखील तो काही वेळा अगदी प्राणघातक अशी समस्या निर्माण करू शकतो. कारण जर आपण रस्त्याने चालत असू किंवा गाडीवर असताना जर आपल्याला चक्कर आली तर आपण खाली पडून आपल्याला मार लागू शकतो, किंवा दुसर्या येणार्या जाणार्या गाड्यांकडून दुखापत होऊ शकते.
घरात देखील जर आपण चक्कर येऊन पडलो तर आपल्या डोक्याला मार लागून अंतर्गत गंभीर दुखापत होऊ शकते, त्यामुळे या चक्कर येण्याच्या समस्येला अतिशय निष्काळजी प्रमाणे घेऊ नये, आपल्याला येणार्या सारखी किंवा अधून मधून येणार्या चक्कर ची मूळ कारणे कोणती आहेत ती शोधून काढावी, आपल्याला का चक्कर येते त्याचे कारण काय आहे ते शोधावे आणि त्यावर उपचार आणि चक्कर येणे उपाय जे आहेत ते करावे. चक्कर येण्याचे कारण काही वेळेस गंभीर असू शकतात तर काही वेळेस सामान्य असू शकते.
चक्कर येण्याची तशी अनेक कारणे आहेत. आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, वाढत्या ताणतणामुळे, अयोग्य खाण्यामुळे , अवेळी जेवण करणे, अवेळी झोपणे यांसारख्या कारणांमुळे चक्कर येणे किंवा भोवळ येणे यासारखे प्रकार हे बर्याच प्रमाणात वाढले आहेत. वारंवार चक्कर येणं किंवा कधी-कधीचं, अधुन मधून चक्कर येणं हे एखाद्या आजाराचे संकेत पण असू शकतात त्यामुळे या चक्कर येणे या समस्येला अतिशय नजरंदाज करू नये. चक्कर येणे तसे काही वेळेस साधे ही असू शकते म्हणजे आपण पाहतो की खुप वेळ उन्हात राहील्यामुळे, पोटात काही नसल्यामुळे किंवा उपवासामुळे साखरेची पातळी कमी होवून, थकवा किंवा अशक्तपणा येऊन चक्कर आल्यासारखे वाटू शकते. उन्हात जास्त फिरले तर घाम येऊन शरीरातील पाणी कमी होऊन देखील चक्कर येऊ शकते.
ही झाली चक्कर येण्याची सामान्य कारणे तर आता आपण पाहूया की, शरीरातील काही आजारांमुळे किंवा कुठल्या आजारमुळे येणार्या चकार येण्याची कारणे कोणती आहेत, चक्कर आल्यावर कोणती लक्षणे जाणवतात आणि यावर घरगुती उपाय कोणते करता येतात ते…….
Table of Contents
चक्कर येण्याची कारणे
आपल्या शरीरात काही समस्या निर्माण झाल्या असतील तरी देखील आपल्याला चक्कर येऊ शकते तर चक्कर येण्याची ती कारणे कोणती आहेत ते आता पाहूया. कारणे यासाठी जाणून घ्यायची असतात कारण त्यामुळे या कारणांपासून आपण स्वतः ला दूर ठेऊ शकतो.
रक्तदाब
चक्कर येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे जर कमी रक्तदाब म्हणजेच यालाच लो बिपी झाला असे म्हणतात तर हा लो बी पी होणे हे देखील असू शकते. असा लो बीपी, रक्तदाब कमी झाल्यामुळे देखील काही वेळेस चक्कर येऊ शकते. त्यामुळे वयाच्या पस्तीस वर्षा नंतर नियमीत आपला रक्तदाब आणि मधुमेह म्हणजेच रक्तातील साखर तपासावी यामुळे बर्याच आजारापासून आपण दूर राहू शकतो.
शुगर
आपण जर नेहमी उपवास करत असाल तर उपवासामुळे देखील रक्तातील साखर कमी होते आणि रक्तातील साखर कमी झाल्यामुळे देखील चक्कर येऊ शकते. साखर कमी होणे हे देखील एक मुख्य कारण आहे चक्कर येण्यामागचं. शुगर कमी होणे किंवा जास्त होणे, या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक असतात, त्यामुळे रक्तदाब आणि साखर दोन्ही देखील नियंत्रणात असावे.
शरीरातील पाणी कमी झाल्याने
आपण जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळे, जास्त वेळ व्यायाम केल्यामुळे, किंवा जुलाब- उलट्यांमुळे घाम येवून देखील शरीरातील पाणी कमी होते आणि शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होते आणि त्यामुळे देखील चक्कर येते.
कानाच्या आजारामुळे
कानामध्ये होणार्या विविध आजारांमुळे, कानाची समस्या असल्याने देखील चक्कत येऊ शकते. म्हणजेच कानात इन्फेक्शन झाल्यामुळे, कानात मळ झाल्यामुळे किंवा कान गच्च झाल्याने देखील चक्कर येवु शकते. कानाचे कनेक्शन सरळ आपल्या डोके आणि मेंदू शी असते, त्यामुळे कान या छोट्या अवयवाची देखील तपासणी करावी, कारण चक्कर येण्यामागे हे देखील कारण असू शकते.
फिट्स मुळे
आपल्याला जर फिट येण्याचा त्रास असेन तर फिट्स आल्याने देखील चक्कर येते येणे, डोळ्यांचे आजार, ताप, डोकेदुखी, मळमळ यामुळे देखील चक्कर येऊ शकते , डोळ्यांचा नंबर वाढलेला असेन तरी देखील चक्कर येऊ शकते.
मानसिक ताण-तणाव
आपण पाहतोय की, कामाच्या वाढत्या ताणामुळे मानसिक ताण-ताणाव हा वाढत चालला आहे. मानसिक ताण -ताणाव हे ही चक्कर येण्यामागचं महत्वाचं कारण असू शकते.
व्यायामाचा अभाव
बदललेली जिवनशैली व्यायामाचा अभाव तसेच एकाच जागी कामाची बैठी व्यवस्था असलेल्या तरूण वर्गात सध्या चक्कर येण्याचे प्रमाण अधिक आहे. अशावेळी या तरुण वर्गाने आपल्या दैनंदिन जीवनात व्यायामाचा समावेश करावा त्यामुळे मन आणि डोके शांत राहण्यास मदत होते.
उंचीवरून खाली पाहणे
उंच ठिकाणावरून खाली वाकून पाहाणे, प्रवासावेळी खिडकीतून बाहेर डोकावणे, खुप वेळ एकाच जागी बसून राहणे, एकाच जागी गोल गोल फिरणे ही देखील चक्कर येण्याची कारणे असू शकतात.
चक्कर आल्यावर जाणवणारी लक्षणे
साधारणपणे जर आपल्याला चक्कर येत असेल तर खालील लक्षणे ही जाणवतात, अशी लक्षणे जाणवत असल्यास आपण लगेचच खाली बसावे जेणे करुण आपण खाली पडणार नाही आणि आपल्या डोक्याला वगैरे मार लागणार नाही.
- चक्कर येत असेल तर आपल्या आजुबाजुच्या सर्व वस्तु आपल्याभोवती फिरत आहेत असे वाटते.
- अचानक आपल्या डोळ्यांसमोर अंधारी येते.
- डोके हलके वाटायला लागते तसेच गरगरायला लागते.
- अचानकपणे चक्कर सुरू झाली की ,मळमळ व उलटी होते.
- चक्कर आल्यामुळे तोल जावून जमिनीवर कोसळणे.
- चक्कर येवून बेशुद्ध पडणे.
साधारण वरील सर्व चक्कर येत असल्याची लक्षणे आहेत, ही जनावल्यास त्वरित खाली बसावे, कारण चक्कर येऊन जर पडले तर डोक्याला किंवा इतर कुठे दुखापत होऊ शकते॰
चक्कर येणे घरगुती उपाय / चक्कर येणे उपाय/(chakkar yene upay)-
वरील चक्कर येण्याची लक्षणे जाणवू लागली की आपण आपली काळजी घ्यावी आणि घराबाहेर पडणे टाळावे आणि आराम करावा. अशी ही चक्कर येण्याची समस्या आपल्याला सारखी सतावत असेल तर आपण आम्ही आजच्या लेखात जे चक्कर येणे घरगुती उपाय सांगत आहोत ते आपण करावे त्याने नक्कीच आपली चक्कर येणे हळुहळू कमी होईल आणि नंतर चक्कर येण्याची समस्या नाहीशी होईल.
आलं: चक्कर येणे घरगुती उपाय
आलं ही प्रभावी औषधी वनस्पतींपैकी एक वनस्पती आहे. आल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. चक्कर आल्यावर किंवा डोक गरगरायला लागल्यावर आल्याचा छोटा तुकडा तोंडात ठेवून हळू-हळू चघळावा. जर कच्चं आलं खाणं अवघड वाटत असेल तर नियमित आलं घालुन बनवलेला चहा पिऊ शकता. आलं शरीरातील रक्तप्रवाह वाढवण्यास तसेच मेंदु शांत ठेवून त्याला संतुलित राखण्यास लाभदायक असतं. याबरोबर मळमळ, उलटी यांसारख्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करते.
पुदिन्याची पाणे: चक्कर येणे उपाय
पुदिन्याची पाणे डोकं गरगरणं, चक्कर येणं यापासुन मुक्ती मिळवण्यास अतिशय फायदेशीर असतात. त्यासोबतचं डोकं शांत करण्यास व मळमळ कमी करण्यास देखील पुदिन्याच्या पानांची मदत होते.पुदिन्याची ताजी हिरवी पाणे पाण्यात टाकुन ते पाणी मंद आचेवर १० ते १५ मिनिटे उकळून घ्यावे व ते पाणी गाळून घ्यावे आणि चहाप्रमाणे गरम गरम पिऊन घ्यावे.
औषधी काढा : चक्कर येणे घरगुती उपाय
भारतीय स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असणारे विविध मसाले हे अत्यंत गुणकारी असतात. त्यापासुन आपण काढा बनवू शकतो. १ वेलची, १ लवंग, १ काळी मिरी,१ छोटा तुकडा दालचिणी, ४-५ तुळशीची पाणे, दोन चिमटी चहापावडर घेऊन त्यात १ कप पाणी मिक्स करावे व हे मिश्रण मंद आचेवर ठेवून उकळून घ्यावे. सामग्री उकळत असताना भांड्यावर झाकण ठेवावे. जवळ-जवळ १० मिनिटे उकळून घेतल्यानंतर स्वादानुसार त्यामध्ये साखर व २ ते ३ थेंब लिंबाचा रस पिळावा. अशाप्रकारे बनवलेला औषधी काढा दिवसातुन दोन वेळा तरी प्यावा यामुळे शरीरास लाभच लाभ मिळतात आणि आपली चक्कर देखील थांबते.
तुळशीची पाने : चक्कर आल्यावर खावीत
तुळशीची पाणे स्वच्छ धुवून घ्यावे आणि त्या पानांचा रस काढावा. तुळशीच्या पाणांच्या रसामध्ये साखर किंवा मध मिसळून ते मिश्रण पिल्यास चक्कर कमी होते आणि आपल्याला आराम मिळतो. काही वेळेस पित्त उसळयाने देखील चक्कर येऊ शकते, तर त्यावर जर हा तुळशीच्या पानाचा उपाय केला तर पित्त कमी होण्यास देखील बरीच मदत होते आणि चक्कर देखील थांबते.
आवळा आणि धणे पावडर
वारंवार जर चक्कर येत असेल तर १० ग्रॅम आवळा पावडर व १० ग्रॅम धणे पावडर एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवावे व रात्रभर भिजल्यानंनतर सकाळी उठल्यानंतर हे सर्व गाळून घ्यावे आणि हे गाळलेले पाणी प्यावे. यामुळे देखील चक्कर बंद होण्यास मदत होते.
वरील उपाय पाच ते सात दिवस करून बघा, आणि याने जर फरक नाही पडला तर मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
सारांश – चक्कर येणे घरगुती उपाय /चक्कर येण्याची कारणे / चक्कर येणे / चक्कर येणे उपाय / chakkar yene upay
आपल्याला जर अधून-मधून किंवा नेहमीच सामन्य अशा कारणांमुळे चक्कर येत असेल तर आपण आमच्या ” चक्कर येणे घरगुती उपाय ” या लेखात सांगितलेले उपाय करून बघावे, यामुळे आपल्याला या त्रासापासून नक्कीच आराम मिळेल.
आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, चक्कर येणे घरगुती उपाय कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)