आव पडणे घरगुती उपाय/ आव पडणे म्हणजे काय/जुलाब होण्याची कारणे/ aav padne upay >>>आव पडणे हा तसा गंभीर नसला किंवा अति सामान्य आजार वाटत असला तरी देखील त्याचा होणारा त्रास आणि ह्या आजारा नंतर होणारे परिणाम हे अतिशय वेदनादायक आणि रूग्णाला कमजोर करून टाकणारे असे असतात, त्यामुळे या आजारावर लगेचच काही उपाय करून आपण याला वाढण्यापासून रोखू शकतो, हा त्रास जास्त वाढला तर रुग्णास अशक्तपणा, शरीरातील पाणी कमी होणे, चक्कर येणे, पायाला गोळे येणे यांसारखे दुष्परिणाम जाणवू लागतात त्यामुळे आव पडत असेल तर त्यावर तत्काळ उपचार करावेत आणि आव पडणे कमी होण्यासाठी जे उपाय आहेत, ते केले पाहिजे.
तर हे आव पडणे यावर घरगुती उपाय आणि उपचार कोण-कोणते आहेत ते आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठीच हा “आव पडणे घरगुती उपाय/ आव पडणे म्हणजे काय/ जुलाब होण्याची कारणे/ aav padne upay” लेख आव पडण्याचा आणि अतिसार व जुलाब होण्याचा त्रास कमी करण्यास मदत करणारा आहे आणि फायदेशीर ठरणारा असा आहे. आता सुरूवातीला आपण पाहूया की, आव पडणे म्हणजे काय?
Table of Contents
आव पडणे म्हणजे काय? :
आव पडणे यास साधारणपणे ‘आमांश’ असे देखील म्हणटले जाते. आव पडणे हा त्रास जास्त करून पोटातील आतड्यांशी सबंधित असणारा आजार आहे. आव पडणे, हा आजार झाल्यास जास्त प्रमाणात जुलाब होणे किंवा हगवण लागण्याची शक्यता असते. पोटातल्या आतड्यात बिघाड झाल्यास आव पडत असल्याने. या आजारास ‘आतडे दाह’ असे देखील म्हणतात तर आव पडणे यास इंग्लिश मध्ये ‘कोलायटीस’ असे म्हणतात.
आव पडणे हा आजार पोटातील लहान आतड्यात किंवा मोठ्या आतड्यात बिघाड झाल्यास होऊ शकतो. या आजारात पोटात अतिशय जोरात कळ येऊन पोट दुखते आणि शौचावाटे चिकट पदार्थ बाहेर पडतो. लहान मुलांना हा आजार जास्त प्रमाणात होतो, याचे कारण लहान मुले हात स्वच्छ न धुता काहीही खातात किंवा तोंडात घालतात, त्यामुळे लहान मुलांना जंतुजन्य किंवा विषाणूजन्य हे इन्फेकशन झाल्याने तर काही वेळेस पोटातील अमिबा मुळे आव पडू शकते.
जर आव पडण्याचा हा आजार, किंवा पोटाच्या लहान आतड्यात बिघाड झाल्याने झालेला हा आजार असेल तर रुग्णणांनी खाल्लेले अन्न हे व्यवस्थित पचले न जाता ते तसेच बाहेर पडले जाते. अन्नाचे व्यवस्थित सेवन न झाल्याने आणि अन्न आणि पाणी यांचे पचन न झाल्याने, लहान आतड्यातून हे अन्न आणि पाणी शोषले न गेल्याने जुलाब हे पातळ पाण्यासारखे होत असतात. आजार झालेल्या व्यक्तीच्या पोटात अन्न नसले तरी पाचक रस आणि अन्न रस हा पाझरला जातो आणि त्याचेच पातळ जुलाब होतात.
जुलाब होण्याची कारणे/ आव पडण्याची कारणे :
आपण आता वाचलेच की, आव पडणे म्हणजे पोटात अगदी मुरडा आणि कळ येऊन चिकट शौच्यास येते आणि त्यामुळे शरीरातील पाणी कमी झाल्याने अंधारी देखील येऊ शकते, परंतु हे जुलाब अती प्रमाणात का होतात किंवा आव का पडते याचे कारण देखील जाणून घेतले पाहिजे, जेणेकरून परत त्याच कारणाने आपल्याला होणारा त्रास आपण रोखू शकतो. तर साधारणपणे वैद्यकीय दृष्टीकोणातून पाहिले तर जुलाब होण्याची खालील कारणे आहेत.
दूषित पाणी –
निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी शरीरात जाणे आवश्यक असते. ज्यावेळी प्राणी किंवा मानवी विष्ठा तसेच इतर घातक घटक पाण्याच्या संपर्कात येतात आणि ते पाणी शरीरात जाते, तेंव्हा हे पाणी दूषित होऊन, हे पाणी पिणार्या व्यक्तीस जुलाब होतात. जुलाब जास्त झाल्यास शरीरास बरीच हाणी होते, त्यामुळे जुलाबाचे कारण शोधून योग्य तो इलाज करावा लागतो. हे जुलाबाचे मुख्य कारण आहे. अपुरे आणि अशुद्ध पाणी वापरणार्यास हा आजार जास्त होतो.
उघड्यावरचे पाणी पिणे –
वरील दूषित पाण्याच्या कारणावरून लक्षात येईल की, नदी, ओढे, उघड्या विहिरी यातील पाणी हे अस्वच्छ असते आणि त्यामुळे ते पिण्यायोग्य अजिबात नसते. नदी ओढे, उघड्या विहिरी किंवा इतरत्र साठवलेले पाणी यामध्ये मानवी किंवा विष्ठा गेलेली असू शकते त्यामुळे असे पिणे, आव पडण्याचे कारण बणू शकते.
बाहेरचे उघडे अन्न खाणे –
बाहेरचे उघड्यावरचे जे अन्न असते, त्यावर बाहेरील घाणीवर बसून आलेल्या मशया तश्याच त्या अन्नावर बसतात आणि ते अन्न दूषित करतात. त्यामुळे असे बाहेरचे उघड्यावर ठेवलेल अन्न खाणे म्हणजे उलट्या, जुलाब, आव पडणे या आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे.
शारीरिक अस्वच्छता –
स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आपल्याला अनेक आजारापासून वाचवतात. त्यामुळे जर शारीरिक अस्वच्छता जसे की, रोज आंघोळ न करणे, मलमूत्र विसर्जनांनंतर साबण लावून हात स्वच्छ न धुणे, काहीही खाण्याआधी हात न धुणे, बाहेरचे अन्न खाणे, अस्वच्छ कपडे वापरणे, अस्वच्छ परिसर ठेवणे, यांसारख्या सवयी असतील तर हे देखील आव पडणे किंवा जुलाब होणे याचे कारण ठरू शकते.
पोटात अमिबा झाल्यास –
पोटात जंत झाल्यास अमिबा किंवा इतर जंतुदोष असल्यास जुलाब होऊ शकतात आणि आव देखील पडू शकते. अशा वेळी विशिष्ट औषधी वापरावी लागते. हे सूक्ष्म जंतु आजार्याच्या विष्ठेतून येतात. हात, पाणी किंवा माशीच्या संपर्काणे शरीरात प्रवेश करतात.
पोटात विषाणू झाल्यास –
सहसा लहान मुलाना असे होऊ शकते. बर्याच वेळा जुलाब हे पोटात विषाणू झाल्यामुळे होत असतात आणि यात सामान्यतः औषधी उपयोगी पडत नाही. त्यामुळे काही उपाय आणि पथ्य आजार कमी करण्यास फायदेशीर ठरतात. अमिबा प्रमाणेच विषाणू झाल्यास देखील जुलाब होणे, आव पडणे अश्या तक्रारी उद्भवत असतात. आता आपण यावर उपाय काय केले पाहिजे ते पाहूया
आव पडणे घरगुती उपाय :
आव पडणे पडल्याने शरीरातील पाणी हे भरपूर प्रमाणात कमी होते, आणि त्यामुळे अतिशय अशक्तपणा हा येऊ शकतो. याकडे आपण दुर्लक्ष केले तर त्याचा गंभीर परिणाम देखील होऊ शकतो, त्यामुळे सुरुवातीलाच या आजारावर काही घरगुती उपाय आणि उपचार करावेत, ते खालीलप्रमाणे
मीठ, साखर, पाणी देणे – जल संजीवनी-
मीठ साखर आणि पाणी हे आपल्या शरीरातील पाणी आणि ग्लुकोज तसेच सोडीयम चे प्रमाण भरून काढण्यास मदत करतात त्यामुळे याला जल संजीवनी असे देखील म्हणतात. त्यासाठी कुणालाही जुलाब होणे किंवा आव पडणे हा त्रास झाला तर, एक ग्लास पाण्यात दोन चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ मिसळून पिण्यास द्यावे यामुळे शरीरातील क्षार आणि पाण्याची भरपाई होते.
त्रिकटू चूर्ण द्यावे (सुंठ मिरे,पिंपळी)-
आव पडत असल्यास त्रिकुट चूर्ण अत्यंत प्रभावीपणे काम करते. त्यामुळे दोन चमचे सुंठ पावडर, एक चमचा पिंपळी आणि दोन चिमुट मिरे पूड मिक्स करावे आणि त्यात हवी असल्यास थोडी साखर पावडर टाकावी, त्यामुळे आव पडणे बंद होते आणि जुलाब देखील थांबतात.
आले कांदा याचा रस –
अद्रक आणि कांदा हे खिसून घ्यावे आणि एका सूती कापडात घालून त्याचा वस्त्रगाळ रस काढावा आता या काढलेल्या रस मध्ये थोडा किंचित कपूर मिसळावा. आव पडणे आणि जुलाब होणे दोन्ही कमी होते तसेच पातळ भाताच्या पेजेसारखे होणारे जुलाब कमी होतात.
बडीशेप आणि पुदिना याचा अर्क उतरलेले पाणी –
पाच बडीशेप रात्रभर एक कप पाण्यात भिजत घालावी आणि सकाळी त्याच पाण्यासोबत बडिशोप आणि त्यात थोडा पुदिना टाकून ते पाणी उकळावे उकलवे नंतर त्याचा देखील वस्त्रगाळ रस काढावा आणि थंड झाल्यास प्यावे.
तिळाचे किंवा करडई चे तेल द्यावे-
जुलाब होत असल्यास किंवा आव पडत असल्यास थोड्या थोड्या वेळेनंतर परत पोटात कळ येते आणि शौच आल्यासारखी वाटते परंतु, कोमट पाण्यात अर्धा चमचा तिळाचे तेल किंवा करडई चे तेल टाकून पिल्यास याने सारखे सारखे मलविसर्जन होईल असे वाटणार नाही.
कोमट पाण्यात चमचाभर तूप देणे –
कोमट पाण्यात एक चमचा साजूक तूप टाकावे आणि ते पाणी प्यावे किंवा कोमट पाण्यात शेंगदाणा तेल 10 ते 15 ml टाकावे आणि ते पाणी प्यावे, हा उपाय केल्याने देखील आव पडणे कमी होते आणि रुग्णास आराम मिळतो.
तांदूळ वरची पेज –
तांदूळ किंवा भातावरची पेज देणे हा उपाय अपचन मुळे आव पडत असेल तर उपयोगी आहे. त्याच बरोबर कणीक पाण्यात मिसळावी आणि पाण्यात उकळून घ्यावी त्याच्या वरचे पाणी काढावे आणि त्यात मीठ थोडी साखर आणि सुंठ पावडर तसेच मिरेपूड टाकून द्यावी.
दहीभात आणि खडीसाखर-
दही भात पचण्यास देखील हलका असतो आणि पोटात देखील आग शांत करण्यास मदत करतो, त्यामुळे आव पडत असेल तर गरम मऊ भात मध्ये खडीसाखर टाकावी आणि ते खावे.
ORS म्हणजे ओरल रिहायडरेशन सोल्यूशन-
ORS हे देखील जुलाब होत असल्यास किंवा आव पडत असल्यास देणे अत्यंत प्रभावी उपाय म्हणून समजले जाते. डॉक्टर देखील जुलाब उलट्या किंवा आव पडत असले तर हा उपचार देतात, त्यामुळे बाजारात कोणत्याही मेडिकल स्टोर्समध्ये हे ORS पावडर मिळते, ते पाण्यात मिसळून प्यावे, या उपायाने त्वरित आराम मिळेन आणि शरीराची जुलाब मुळे झालेली हाणी देखील भरून निघण्यास मदत होईल.
सारांश – आव पडणे घरगुती उपाय/ आव पडणे म्हणजे काय/जुलाब होण्याची कारणे/ aav padne upay
तुम्हाला जर आव पडणे किंवा जुलाब होणे हा त्रास होत असेल तर या लेखात सांगितलेले वरील उपाय करून तुम्ही आराम मिळवू शकता, कारण या आजारावर त्वरित उपाय आणि उपचार कारणे आवश्यक आहे अन्यथा रुग्णास शरीरातील पाणी कमी होऊन अधिक त्रास होईल. वरील उपाय करून फरक नाही जाणवल्यास वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा.
आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, ” आव पडणे घरगुती उपाय /आव पडणे म्हणजे काय/जुलाब होण्याची कारणे/ aav padne upay “, कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.
Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात