अपचन घरगुती उपाय /अपचन उपाय / अपचन होण्याची कारणे / apachan gharguti upay >>> सध्या च्या धावपळीच्या जगात लोकांचे बाहेरचे खाण्याचे प्रमाण खुप वाढलेले आहेत. त्यात फास्ट फुड जंक फूड आणि स्ट्रीट फूड, हे सर्व म्हणजे लोकांचा एकदम आवडीचा विषय झाला आहे आणि त्यामुळेच शरीराची पुर्णपणे वाट लागत आहे आणि त्यातच भर पडते तर ती व्यायामाच्या अभावाची. लोकांना हे माहित नसते कि, प्रत्येकाची शरीर प्रकृती ही वेगळी असते. उदाहरणार्थ काही जणांना दूध पचत नाही तर काही जणांना आंब्या मुळे रॅशेस होतात तर आपण पाहतो की काही जणांना आंबा खाल्ला तर अपचन होते. तर अशा वेळी आपण सर्वात सोपे काय करतो तर त्या गोष्टी खाणे टाळतो.
अपचन हे सहसा व्यायाम न केल्याने बर्याच लोकांना होते. अपचन हा तसा फारसा काही गंभीर आजार नाही आणि अपचन झालेच तर ते घरच्या घरी कमी केले जाऊ शकते. अपचन हे अनेक कारणाने होऊ शकते. जसे की, काही न खाता पोट पूर्ण आणि फुगलेले जाणवते. तोंडाची चव ही कडू लागते, सतत ढेकर येत असतात आणि पोटात गॅस होणे, छातीत जळजळ होणे, छातीत वेदना दायक जळ-जळ होण्याची भावना होणे. अशा अनेक प्रकारे अनेक लक्षणे ही अपचन झाल्याची दिसू लागतात किंवा जाणवतात. अपचन झाल्यास आपल्याला काहीही खाण्याची अजिबात इच्छा होत नाही किंब हुना आपल्याला खाल्याच जात नाही.
एखाद वेळेस अपचन झाले तर आपण सहन करू शकतो परंतु; जर आपणास सारखे सारखे जर अपचन होऊ लागले तर त्यांचा विपरीत परिणाम हा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अन्न खावे वाटणार नाही आणि खलेले अन्न पचणार नाही आणि त्यामुळे आपल्या शरीराचे संतुलन बिघडेल व वजन देखील कमी होईल. त्यामुळे अपचन होत असेल तर त्यावर लगेचच आपण काही घरगुती उपाय करावे त्यामुळे आपला त्रास कमी होईल आणि हळू हळू आपल्याला अपचन होणे,ही समस्या नाहीशी होईल. त्याचसाठी आम्ही घेऊन येत आहोत आज एक अतिशय महत्वपूर्ण लेख “अपचन घरगुती उपाय” चला तर पाहूया आजची विशेष आणि महत्वपूर्ण माहिती आणि घरगुती उपाय –
Table of Contents
अपचन होण्याची कारणे –
अपचन होण्यामागे बरीच कारणे असू शकतात, काही वेळेस पोटातील आतडयात दोष झाल्यास देखील असे होऊ शकते परंतु ; साधारणतः सांगावयाचे झाल्यास अपचन हे खालील कारणाने होऊ शकते –
- एकाच जागी बसून राहिल्याने.
- जड अन्न जेवल्याने
- व्यायामाचा अभाव असल्यास
- गरम पदार्थ असलेले अन्न जेवण केल्यास
- जेवण्याच्या चुकीच्या सवयी मुळे म्हणजे पटापट जेवण केल्यास , घास पूर्ण न चावून खाल्ल्यास
- पाणी कमी पिल्यास आपल्याला अपचन होऊ शकते.
ही वरील काही कारणे असू शकतात अपचन होण्यामागे, त्यामुळे ही कारणे टाळण्यासाठी आपण काही प्रयत्न करू शकतात. आता आपण पाहूया यावर उपाय आणि घरगुती उपचार काय आहे-
अपचन घरगुती उपाय / अपचन उपाय / अपचन घरगुती उपाय :-
मिरेपूड आणि अद्रक रस –
जास्त जेवणामुळे जर आपल्याला अजीर्ण झाले असेल किंवा अपचन झाले असेल तर एक चमचा मिरेपुड घ्यावी आणि त्यात एक चमचा आल्याचा रस टाकावा आणि चिमूटभर काळे मीठ टाकावे. आता हे सर्व मिश्रण एकत्र करावे आणि जेवण झाल्यानंतर प्यावे व दहा -बारा मिनिट मोकळ्या हवेत चालावे असे केल्याने ढेकर येऊन खाल्लेले जेवण जिरते आणि पचन होते॰
सैंधव मीठ आणि ताक –
लोणी काढल्या वर जे ताक शिल्लक राहते त्या ताका मध्ये सैंधव मीठ थोडेसे टाकावे आणि ते ताक प्यावे . असे केल्यास आपल्याला झालेला अजीर्णपणा हा अगदी पुर्णपणे पळून जातो.
लिंबू , सैंधव मीठ आणि सुंठ पावडर –
करपट ढेकर येत असतील अजीर्ण झाले असेल तर अर्धे लिंबू घेऊन त्यावर एक चिमटी सुंठ पावडर टाकून एक चिमटी सैंधव मीठ टाकावे व हे लिंबू गरम करावे निखार्यावर खदखदू लागले की उतरवून थोडया वेळाने थोडे थोडे चोखत राहावे. लोणी काढल्यानंतरचे ताक तुम्हाला आवडक्ट नसल्यास तुम्ही साधे म्हणजे ताजे बनवलेले ताक देखील घेऊ शकतात.
वेलदोडे चा काढा –
अपचन होऊन करपट ढेकर येत असतील तर तसेच उलटी ही होत असेल, तर आठ दहा वेलदोडे घेऊन चार वाटया भरून पाण्यात टाकावेत. ते उकळून पाव वाटी पाणी करावे व त्यात अर्धा चमचा साखर टाकावी. हा काढा दिवसातुन चार वेळा घ्यावा याने अपचन कमी होते. काळा चहा किंवा वेलदोडा चहा हा अजीर्ण आणि इतर समस्यांवर रामबाण उपाय आहे.
लोणी –
अपचन झाले असेल तर किंवा तोंड झाले असेल तर एक चमचा लोणी घेऊन दोन चिमटया जिरेपुड व दोन चिमटया साखर घालुन ते मिश्रण सकाळ दुपार आणि सांयकाळी घेतल्यास अपचन झाल्याची तक्रार ही दुर होते.
साजूक तुपात तळलेला लसूण –
अजीर्ण झाले असल्यास किंवा पोटदुखी झाल्यास अर्धा चमचा साजुक तुपात चार लसणाच्या पाकळया ठेचून किंवा तळून लालसर झाल्यावर ते खाल्ल्यास अपचनाची समस्या कमी होऊ शकते. लसूण हा देखील अनेक औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे, आणि याचे बरेच फायदे शरीराला होऊ शकतात, त्यामुळे हा उपाय करावा. याचा बराच उपयोग होईल.
आले रस, लिंबू रस आणि मीठ –
अजीर्ण मुळे पोट दुखत असेल तर एक चमचा आल्यास रस घ्यावा. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालावा व चिमटीभर मीठ घालून प्यावे याने अपचन कमी होण्यास मदत होते. आले रस, लिंबू हे सर्वात जास्त प्रमाणात पोटाच्या कोणत्याही समस्या दूर करण्यास मदत करते. पोटातील कोणतेही इन्फेकशन आणि जंतु या उपायाने कमी होण्यास मदत होते.
कडूलिंबाची फुले –
अपचन झाल्यास कडुलिंबाची दोन ओंजळी फूले घेऊन ती फुले एक ग्लास भरून पाणी घेऊन त्यात टाकुन उकळवावी. उकळुन झाल्यावर हे पाणी अर्धा ग्लास पाणी झाले की गॅस बंद करावा. हा असा कडूलिंबाच्या फुलांचा अर्क पाण्यात उतरलेले पाणी दिवसातून तीन वेळा किंवा एक वेळी तीन चमचे याप्रमाणे घ्यावे. असे केल्याने अपचन ची समस्या दूर होते.
धने चा काढा –
दोन कप पाणी घेऊन त्यात एक चमचा धने घालुन उकळवून त्याची एक कप पाणी करावे आणि सकाळी चहाच्या ऐवजी हा काढा घेतल्यास अपचनाचे विकार होणार नाहीत आणि भुक देखील चांगली लागेल.
सुंठ पावडर –
पाव चमचा सुंठ पावडर घेऊन त्यात पाव चमचा साखर घालुन ते मिश्रण रोज सकाळी अनाशे पोटी घेतल्यास भुकही चांगली लागेल.आणि अपचन झाले असेल तर अन्न पचेल आणि अपचना मुळे होणरे त्रास देखील होणार नाहीत.
गूळ, तूप आणि सुंठ यांचे चाटण –
अपचनामुळे वारंवार पोटात दुखून शौचाला जायला लागले तर सुंठ पाण्यात उगाळून अर्धा चमचा घ्यावी. पाव चमचा साजुक तुप घालावे. पाव चमचा जुना गुळ किंवा साखर घालुन हे मिश्रण चांगले शिजवून तयार झाले कि चाटावे.
मनुका आणि बडिशोप चे पाणी
अपचन होऊन आंबट ढेकर येत असतील तर मुठभर मनुका घ्यावा आणि तेवढीच बडीशेप एक ग्लासभर पाण्यात उकळवून घ्यावी. आता हे पाणी जवळपास अर्धा ग्लास पाणी होऊ द्यावे. हे झाल्या वर ते पाणी गाळून दिवसातून एकदा घ्यावे याने अपचनाच्या त्रासा पासुन मुक्तता मिळते. हा काढा म्हणजेच पाणी हे सकाळी अनाशे पोटी घ्यावे.
जेवणा नंतर शतपावली
रोज जेवण झाल्या नंतर लगेच न झोपता तसेच एकाच जागी न बसता आपण मोकळ्या हवेत किमान दहा मिनिट तरी फिरवयास जावे, यामुळे तुम्हाला निश्चितच अपचन होण्याची समस्या ही उद्भवणार नाही आणि तुमचे आरोग्य उत्तम राहील.सतत अपचन च त्रास होणार्या सर्वांसाठी शतपावली हा उत्तम उपाय ठरू शकतो. त्यामुळे रोज जेवननंतर किमान 15 मिनिटे तरी शतपावली ही केलीच पाहिजे.
सारांश – अपचन घरगुती उपाय /अपचन उपाय / अपचन होण्याची कारणे /apchan gharguti upay
आपल्याला जर अपचन झाले असेल किंवा सतत अपचन होणे, हा त्रास होत असेल तर आपण आमच्या वरील ” अपचन घरगुती उपाय /अपचन उपाय /अपचन होण्याची कारणे /apchan gharguti upay” या लेखातील आम्ही सांगितलेले घरगुती उपाय करावेत, त्याने तुमचा त्रास नक्कीच कमी होईल.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले “अपचन घरगुती उपाय / अपचन उपाय / अपचन होण्याची कारणे /apchan gharguti upay” कसे वाटले , हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीसीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)